Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खुशखबर! रांगा सोडा, आता Aadhaar मध्ये मोबाइल नंबर बदला घरबसल्या; सेंटरवरील गर्दीतून मिळाली मुक्ती

Update mobile Number Aadhaar Card: UIDAI ने आपल्या नवीन 'आधार ॲप'च्या (Aadhaar App) लॉन्चसह मोठी घोषणा केली आहे की, आधारमधील मोबाइल नंबर अपडेट करण्याची प्रक्रिया आता लवकरच घरबसल्या होणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 28, 2025 | 07:44 PM
रांगा सोडा, आता Aadhaar मध्ये मोबाइल नंबर बदला घरबसल्या (Photo Credit - AI)

रांगा सोडा, आता Aadhaar मध्ये मोबाइल नंबर बदला घरबसल्या (Photo Credit - AI)

Follow Us
Close
Follow Us:

  • आधार कार्डधारकांसाठी मोठी घोषणा!
  • सेंटरवर जाण्याची गरज नाही
  • घरबसल्या बदला मोबाइल नंबर
Aadhaar Card Mobile Number Update: आधार कार्ड (Aadhaar Card) हे आता भारतातील सर्वात मोठे आणि विश्वासार्ह ओळखपत्र बनले आहे. बँकिंग असो, मोबाईल कनेक्शन असो, सरकारी योजनांचा लाभ असो किंवा ऑनलाइन पडताळणी असो प्रत्येक ठिकाणी आधार आवश्यक आहे. मात्र, आधारशी जोडलेला मोबाइल नंबर अनेक वेळा बदलतो, हरवतो किंवा बंद होतो. यामुळे ओटीपी (OTP) येत नाही आणि महत्त्वाची कामे थांबतात.

मोबाइल नंबर अपडेटसाठी आधार केंद्रावर जाण्याची गरज संपली

२०२५ मध्ये UIDAI ने ही मोठी समस्या सोडवली आहे. आतापर्यंत मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी लोकांना आधार केंद्रावर जावे लागत होते, रांगेत उभे राहावे लागत होते आणि अनेकदा कागदपत्रेही दाखवावी लागत होती.

Coming Soon! Update Mobile number in Aadhaar from the comfort of your home — through OTP & Face Authentication. No more standing in the queue at the Aadhaar Centre. Stay tuned… Download now!
Android: https://t.co/f6QEuG8cs0
iOS: https://t.co/RUuBvLwvsQ
Early adopters… pic.twitter.com/ZDjguIc9rZ — Aadhaar (@UIDAI) November 28, 2025

UIDAI ने आपल्या नवीन ‘आधार ॲप’च्या (Aadhaar App) लॉन्चसह मोठी घोषणा केली आहे की, आधारमधील मोबाइल नंबर अपडेट करण्याची प्रक्रिया आता लवकरच घरबसल्या, ‘ओटीपी + फेस ऑथेंटिकेशन’ (OTP + Face Authentication) च्या माध्यमातून केली जाऊ शकेल. म्हणजेच, आता तुम्हाला आधार सेवा केंद्रांपर्यंत जाण्याचा त्रास सहन करावा लागणार नाही.

हे देखील वाचा: तुमचे Aadhaar Card बंद झाले आहे का? UIDAI ने २ कोटींहून अधिक आधार नंबर केले रद्द; काय आहे नेमकं कारण?

या लोकांना होईल फायदा

हा बदल अशा लोकांसाठी वरदान ठरणार आहे, ज्यांचा जुना नंबर बंद झाला आहे, सिम कार्ड बदलले आहे किंवा जे कोणत्याही कारणामुळे आधार केंद्रावर जाऊ शकत नाहीत. कमी वेळेत अधिक सुविधा उपलब्ध करणे आणि आधार सेवा अधिक डिजिटल, सोप्या आणि जलद बनवणे, हे UIDAI चे उद्दिष्ट आहे.

ॲप (Aadhaar App) ची मुख्य वैशिष्ट्ये

नवीन आधार ॲपमध्ये खालील प्रमुख सुविधा देण्यात आल्या आहेत:

  • एकाच ॲपमध्ये अनेक आधार प्रोफाइल (उदा. कुटुंबातील सदस्यांचे) जोडण्याची सुविधा.
  • बायोमेट्रिक डेटा लॉक/अनलॉक करण्याचा पर्याय (सुरक्षिततेसाठी).
  • प्रायव्हसी (गोपनीयता) आणि सुरक्षिततेची उत्तम सुविधा.
  • QR-कोड आधारित आधार शेअरिंग (कागदपत्रांशिवाय ओळख पडताळणी).
  • फेस-ओथेंटिकेशनद्वारे मोबाइल नंबर अपडेट करणे सोपे, जलद आणि सुरक्षित.

