Amazon Sale 2026: लाखो रुपयांचा iPhone Air झाला 'इतका' स्वस्त! डिल पाहून ग्राहक झाले आनंदी, संधी चुकवू नका....
खरं तर कंपनीने गेल्यावर्षी सुमारे 1,20,000 रुपयांच्या किंमती हा आयफोन मॉडेल लाँच केला होता. मात्र आता अॅमेझॉनवर सुरु असलेल्या सेलमध्ये ग्राहक हा आयफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी करू शकणार आहेत. कंपनी या डिव्हाईसच्या खरेदीवर ग्राहकांना सुमारे 25 हजार रुपयांची बचत करण्याची संधी देत आहे. एवढ्या मोठ्या डिस्काऊंटमुळे आयफोनवर उपलब्ध असलेली ही डिल आणखी खास मानली जात आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Apple ने आयफोन एअर 1,19,900 रुपयांच्या किंमतीत लाँच केला होता. मात्र आता अॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेलदरम्यान ग्राहक हा आयफोन मॉडेल 92,499 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकतात. म्हणजेच ग्राहकांना या आयफोनच्या खरेदीवर 27,401 रुपयांची बचत करण्याची संधी मिळणार आहे. एवढंच नाही तर SBI क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांसह फोनवर 1,000 रुपयांची थेट सूट देखील आहे. ज्यामुळे डिल आणखी आकर्षक होणार आहे. याशिवाय, फोनवर 35,950 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट देखील मिळणार आहे. ज्यामुळे जुना फोन एक्सचेंज करून तुम्ही आणखी बचत करू शकणार आहात.
स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, iPhone Air मध्ये ProMotion टेक्नोलॉजीसह 6.5-इंच OLED डिस्प्ले देखील देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 3,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस ऑफर करतो. एवढंच नाही तर हे डिव्हाईस अॅपलच्या A19 चिपसेटने सुसज्ज आहे. फोटोग्राफी लवर्ससाठी कंपनीच्या या डिव्हाईसमध्ये 48MP फ्यूजन रियर कॅमेरा आणि 18MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा देखील आहे. हे डिव्हाईस अतिशय बारीक डिझाइनसह येते, त्याची जाडी फक्त 5.6 मिमी आहे आणि वजन सुमारे 165 ग्रॅम आहे, ज्यामुळे ते अॅपलचा आतापर्यंतचा सर्वात पातळ आणि हलका फोन बनते.






