Flipkart Republic Day 2026: किंमत कोसळली, खरेदीची वेळ आली! iPhone 17 स्वस्तात विकत घेण्याची सुवर्णसंधी, आत्ताच घ्या फायदा
Instagram Update: Reels यूजर्ससाठी खुशखबर! लवकरच येणार नवीन अपडेट, प्लॅटफॉर्मवर मिळणार पावर टूल
फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेल 2026 मध्ये ग्राहकांना आयफोन 17 अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेल 2026 मध्ये ग्राहक आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत आयफोन 17 खरेदी करू शकणार आहेत. हा आयफोन गेल्या वर्षी लाँच करण्या आला होता. त्याची लाँचिंग किंमत 82,900 रुपये आहे. मात्र आता सेलमध्ये ऑफर्स आणि डिस्काऊंटसह आयफोन 17 ची किंमत अत्यंत कमी झाली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
ई-कॉमर्स प्लेटफॉर्मने त्यांच्या अपकमिंग फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेलमधील डिल्स जाहिर करण्यास सुरुवात केली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना आयफोनसह गूगल पिक्सेल, सॅमसंग गॅलेक्सी, नथिंग, रियलमी, मोटोरोला सारख्या ब्रँड्सचे स्मार्टफोन देखील ऑफर्स आणि डिस्काऊंटसह अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. एका रिपोर्टनुसार, फ्लिपकार्ट सेलमध्ये iPhone 17 ची सुरुवातीची किंमत 74,990 रुपये असणार आहे. म्हणजेच या आयफोन मॉडेलवर थेट 8 हजार रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. याशिवाय जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून ग्राहकांना 5,000 रुपयांचा अतिरिक्त एक्सचेंज बोनस देखील मिळणार आहे. म्हणजेच फ्लिपकार्ट सेलमध्ये आयफोन खरेदी केल्यास ग्राहकांना 13,000 रुपयांपर्यंत बचत करण्यची संधी देखील मिळणार आहे.
अॅपलचा हा लेटेस्ट आयफोन A19 बायोनिक चिपसेटसह लाँच करण्यात आला होता. फोनमध्ये 16 कोरचा न्यूरल इंजिन देण्यात आले आहे, जे एआयचा वापर करताना अधिक चांगला परफॉर्मंस ऑफर करतो. या आयफोनमध्ये 6.3 इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले दिला आहे, जो 120Hz हाय रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या आयफोनमध्ये डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी सिरॅमिक शील्ड 2 टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. याच्या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 3000 निट्सपर्यंत आहे आणि यामध्ये डायनॅमिक आईलँड फीचर देखील आहे.
iPhone 17 च्या मागील बाजूला डुअल कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये 48MP चा मुख्य कॅमेरा दिला आहे. यासोबतच 48MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 18MP चा सेंटर स्टेज कॅमेरा दिला आहे. फ्लिपकार्टवर हा आयफोन 256GB, 512GB आणि 1TB स्टोरेज व्हेरिअंटमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. आयफोन 17 लॅवेंडर, मिस्ट ब्लू, सेज ग्रीन, व्हाइट आणि ब्लॅक रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे.






