iQOO Z11 Turbo: डिझाईन पाहताच प्रेमात पडाल! तगड्या फीचर्ससह iQOO च्या नव्या स्मार्चफोनची एंट्री, किंमत जाणून घ्या
चीनमध्ये iQOO Z11 Turbo स्मार्टफोन 12GB रॅम+ 256GB स्टोरेज, 16GB रॅम+ 256GB स्टोरेज, 12GB रॅम+ 512GB स्टोरेज, आणि 16GB रॅम + 512GB स्टोरेज या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. डिव्हाईसच्या 12GB रॅम+ 256GB स्टोरेज वाल्या बेस व्हेरिअंटची किंमत CNY 2,699 म्हणजेच सुमारे 35,999 रुपये, 16GB रॅम+ 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 2,999 म्हणजेच सुमारे 39,000 रुपये, 12GB रॅम+ 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 3,199 म्हणजेच सुमारे 41,000 रुपये आणि 16GB रॅम + 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 3,499 म्हणजेच सुमारे 45,000 रुपये आहे. (फोटो सौजन्य – X)
तर या डिव्हाईसच्या टॉप-ऑफ-द-लाइन कॉन्फिगरेशन 16GB रॅम आणि 1TB इंटरनल स्टोरेजची किंमत CNY 3,999 म्हणजेच सुमारे 52,000 रुपये आहे. iQOO चा हा नवीन स्मार्टफोन आता चीनमध्ये विवो ऑनलाइन स्टोअरद्वारे खरेदीसाठी उपलब्ध आहे. हे डिव्हाईस पोलर नाइट ब्लॅक, स्काइलाइट व्हाइट, कैंगलांग फुगुआंग आणि हेलो पाउडर (चीनी भाषेतून अनुवादित) कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.
iQOO Z11 Turbo एक डुअल-सिम स्मार्टफोन आहे, जो Android 16-बेस्ड OriginOS 6 वर चालतो. या हँडसेटमध्य 6.59-इंच का 1.5K (1,260×2,750 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट, HDR कंटेंटसाठी सपोर्ट, 1.07 बिलियन रंग, 94.57 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो आणि P3 कलर गॅमटे आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, या स्मार्टफोनमध्ये पाणी आणि धूळीपासून सुरक्षा देण्यासाठी IP68 + IP69 रेटिंग दिली आहे.
नवीन iQOO Z11 Turbo मध्ये क्वालकॉमचा ऑक्टा-कोर Snapdragon 8 Gen 5 चिपसेट आहे. जो 3nm प्रोसेसवर तयार करण्यात आला आहे. या प्रोसेसरमध्ये दोन परफॉर्मेंस कोर आङेत. जे 3.80GHz ची पीक क्लॉक स्पीड देतात आणि यामध्ये सहा एफिशिएंसी कोर आहे. ज्यांची क्लॉक स्पीड 3.32GHz आहे. या हँडसेटमध्ये Adreno 829 GPU देखील आहे. यामध्ये 16GB पर्यंत LPDDR5x अल्ट्रा रॅम आणि 1TB पर्यंत UFS 4.1 ऑनबोर्ड स्टोरेज देखील आहे.
फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर iQOO Z11 Turbo मध्ये डुअल रियर कॅमेरा यूनिट आहे, ज्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनसह 200-मेगापिक्सेल (f/1.88) चा प्राइमरी शूटर आहे. यामध्ये मागीला बाजूला 8-मेगापिक्सेल (f/2.2) चा अल्ट्रावाइड कॅमेरा देखील आहे. नवीन iQOO Z सीरीजच्या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलगिंसाठी 32-मेगापिक्सेल (f/2.2) चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा दिला आहे. हा स्मार्टफोन 4K रेजोल्यूशनपर्यंत व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो.
iQOO Z11 Turbo मध्ये 7,600mAh बॅटरी दिली आहे. ज्यामध्ये 100W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. कंपनीने दावा केला आहे की, हा फोन 23 दिवसांपर्यंत स्टँडबाय टाइम ऑफर करतो. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5G, 4G LTE, NFC, Wi-Fi 7, ब्लूटूथ 5.4, एक USB टाइप-C पोर्ट, जीपीएस, बेईडू, ग्लोनास, गॅलिलिओ आणि क्यूझेडएसएस सारेखी फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये ऑनबोर्ड सेंसरच्या लिस्टमध्ये एक एक्सेलेरोमीटर, एक एम्बिएंट लाइट सेंसर, एक प्रॉक्सिमिटी सेंसर, एक जायरोस्कोप आणि एक ई-कम्पास समाविष्ट आहे. यामध्ये सिक्योरिटीसाठी 3D अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे.






