
Noise ची नवीन स्मार्टवॉच भारतात लाँच! बिल्ट-इन GPS ने सुसज्ज, 7 दिवसांपर्यंत चालणारी बॅटरी आणि इतकी आहे किंमत
NoiseFit Pro 6R ची किंमत भारतात लेदर आण सिलिकॉन स्ट्रॅप व्हेरिअंटसाठी 6,999 रुपयांपासून सुरु होते. तर NoiseFit Pro 6R च्या मेटल स्ट्रॅप ऑप्शनची किंमत 7,999 रुपये ठेवण्यात आली आहे. NoiseFit Pro 6R स्मार्टवॉच सध्या भारतात अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि नॉइज इंडिया ऑनलाइन स्टोअरद्वारे खरेदीसाठी उपलब्ध आहे. NoiseFit Pro 6R चा लेदर स्ट्रॅप व्हेरिअंट ब्राउन आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे. तर मेटल स्ट्रॅप ऑप्शन टाइटेनियम आणि क्रोम ब्लॅक शेड्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. सिलिकॉन स्ट्रॅप मॉडेल ब्लॅक आणि स्टारलाइट गोल्ड कलर पर्यायात खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)
NoiseFit Pro 6R मध्ये अनेक हेल्थ ट्रॅकिंग फीचर्स देण्यात आले आहेत. ज्यामध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग, ब्लड-ऑक्सीजन लेवल ट्रॅकिंग आणि स्ट्रेस ट्रॅकिंग समाविष्ट आहे. याशिवाय, हे डिव्हाईस यूजरच्या झोपेच्या क्वालिटीच्या आधारावर स्लीप स्कोअर देखील देते. हे डिव्हाईस यूजरच्या बॉडी रिकवरी आणि फिजिकल एक्टिविटीची तयारी देखील ट्रॅक करते. ज्यासाठी विविध हेल्थ मेट्रिक्स ट्र्रॅक करून रेडीनेस स्कोर देते. या स्मार्टवॉचमध्ये मेंस्ट्रुअल साइकिल ट्रॅकिंग देखील आहे.
यमध्ये 1.46-इंच AMOLED डिस्प्ले आहे, जो 1,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देणार आहे. NoiseFit Pro 6R मध्ये 42mm चा राउंड डायल देखील आहे. हे स्मार्टवॉच डस्ट आणि वाटर रेजिस्टेंससाठी IP68 रेटिंगसह लाँच करण्यात आला आहे. टेक कंपनीने असा दावा केला आहे की, हे वियरेबल 100m पर्यंत पाण्यापासून सुरक्षा देणार आहे. यामध्ये राइट साइड एक क्राउन आणि एक नेविगेशन बटन देखील आहे.
Tech Tips: लॅपटॉप चार्जिंगला लावून कधीही करू नका ही कामं! नाहीतर होईल अनर्थ, तात्काळ बदला तुमची सवयी
हे स्मार्टवॉच iOS आणि Android डिव्हाईससह कम्पॅटिबल आहे. NoiseFit Pro 6R बाबत असा दावा करण्यात आला आहे की, हे रेगुलर वापरासाठी 7 दिवसांपर्यंत आणि स्टँडबाय मोडवर 30 दिवसांपर्यंत बॅटरी लाईफ ऑफर करते. कंपनीने सांगितलं आहे की, डिव्हाईस सुमारे दोन तासांत शून्य ते 100 टक्के चार्ज होऊ शकते. यामध्ये Strava इंटीग्रेशनसह बिल्ट-इन GPS आहे. हे वियरेबल Noise AI Pro ला देखील सपोर्ट करते.