Nothing Phone 3 vs OnePlus 13: कोणता स्मार्टफोन आहे वॅल्यू फॉर मनी? खरेदी करण्यापूर्वी वाचा सविस्तर
Nothing Phone 3 स्मार्टफोन नुकताच भारतात लाँच करण्यात आला आहे. नथिंग कंपनीने आपला सर्वात महागडा फोन लाँच करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सध्या या स्मार्टफोनची टक्कर OnePlus 13 सोबत होत आहे. या दोन्ही फोनच्या किमती जवळजवळ सारख्याच आहेत. पण डिझाइन आणि कामगिरीच्या बाबतीत या दोन्ही फोनपैकी कोणता चांगला आहे? कोणता खरेदी करणे वॅल्यू फॉर मनी ठरेल? जाणून घेऊया…
बिल्ट-इन GPS आणि खास स्ट्रॅप ऑप्शन्स… भारतात आली boAt ची नवी स्मार्टवॉच, किती आहेत किंमत? जाणून घ्या
Nothing Phone (3) ची किंमत 12GB रॅम+ 256GB व्हेरिअंटसाठी 79,999 रुपये आणि 16GB रॅम+ 512GB व्हेरिअंटसाठी 89,999 रुपये आहे. OnePlus 13 ची किंमत 12GB रॅम+ 256GB व्हेरिअंटसाठी 69,999 रुपये, 16GB रॅम+ 512GB व्हेरिअंटसाठी 76,999 रुपये आणि 24GB रॅम+ 1TB व्हेरिअंटसाठी 89,999 रुपये आहे. (फोटो सौजन्य – X)
Nothing Phone (3) स्मार्टफोन स्टूडेंट्स आणि यंग यूजर्सना आकर्षित करतो. OnePlus 13 ची डिझाइन अधिक प्रीमियम आहे आणि ती इम्प्रेसीव्ह देखील आहे. हा फोन तरुणांना तसेच कुटुंब वर्गालाही आवडेल. Nothing Phone (3) मध्ये 6.67-इंचाचा एमोलेड फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. यामध्ये 4500 निट्स पीक ब्राइटनेस सपोर्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेमध्ये कोर्निंग गोरिल्ला Glass 7i से सेफ्टी आहे. OnePlus 13 5G मध्ये LTPO AMOLED पॅनल वाला 6.82-इंच 2K+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 4500 निट्स ब्राइटनेसने सुसज्ज आहे. या डिस्प्लेला क्रिस्टल शील्ड सिरेमिक ग्लासचे संरक्षण मिळते. दोन्ही फोनचे डिस्प्ले चांगले आहेत, परंतु डिझाइन आणि डिस्प्लेच्या बाबतीत, OnePlus 13 5G एक पाऊल पुढे आहे.
Nothing Phone (3) मध्ये स्नॅपड्रॅगन 8s जेन 4 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे आणि हा फोन अँड्रॉईड 15 बेस्ड Nothing OS 3.5 वर चालतो. तर OnePlus मध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हे अँड्रॉइड 15 बेस्ड ऑक्सीजन ओएस 15 वर काम करते.
Nothing Phone (3) मध्ये सेल्फीसाठी 50MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याच्या मागील बाजूस एकूण चार कॅमेरे आहेत, विशेष म्हणजे चारही कॅमेरे 50 मेगापिक्सेलचे आहेत. OnePlus 13 मध्ये समोर 32MP कॅमेरा देण्यात आला आहे तर त्याच्या मागील बाजूस Hasselblad ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे.
फ्लॅगशिप स्मार्टफोन सेगमेंटमध्ये Nothing Phone ची ब्रँड व्हॅल्यू अद्याप तेवढी मजबूत नाही, कंपनी सतत अद्वितीय डिझाइनवर काम करत असते, परंतु प्रत्येक डिझाइन ग्राहकांना आवडेलच असे नाही. Nothing Phone (3) मध्ये चांगले फीचर्स असले तरी, त्याची रचना आणि उच्च किंमत हे त्याचे कमकुवत मुद्दे आहेत. OnePlus 13 हा त्याच्या डिझाइन आणि कामगिरीच्या बाबतीत खूप मजबूत फोन आहे आणि तो पैशासाठी देखील फायदेशीर आहे. OnePlus हा फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये एक खूप मजबूत ब्रँड आहे, जो कंपनीच्या प्रीमियम फोनना देखील फायदा देतो.