
Nothing Phone 3: हीच ती जबरदस्त ऑफर... लेटेस्ट स्मार्टफोनवर मिळतंय तब्बल 33 हजारांचे डिस्काऊंट, असा घ्या डीलचा फायदा
Nothing Phone 3 हा स्मार्टफोन 79,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता या स्मार्टफोनच्या खरेदीवर 33 हजार रुपयांचे डिस्काऊंट दिलं जात आहे. लेटेस्ट ऑफरसह या स्मार्टफोनची किंमत अत्यंत कमी झाली आहे. या ऑफरसह, खरेदीदारांना आणखी चांगल्या किमतीत उच्च दर्जाचे डिव्हाइस खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या फोनमध्ये उत्तम परफॉर्मंस, स्टायलिश डिझाईन आणि दीर्घ बॅटरी लाइफ आहे. हा फोन काही महिन्यांपूर्वीच लाँच करण्यात आला होता. (फोटो सौजन्य – Pinterest)
Nothing Phone 3 चा 12GB+256GB व्हेरिअंट Amazon वर 46,482 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. ही किंमत स्मार्टफोनच्या लाँच किंमतीपेक्षा 33 हजार रुपयांनी कमी आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर अनेक बँक ऑफर्स उपलब्ध आहेत. जर तुम्ही त्यांचा फायदा घेऊ शकलात, तर तुम्ही किमतीत आणखी बचत करू शकाल. या स्मार्टफोनच्या खरेदीवर Amazon एक्सचेंज बेनिफिट देखील ऑफर करतो. म्हणजेच तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून 43,200 रुपयांपर्यंत एक्सचेंज वॅल्यू मिळवू शकता. अचूक किंमत फोनच्या मॉडेल, वर्ष आणि स्थितीवर अवलंबून असते. हप्त्यांमध्ये पैसे देण्यास प्राधान्य देणाऱ्या यूजरसाठी, Amazon सुमारे 2,254 रुपये प्रति महिना पासून सुरू होणारे EMI प्लॅन देखील देत आहे.
Nothing Phone 3 मध्ये 6.67-इंच AMOLED स्क्रीन देण्यात आली आहे. जी हाय ब्राइटनेस आणि क्लियर पिक्चर क्वालिटी सपोर्ट करते. डिस्प्लेला Gorilla Glass 7i ने प्रोटेक्शन देण्यात आले आहे, ज्यामुळे मजबूती वाढते. हे डिव्हाईस Snapdragon 8s Gen 4 प्रोसेसरवर आधारित आहे आणि यामध्ये 16GB रॅम आणि 512GB इंटरनल स्टोरेज पर्यंत सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये 5,500mAh बॅटरी आहे, जी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोटोग्राफीबद्दल बोलायचे झाले तर, यात 50MP चा मुख्य कॅमेरा, पेरिस्कोप लेन्स, अल्ट्रावाइड सेन्सर आणि सेल्फीसाठी 50MP चा फ्रंट कॅमेरा आहे.
Ans: Nothing हा लंडन (यूके) येथे स्थित एक टेक ब्रँड आहे.
Ans: त्यातील Glyph Interface, मिनिमलिस्ट डिझाईन, क्लीन UI आणि ट्रान्सपेरंट बॉडी हे मुख्य आकर्षण आहे.
Ans: हे फोनच्या मागील बाजूला दिलेले लाइट-पॅटर्न आहेत जे नोटिफिकेशन, कॉल, चार्जिंग स्टेटस इत्यादींसाठी वापरले जातात.