Nothing Phone 3 बाबत समोर आली नवीन अपडेट, असा असणार स्मार्टफोनचा रियर पॅनल! फोनला मिळणार नवा लूक
स्मार्टफोन कंपनी नथिंगची युजर्समध्ये एक वेगळीच एक क्रेझ आहे. कारण या स्मार्टफोनचा लूक इतर स्मार्टफोनपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. नथिंग स्मार्टफोनची सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे त्याचा बॅक पॅनल. फोनच्या बॅक पॅनलवर असलेले LED लाइट वाले Glyph इंटरफेस युजर्सना सर्वाधिक आकर्षित करत असते. मात्र आता आगामी स्मार्टफोनमधून हेच आकर्षण गायब होणार असल्याचं समोर आलं आहे. कंपनीने घेतलेला हा निर्णय सर्व नथिंग युजर्सना मोठा धक्का देणार आहे.
Nothing Phone 2 स्मार्टफोन जुलै 2022 मध्ये भारतात लाँच करण्यात आला होता, हा स्मार्टफोन यूके-आधारित ब्रँडचा दुसरा स्मार्टफोन होता. या स्मार्टफोनला मिळालेल्या यशानंतर आता कंपनी नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. कार्ल पेई यांच्या नेतृत्वाखाली आता कंपनी आगामी स्मार्टफोन Nothing Phone 3 लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन 1 जुलै रोजी भारत आणि दुसऱ्या इंटरनॅशनल मार्केट्समध्ये लाँच केला जाणार आहे. लाँचपूर्वी UK-बेस्ड ब्रँडने लेटेस्ट टीझरद्वारे Phone 3 चे डिझाईन एलिमेंट्स शेयर केले आहेत. टिझरमधून अशी शक्यता वर्तवली जात आहे की, आगामी नथिंग हँडसेट त्याच्या ट्रेडमार्क Glyph इंटरफेसशिवाय लाँच केला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
Phone (3).
Ultra-precise engineering. pic.twitter.com/dvw1aVRHND
— Nothing (@nothing) June 6, 2025
एक्सवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये Nothing ने ‘अल्ट्रा प्रीसाइज इंजीनियरिंग’ कॅप्शनसह आगामी स्मार्टफोनची टीझर इमेज शेअर केली आहे. या पोस्टमध्ये Nothing Phone 3 च्या रियर पॅनल डिझाईनची झलक दाखवण्यात आली आहे. इमेजमध्ये पाहू शकतो की, पॅनल डुअल-टोन शेडमध्ये आहे. यामध्ये काही लाइन्स आणि कट्स आहेत. लेटेस्ट टीझरमधून कंफर्म झालं आहे की, कंपनी नवीन फोनमधून Glyph इंटरफेस काढून टाकणार आहे. त्यामुळे आगामी नथिंग फोनच्या डिझाईनमध्ये मोठा बदल होणार आहे. Glyph इंटरफेस कंपनीच्या मेजर डिझाईन एलिमेंट्सपैकी एक आहे. हा डिझाईनमुळे नथिंग स्मार्टफोन इतर कंपन्यांच्या स्मार्टफोनपेक्षा वेगळा ठरतो.
Nothing Phone 3 हा स्मार्टफोन 1 जुलै रोजी लाँच केला जाणार आहे. भारतात या स्मार्टफोनची विक्री फ्लिपकार्टद्वारे केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनमध्ये फ्लॅगशिप चिपसेट दिला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय स्मार्टफोनची बॅटरी 5,000mAh असू शकते. आगामी स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट दिला जाऊ शकतो, ज्यामध्ये पेरिस्कोप टेलीफोटो लेंस असू शकते. येत्या काही दिवसांत फोनबद्दल अधिक माहिती उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
स्मार्टफोन खरेदी करताना तुम्हीही IP रेटिंग तपासता? यातील अंकाचा खरा अर्थ माहिती आहे का? जाणून घ्या
कार्ल पेईने यांनी यापूर्वी सांगितलं होतं की, Nothing Phone 3 ची किंमत कदाचित GBP 800 म्हणजेच सुमारे 90,000 रुपये असू शकते. Phone 2 स्मार्टफोन जुलै 2022 मध्ये लाँच करण्यात आला होता. हा स्मार्टफोन 8GB + 128GB कॉन्फिगरेशनमध्ये लाँच केला होता, ज्याची किंमत 44,999 रुपये आहे.