या गोष्टी लक्षात ठेवा

  • बायोमैट्रिक अपडेट (फिंगरप्रिंट/बुबुळ/फोटो) अजूनही केवळ नोंदणी केंद्रातूनच (Enrollment Centre) केले जातील.
  • जर तुमचा आधारशी लिंक असलेला जुना नंबर बंद असेल, तर तुमच्याकडे ओटीपी येणार नाही. अशा वेळी तुम्हाला आधी पडताळणीसाठी जवळच्या केंद्रावर जावे लागेल.
  • अपडेटनंतर एसएमएस/नोटिफिकेशन येईपर्यंत जुन्या नंबरने आधार आधारित पडताळणी करणे थांबवा.
  • ॲप केवळ अधिकृत स्त्रोतांवरून (Google Play / App Store) डाउनलोड करा.

अपडेटेड मोबाइल नंबर कुठे आवश्यक?

आधारशी जोडलेला मोबाइल नंबर अपडेट असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण तो खालील कामांसाठी उपयुक्त ठरतो:

  • बँक KYC, सिम कार्ड खरेदी, पॅन-आधार लिंकिंग.
  • UPI ॲक्टिव्हेशन, एलपीजी सबसिडी, डिजीलॉकर.
  • सरकारी योजना, पासपोर्ट/ड्रायव्हिंग लायसन्स अर्ज, आयकर ई-फाइलिंग, आणि सर्व ऑनलाइन आधार सेवा.

हे देखील वाचा: Government Apps: सरकारी सुविधा हातात! तुमच्या फोनमध्ये असायलाच हवीत ‘ही’ ७ सरकारी ॲप्स, मिनिटांत होतील अनेक काम

Aadhaar ॲपद्वारे मोबाइल नंबर अपडेटची संभाव्य प्रक्रिया

UIDAI ने जारी केलेल्या पोस्टर आणि माहितीनुसार संभाव्य प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल:

  1. Aadhaar App डाउनलोड करा: QR कोड स्कॅन करून किंवा Google Play / App Store वरून ॲप डाउनलोड करा.
  2. ॲप उघडा आणि तुमचा १२-अंकी आधार नंबर टाका.
  3. कॅमेऱ्यासमोर चेहरा स्कॅन करा, ॲप तुमचे ‘फेस मॅच’ करेल.
  4. तुम्हाला जो नवीन नंबर अपडेट करायचा आहे, तो प्रविष्ट करा.
  5. त्या नवीन मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी एंटर करा.
  6. स्क्रीनवर “Mobile Number Updated Successfully” असा संदेश दिसेल.

Web Title: Now change mobile number in aadhaar sitting at home get rid of the crowd at the center

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 07:44 PM

Topics:  

  • aadhaar card
  • otp
  • Tech News

संबंधित बातम्या

प्राथमिक बँक खात्यातून यूपीआय पेमेंट केल्यास वाढेल डिजिटल फसवणुकीचा धोका; भारती एअरटेलच्या उपाध्यक्षांचे ग्राहकांना पत्र
1

प्राथमिक बँक खात्यातून यूपीआय पेमेंट केल्यास वाढेल डिजिटल फसवणुकीचा धोका; भारती एअरटेलच्या उपाध्यक्षांचे ग्राहकांना पत्र

तब्बल 7 हजार रुपयांनी महागणार लेटेस्ट iPhone 17 ची किंमत? का वाढतायत स्मार्टफोनच्या किंमती? कारण जाणून घ्या
2

तब्बल 7 हजार रुपयांनी महागणार लेटेस्ट iPhone 17 ची किंमत? का वाढतायत स्मार्टफोनच्या किंमती? कारण जाणून घ्या

Maharashtra Politics: राज्य सरकारचा मोठा निर्णय; आधार वापरून दिले जाणारे जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश, मार्गदर्शक तत्वे
3

Maharashtra Politics: राज्य सरकारचा मोठा निर्णय; आधार वापरून दिले जाणारे जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश, मार्गदर्शक तत्वे

Honor Magic 8 Pro: स्मार्टफोन मार्केटमध्ये होणार धिंगाणा! ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आणि पावरफुल प्रोसेसर… किंमत जाणून घ्या
4

Honor Magic 8 Pro: स्मार्टफोन मार्केटमध्ये होणार धिंगाणा! ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आणि पावरफुल प्रोसेसर… किंमत जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.