रील्सचा नवा रंग! Facebook आणि Instagram वर आलं आता मल्टीलँग्वेज डबिंग फीचर, कंटेट क्रिएटर्स झाले आनंदी
मार्क झुकरबर्गने पुन्हा एकदा त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी एक नवीन फीचर सादर केलं आहे. हे आतापर्यंत सादर करण्यात आलेलं सर्वात अनोखं फीचर आहे. मार्क झुकरबर्गने इंस्टाग्रामवर पुष्टी केली आहे की, Meta आता तुमचा कंटेट आणखी जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचलत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मार्क झुकरबर्गने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम आणि फेसबूकसाठी एक नवीन फीचर सादर केलं आहे. या नवीन फीचरमुळे आता तुमचा कंटेट आणखी जास्त मजेदार होणार आहे. सोशल मीडिया दिग्गजने सांगितलं आहे की, अलीकडेच इंस्टाग्राम आणि फेसबूकवर AI-पावर्ड Reels ट्रांसलेशन फीचर सादर करण्यात आलं होतं. हे फीचर केवळ इंग्लिश आणि स्पॅनिशमध्ये उपलब्ध होतं. त्यानंतर आता हे फीचर्स हिंदी आणि पुर्तगाली भाषेत देखील सादर करण्यात आलं आहे. या नवीन फीचरमुळे अधिक क्रिएटर्स आणि दर्शकांना कंटेंट सादर करण्यात आणि पाहण्यात आणखी मजा येणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
एका व्हिडीओमध्ये इंस्टाग्रामचे Adam Mosseri ने दाखवलं आहे की, मेटाचा AI कसा रियल टाइममध्ये रिल्स वेगवेगळ्या भाषांमध्ये ट्रांसलेट आणि डब करू शकतो. Mosseri ने मध्येच भाषा बदलली आणि त्यांचा आवाज अगदी सहज हिंदी, स्पेनिश आणि पुर्तगाली भाषेत डब केला. यामध्ये भाषांतर अगदी नैसर्गिक वाटत होतं. AI डबिंग टूल क्रिएटरचा आवाज आणि टोन रीक्रिएट करते आणि स्पीच निवडलेल्या भाषेत भाषांतरित करते. यामध्ये एक ऑप्शनल लिप सिंक फीचर देखील देण्यात आलं आहे, जे क्रिएटरच्या हालचालींना भाषांतरित ऑडिओशी जुळवते, ज्यामुळे पाहण्याचा अनुभव अधिक वास्तविक बनतो.
ज्या सोशल मीडिया क्रिएटर्सचे पब्लिक अकाउंट आणि 1,000 हून अधिक फॉलोवर्स आहेत, त्या क्रिएटर्सना हे नवीन ट्रांसलेशन ऑप्शन पाहायला मिळणार आहे. हेच क्रिएटर्स सोशल मीडिया रिल्स अपलोड करताना या फीचरचा वापर करू शकणार आहेत. रिल्स अपलोड करताना युजर्स ‘Translate your voice with Meta AI’ ला सिलेक्ट करू शकतात आणि ज्या भाषेत त्यांना रिल्स भाषांतरित करायची आहे, ती भाषा निवडू शकतात. याशिवाय युजर्स रिजल्टचा प्रीव्यू पाहू शकतात आणि त्यानंतर व्हिडीओ पब्लिश करू शकतात.
ट्रांसपेरेंसी कायम ठेवण्यासाठी, मेटा प्रत्येक ट्रांसलेटेड व्हिडीओवर ‘Translated with Meta AI’ लेबल जोडणार आहे. यूजर्स पुन्हा रिल्सच्या ओरिजीनल वर्जनवर देखील येऊ शकतात. यासाठी युजर्सना थ्री-डॉट मेन्यू > Audio and Language > Do not translate सिलेक्ट करावं लागणार आहे.