
Airdrop Feature: आता अँड्रॉईड यूजर्सनाही मिळणार आयफोनचे 'हे' फीचर, फाईल शेअर करणं होणार आणखी सोपं
शेअरींग फीचर एअरड्रॉप आयफोन यूजर्सना वेगाने फाईल शेअर करण्याची सुविधा ऑफर करतो. आता गूगलने देखील हे फीचर क्रॅक केले आहे. त्यामुळे आता लवकरच हे फीचर अँड्रॉईड डिव्हाईससाठी जारी केलं जाणार आहे. हे फीचर कोणत्या स्मार्टफोन यूजर्सना मिळणार आणि याचा यूजर्सना कसा फायदा होणार आहे, याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
फाइल शेयरिंगसाठी गूगल यूजर्सना क्विक शेयर अॅप ऑफर करते. पण ते अद्याप क्रॉस-प्लॅटफॉर्म सुसंगत नव्हते. आता गूगलने अॅपलची मदत न घेता या समस्येवर उपाय शोधला आहे. याचा अर्थ असा आहे की, आता गूगलचे क्विक शेयर अॅप्पलच्या एयरड्रॉपसह फाईल एक्सचेंज करू शकणार आहेत. याचा अर्थ असा आहे की, अँड्रॉयड यूजर क्विक शेयरच्या मदतीने एयरड्रॉपद्वारे आयफोनवर फाईल शेअर करू शकणार आहेत. याचप्रमाणे अॅपल यूजर्स देखील एयरड्रॉपने क्विक शेयरद्वारे अँड्रॉईडवर फाईल्स शेअर करू शकणार आहेत.
सध्या हे फीचर केवळ पिक्सेल 10 डिव्हाईसवर उपलब्ध आहे आणि येत्या काळात इतर डिव्हाईसाठी देखील हे फीचर रोलआउट केलं जाणार आहे. जर तुम्हाला पिक्सेल 10 डिव्हाईसवरून आयफोनवर फाईल शेअर करायच्या असतील तर तुम्हाला एयरड्रॉपवर आयफोनला डिस्कवरेबल टू एनीवन करावं लागणार आहे. यानंतर आयफोन एअरड्रॉप क्विक शेयरमध्ये देखील दिसणार आहे. आता तुम्ही हा आयफोन एअरड्रॉप सिलेक्ट आणि फाईल शेअर करा. याच पद्धतीने तुम्ही आयफोनवरून अँड्रॉईडवर फाईल रिसिव्ह देखील करू शकणार आहात.
जर तुम्ही असा विचार करत असाल की, हे क्रॉस-प्लॅटफॉर्म फीचर गूगल आणि अॅपल यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलं आहे, तर तसं नाही. गूगलने हे फीचर तयार करण्यासाठी अॅपलची मदत घेतली नाही. गुगलने याबाबत अॅपलशी चर्चाही केलेली नाही. तथापि, कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, भविष्यात गुगल अॅपलसोबत यावर काम करण्यास तयार आहे.
Ans: Airdrop हा Apple चा फीचर आहे ज्याद्वारे iPhone, iPad आणि Mac डिव्हाइसेस एकमेकांमध्ये फोटो, व्हिडिओ, फाइल्स, कॉन्टॅक्ट्स इत्यादी वेगाने शेअर करता येतात.
Ans: Airdrop Bluetooth + Wi-Fi Direct तंत्रज्ञान वापरून डिव्हाइस ते डिव्हाइस फाइल शेअर करतो.
Ans: होय. फाइल ट्रान्सफर एनक्रिप्टेड असते. पण सेटिंग “Everyone” असेल तर अनोळखी लोक रिक्वेस्ट पाठवू शकतात.