
Nothing Phone 3a Lite: स्वस्त पण सुपरहिट! 5000mAh बॅटरी सपोर्ट आणि असे आहेत स्पेसिफिकेशन्स... किंमत केवळ इतकी
किंमतीबद्दल बोलायचं झालं तर Nothing Phone 3a Lite या स्मार्टफोनचे 8GB रॅम आणि 128GB ऑनबोर्ड स्टोरेजवाले बेस व्हेरिअंट 20,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. तर या स्मार्टफोनचे 256GB स्टोरेजवाले व्हेरिअंट 22,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. कंपनी लाँच ऑफरअंतर्गत या स्मार्टफोनच्या खरेदीवर डिस्काऊंट देत आहे. ज्यामुळे 128GB व्हेरिअंट 19,999 रुपये आणि 256GB व्हेरिअंट 21,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन ब्लॅक, ब्लू आणि व्हाइट कलरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची विक्री 5 डिसेंबरपासून Flipkart, विजय सेल्स, क्रोमासह अनेक मोठ्या रिटेल स्टोअरवर होणार आहे. (फोटो सौजन्य – X)
नथिंगच्या या ऑल न्यू डिवाइसमध्ये 6.77-इंच फुल-HD+ फ्लेक्सिबल AMOLED डिस्प्ले दिला आहे. ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 3,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस आणि 2,160Hz PWM डिमिंग दिला आहे. फोनमध्ये Android 15 वर बेस्ड Nothing OS 3.5 देखील आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, डिव्हाईसला तीन मोठे Android अपग्रेड आणि 6 वर्षांपर्यंत SMR अपडेट मिळणार आहेत. फोनला पावर देण्यासाठी फोनमध्ये मीडियाटेक 7300 प्रो चिपसेट दिली जाणार आहे. डिव्हाईसमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेज मिळणार आहे. एवढंच नाही तर या स्मार्टफोनमध्ये 8GB पर्यंत वर्चुअल रॅम एक्सपेंशन फीचर देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी नथिंगच्या या स्मार्टफोनमध्ये OIS आणि EIS सपोर्ट दिला आहे. डिव्हाईसमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्राइमरी कॅमेरा, 119.5-डिग्री फील्ड-ऑफ-व्यू वाला 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा आणि एक अनस्पेसिफाइड थर्ड सेंसर मिळणार आहे. समोरील बाजूला फोनमध्ये 16-मेगापिक्सेल कॅमेरा दिला आहे. कॅमेऱ्यामध्ये अल्ट्रा XDR फोटो, पोर्ट्रेट मोड, ऑटो टोन, नाइट मोड, मॅक्रो मोड आणि मोशन कॅप्चर मोड सारखे अनेक फीचर्स दिले आहेत. याशिवाय या डिव्हाईसमध्ये 33W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी दिली आहे. फोनमध्ये 5W वायर्ड रिवर्स चार्जिंग सपोर्ट देखील दिला आहे.
Ans: होय, Nothing Phone मध्ये मल्टी-बँड 5G सपोर्ट उपलब्ध आहे.
Ans: नाही. बहुतांश Nothing फोन मॉडेल्समध्ये चार्जर वेगळा विकत घ्यावा लागतो.
Ans: उच्च-एंड मॉडेल्समध्ये वायरलेस चार्जिंग सपोर्ट असतो. स्वस्त मॉडेल्समध्ये नसेल.