Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budget Vlogging Phones: 50 हजार रुपयांहून कमी किंमत आणि कॅमेरा आहे टॉपक्लास! हे स्मार्टफोन्स कंटेट क्रिएटर्ससाठी बेस्ट पर्याय

जर तुम्हाला व्लॉगिंग सुरु करण्याची इच्छा असेल आणि तुम्ही बजेट किंमतीत उपलब्ध असणारा बेस्ट स्मार्टफोन शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता आम्ही तुम्हाला अशाच काही स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 28, 2026 | 02:27 PM
Budget Vlogging Phones: 50 हजार रुपयांहून कमी किंमत आणि कॅमेरा आहे टॉपक्लास! हे स्मार्टफोन्स कंटेट क्रिएटर्ससाठी बेस्ट पर्याय

Budget Vlogging Phones: 50 हजार रुपयांहून कमी किंमत आणि कॅमेरा आहे टॉपक्लास! हे स्मार्टफोन्स कंटेट क्रिएटर्ससाठी बेस्ट पर्याय

Follow Us
Close
Follow Us:
  • iQOO 15R ची सुरुवातीची किंमत 44,999 रुपये
  • Vivo नेहमीच कॅमेरा फोक्स्ड स्मार्टफोन लाँच करण्यावर लक्ष केंद्रीत करतो
  • Oppo Reno 15 विशेषत: कंटेंट क्रिएटर्ससाठी डिझाईन करण्यात आला
भारतात गेल्या काही काळापासून व्लॉगिंग अतिशय वेगाने लोकप्रिय होत आहे. पूर्वी व्लॉगिंग करायची असेल तर महागडे डीएसएलआर आणि कॅमेऱ्यांची गरज होती. पण स्मार्टफोन्समुळे व्लॉगिंग करणं अगदी सोपं झालं आहे. पावरफुल आणि दमदार फीचर्सने सुसज्ज असलेले स्मार्टफोनचा कॅमेरा आणि कमी किंमत यामुळे व्लॉगिंग करताना महागडे डीएसएलआर आणि कॅमेऱ्यांची निवड केली जात नाही. अशा काही स्मार्टफोन्सबद्दल जाणून घेऊया, जे व्लॉगिंग करताना फायदेशीर ठरू शकतात.

BGMI प्लेअर्ससाठी परफेक्ट! हे आहेत 50 हजारांहून कमी किंमतीत बेस्ट गेमिंग स्मार्टफोन, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

iQOO 15R

भारतीय बाजारात हा स्मार्टफोन नुकताच लाँच करण्यात आला आहे. या डिव्हाईसची सुरुवातीची किंमत 44,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन अशा यूजर्ससाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे, ज्यांना परफॉर्मंस आणि कॅमेरा या दोन्हीचे कॉम्बिनेशन पाहिजे आहे. या डिव्हाईसमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा-वाइड लेंस दिला आहे. फोनचा 32MP फ्रंट कॅमेरा व्लॉगिंग आणि सेल्फी व्हिडीओसाठी एक चांगला पर्याय आहे. सर्वात खास गोष्ट म्हणजेच लो-लाइटमध्ये देखील कॅमेरा संतुलित रंग आणि डिटेल कॅप्चर करतो. जर तुम्ही ट्रॅ्व्हल किंवा नाईट व्लॉग शूट करत असाल तर हा स्मार्टफोन तुम्हाला नक्कीच चांगला आऊटपूट देणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

Vivo V60 5G

Vivo नेहमीच कॅमेरा फोक्स्ड स्मार्टफोन लाँच करण्यावर लक्ष केंद्रीत करतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे Vivo V60 5G. या डिव्हाईसची किंमत भारतात 36,999 रुपये आहे. फोनमधील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे डिव्हाईसमधील 50MP टेलीफोटो कॅमेरा आहे,जो 3x ऑप्टिकल झूम ऑफर करतो. डिव्हाईसमध्ये वेगवेगळे फोकल लेंथ जसे 23mm, 50mm आणि 85mm वर शूटिंग करण्याचा पर्याय व्लॉगर्ससाठी फायदेशीर ठरतो. याशिवाय डिव्हाईसमध्ये तिन कॅमेऱ्यांसह 4K व्हिडीओ रेकॉर्ड करण्याची सुविधा मिळते.

