Facebook पासून ब्रेक घेण्याचा विचार करताय? अकाऊंट डीअॅक्टिवेट किंवा डिलीट करायचंय? स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही प्रोसेस
तुम्हाला देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबूकचा कंटाळा आला आहे का? तुम्ही देखील फेसबूकवरून ब्रेक घेण्याचा विचार करत आहात का? तर ही बातमी तुमच्सासाठी आहे. तुम्हाला देखील फेसबूकवरून ब्रेक घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. फेसबूकवरून ब्रेक घेण्यासाठी तुमच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत, अकाऊंट टेम्पररली डीअॅक्टिवेट करणं किंवा कायमचं डिलीट करणं. पण या दोन्हीमध्ये नेमका फरक आहे, याबाबत अनेकांच्या मनात गोंधळ असतो. तुम्हाला अकाऊंट डीअॅक्टिवेट किंवा डिलीट करायचं असेल तर काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.
डीअॅक्टिवेशन: ही एक टेम्पररी प्रोसेस आहे. ही प्रोसेस फॉलो केल्यास काही काळासाठी तुमचं प्रोफाईल हाईड केले जातं. मात्र यामध्ये तुमचा सर्व डेटा सेफ राहतो. म्हणजेच जेव्हा तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पुन्हा लॉगिन करता, तेव्हा तुमचा सर्व डेटा पुन्हा मिळवू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
डिलीशन: ही प्रोसेस अकाऊंट कायमंच डिलीट करायचं असेल तेव्हा फॉलो केली जाऊ शकते. डिलीट रिक्वेस्टनंतर 30 दिवसांनी तुमचे प्रोफाइल, पोस्ट, फोटो आणि सर्व डेटा कायमचा डिलीट केला जातो.
ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर फेसबुक तुम्हाला तुमचा निर्णय बदलण्यासाठी 30 दिवस देते. या काळात तुम्ही लॉग इन केल्यास अकाऊंट डिलीट करण्याची प्रोसेस रद्द केली जाऊ शकते. 30 दिवसांनंतर, सर्वकाही कायमचे डिलीट केले जाते.