सरकारी सुविधा हातात! तुमच्या फोनमध्ये असायलाच हवीत 'ही' ७ सरकारी ॲप्स (Photo Credit - X)
१. DigiLocker
DigiLocker हे तुमच्या आवश्यक कागदपत्रांना डिजिटल पद्धतीने सुरक्षित ठेवणारे ॲप आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, गाडीची कागदपत्रे (RC) आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे यांसारखे सर्व महत्त्वाचे दस्तऐवज यात जतन करता येतात. DigiLocker मध्ये असलेले दस्तऐवज सरकारी कार्यालयांमध्ये आणि वाहतूक पोलिसांसाठी वैध (Valid) मानले जातात. त्यामुळे मूळ कागदपत्रे सोबत ठेवण्याची चिंता संपते.
२. UMANG
UMANG ॲपला तुम्ही सरकारी कामांसाठीचे ‘मास्टर ॲप’ म्हणू शकता. यात केंद्र आणि राज्य सरकारांच्या १२०० हून अधिक सेवा उपलब्ध आहेत. पेन्शन तपासणे, EPF ची माहिती घेणे, गॅस सिलेंडर बुक करणे किंवा आधारशी संबंधित कोणतेही काम एकाच ॲपमधून करता येते. वारंवार वेगवेगळ्या वेबसाइट्सवर जाण्याची गरज नाही.
३. BHIM
BHIM हे भारत सरकारचे विश्वसनीय UPI ॲप आहे. या ॲपद्वारे तुम्ही थेट तुमच्या बँक खात्यातून पैसे पाठवू आणि स्वीकारू शकता. मोबाईल नंबरद्वारे किंवा QR कोड स्कॅन करून पेमेंट करणे अत्यंत सोपे आहे. भाजी खरेदी करण्यापासून ते मोठे बिल भरण्यापर्यंत, हे ॲप प्रत्येक लहान-मोठ्या पेमेंटमध्ये उपयोगी ठरते.
४. mAadhaar
आधार कार्डाशी संबंधित कोणत्याही कामासाठी mAadhaar ॲप अत्यंत उपयुक्त आहे. तुम्ही यातून तुमचे आधार कार्ड डाउनलोड करू शकता, प्रिंटची ऑर्डर देऊ शकता किंवा बायोमेट्रिक लॉक/अनलॉक करू शकता. यामुळे तुमच्या आधार कार्डाची सुरक्षा वाढते आणि गैरवापर होण्याची शक्यता कमी होते. गरजेनुसार ॲपवरून ओटीपी (OTP) देखील जनरेट करता येतो.
५. MyGov
MyGov ॲप हे सरकार आणि नागरिक यांना जोडणारे एक उत्तम व्यासपीठ आहे. सरकारी योजनांवर तुमचे मत देणे, सूचना पाठवणे आणि सरकारच्या नवीन मोहिमांबद्दल माहिती मिळवणे या ॲपद्वारे शक्य होते. हे ॲप तुम्हाला फक्त माहिती पाहण्याची नाही, तर सरकारी धोरणांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची संधी देते.
६. IRCTC Rail Connect
ट्रेनने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी हे ॲप अत्यंत आवश्यक आहे. तिकीट बुक करणे, तिकीट रद्द करणे, पीएनआर (PNR) स्टेटस तपासणे किंवा ट्रेनचे लाईव्ह लोकेशन (Live Location) जाणून घेणे सर्व काही या एका ॲपमध्ये उपलब्ध आहे. स्टेशनवर रांगेत उभे राहण्याची गरज आता राहिलेली नाही.
७. mParivahan
ड्रायव्हिंग लायसन्स आणि गाडीची कागदपत्रे विसरल्यास mParivahan ॲप तुमची मदत करते. तुम्ही तुमचा लायसन्स आणि RC (रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट) डिजिटल स्वरूपात यात सेव्ह करू शकता, जे वाहतूक पोलीस वैध मानतात. याशिवाय, तुम्ही वाहनाच्या मालकाचा तपशील, रोड टॅक्सची माहिती आणि इतर डेटा याच ॲपमध्ये तपासू शकता.