Oppo Reno 15

Oppo च्या या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 45,999 रुपये आहे. या स्मार्टफोन विशेषत: कंटेंट क्रिएटर्ससाठी डिझाईन करण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये 50MP प्राइमरी कॅमेरा, 50MP टेलीफोटो कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा-वाइड सेंसर देण्यात आला आहे. फोनचा 50MP ऑटोफोकस सेल्फी कॅमेऱ्यामुळे हा स्मार्टफोन व्लॉगिंगसाठी एक खास डिव्हाईस ठरते. प्रवासात व्हिडिओ रेकॉर्ड करताना चेहऱ्यावर लक्ष केंद्रित करणे अधिक सोपे होते. यासोबतच 4K 60fps व्हिडीओ रेकॉर्डिंग सपोर्ट व्हिडीओ क्वालिटी अधिक चांगली करते.

Google Pixel 10a

जर तुम्हाला नैसर्गिक रंग आणि स्मार्ट AI कॅमेरा पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच Google Pixel 10a ची निवड करू शकता. या स्मार्टफोनची किंमत 49,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 48MP प्राइमरी कॅमेरा आणि 13MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा दिला आहे. गुगलचे AI फीचर्स जसे ऑटो बेस्ट टेक, कॅमेरा कोच आणि एडवांस फोटो एडिटिंग टूल्स कंटेंट क्रिएटर्ससाठी फायदेशीर ठरतात. विशेषतः जेव्हा स्थिर व्हिडिओ आणि रंग विज्ञानाचा विचार केला जातो, त्यावेळेस पिक्सेल फोन बरेच विश्वासार्ह मानले जातात.

डील मिस केली तर पश्चाताप होईल… OnePlus च्या ‘या’ फोनवर मिळतंय तब्बल 19 हजारांचे डिस्काऊंट! वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

OnePlus 15R

OnePlus 15R सध्या 47,999 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. या डिव्हाईसमध्ये 50MP मुख्य कॅमेरा आणि 32MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा फोन डे-लाइट वीडियो रिकॉर्डिंग आणि सोशल मीडिया कंटेंटसाठी एक चांगला पर्याय ठरतो. OnePlus चा क्लीन सॉफ्टवेयर अनुभव आणि स्थिर वीडियो आउटपुटमुळे हा स्मार्टफोन बेस्ट निवड ठरू शकतो.

Web Title: Budget vlogging phones under 50 thousand here is the list of best camera smartphones for content creators tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • OPPO smartphone
  • smartphone
  • vivo

संबंधित बातम्या

स्मार्टफोन ग्राहकांना धक्का! 1 मार्चपासून महागणार Vivo आणि iQOO चे फोन? लीकमध्ये समोर आली माहिती
1

स्मार्टफोन ग्राहकांना धक्का! 1 मार्चपासून महागणार Vivo आणि iQOO चे फोन? लीकमध्ये समोर आली माहिती

Upcoming Smartphones: आता राडा तर होणारच… Nothing पासून iPhone पर्यंत, मार्च महिन्यात एंट्री करणार हे स्मार्टफोन्स
2

Upcoming Smartphones: आता राडा तर होणारच… Nothing पासून iPhone पर्यंत, मार्च महिन्यात एंट्री करणार हे स्मार्टफोन्स

Huawei ने उडवली सर्वांची झोप… 100W चार्जिंग सपोर्टसह लाँच केला तगडा स्मार्टफोन, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका
3

Huawei ने उडवली सर्वांची झोप… 100W चार्जिंग सपोर्टसह लाँच केला तगडा स्मार्टफोन, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका

अबब! Samsung ने आणला अँड्रॉईड 16 बेस्ड One UI 8.5 अपडेट, कोणत्या स्मार्टफोन मॉडेल्सना मिळणार नवीन अपग्रेड्स? जाणून घ्या
4

अबब! Samsung ने आणला अँड्रॉईड 16 बेस्ड One UI 8.5 अपडेट, कोणत्या स्मार्टफोन मॉडेल्सना मिळणार नवीन अपग्रेड्स? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.