
Nothing चा भारतात भव्य प्रवेश! लवकरच होणार पहिल्या स्टोअरचं उद्घाटन, जगातील दुसरं अधिकृत आउटलेट
यासोबतच कंपनी त्याचे डिझाईन एक्सप्लोर करण्यासाठी देखील एक खास जागा देणार आहे. ज्यामुळे ग्राहकांना डिव्हाईस खरेदी करायचे आहे की नाही हे ठरवण्याची संधी मिळणार आहे. कंपनीने अलीकडेच टीझर जारी करत सांगितलं आहे की, कंपनी लवकरच भारतात त्यांचे पहिले फ्लॅगशिप स्टोअर ओपन करणार आहे. तथापि, यूके-आधारित स्मार्टफोन निर्मात्याने अद्याप स्टोअर उघडण्याची नेमकी तारीख जाहीर केलेली नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये कार्ल पेईच्या नेतृत्वात स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनीने घोषणा केली आहे की, भारतात कंपनीचे पहिले फ्लॅगशिप स्टोअर बंगळुरुमध्ये ओपन होणार आहे. हे स्टोअर कधी ओपन होणार त्याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही. मात्र कंपनीने घोषणा केली आहे की, लवकरच भारतातील पहिल्या स्टोअरचे उद्धघाटन होणार आहे. कंपनीने घोषणेदरम्यान असेही म्हटले आहे की हे स्टोअर ग्राहकांना ‘ब्रँडच्या डिझाइन दृष्टिकोनाचा आणि उत्पादनाच्या परिसंस्थेचा अधिक व्यावहारिक पद्धतीने अभ्यास करण्यासाठी’ एक अनोखी जागा प्रदान करेल.
कंपनीचे आगामी स्टोअर हे भारतातील पहिले आणि जगातील दुसरे फ्लॅगशिप स्टोअर असणार आहे. सध्या, कार्ल पेई यांच्या नेतृत्वाखालील नथिंगकडे फक्त एक ब्रँड-मालकीचे स्टोअर आहे, जे लंडनच्या सोहोमधील 4 पीटर स्ट्रीट येथे आहे. UK बेस्ड Nothing कंपनी भारत अधिक स्वारस्य दाखवत आहे. कंपनीने भारतात डेडिकेटेड प्रोडक्ट ड्रॉप ईव्हेंट आणि अनेक प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. नथिंगचा सब-ब्रँड, CMF, ज्याचे हेडक्वार्टर आता भारतात आहे. अलिकडेच डिसेंबर 2025 मध्ये, ती देशात कायदेशीररित्या स्वतंत्र कंपनी बनली आहे.
नथिंगचे को-फाउंडर आणि इंडिया प्रेसिडेंट, एकिस इवेंजेलिडिसने घोषणा केली आहे की, CMF ची एक ‘महत्वपूर्ण भूमिका’ आहे कारण भारत अतिशय वेगाने स्वत:ला ‘ग्लोबल कंज्यूमर टेक इकोसिस्टममध्ये पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. एग्जीक्यूटिव द्वारे शेअर करण्यात आलेल्या ऑफिशियल डॉक्यूमेंट्सनुसार, इनकॉर्पोरेशननंतर, ब्रँडला अधिकृतपणे CMF इंडिया प्राइवेट लिमिटेड म्हटलं जाणार आहे.
Ans: Nothing ची स्थापना कार्ल पेई (Carl Pei) यांनी केली आहे, जे OnePlus चे सह-संस्थापक होते.
Ans: भारतीय बाजारात वाढती मागणी आणि ब्रँडची लोकप्रियता पाहता Nothing भारतात पहिलं अधिकृत स्टोअर उघडत आहे
Ans: ग्राहकांना डिव्हाइस अनुभव, लाईव्ह डेमो, एक्सक्लुझिव्ह लॉन्च आणि सर्व्हिस सपोर्ट मिळणार आहे.