WhatsApp Update: आता इंस्टाग्राम अकाऊंटला लिंक करा तुमचं मेसेजिंग अॅप, बीटा यूजर्ससाठी लवकरच रोल आऊट होणार धमाकेदार फीचर
इंस्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp त्यांच्या करोडो यूजरसाठी पुन्हा एकदा एक नवीन फीचर घेऊन आला आहे. WhatsApp आणि इंस्टाग्राम हे दोन्ही प्लॅटफॉर्म मेटाच्या मालकीचे आहेत. या दोन्ही प्लॅटफॉर्मचेचे जगभरात करोडो युजर्स आहेत. याच करोडो यूजरसाठी कंपनी नेहमीच नवीन फीचर्स आणि अपडेट्स रोल आउट करत असते. या अपडेट्स आणि फीचरमुळे युजर्सच अॅप वापरण्याचा अनुभव अधिक चांगला होतो. अलीकडेच WhatsApp वर असे अनेक फीचर्स आणि अपडेट्स रोल आउट करण्यात आले आहेत जे इंस्टाग्रामवर अधिकपासूनच उपलब्ध आहेत. मात्र आता कंपनी एक यूजर्सच्या WhatsApp आणि इंस्टाग्राम अकाऊंटसाठी एक अनोख फिचर घेऊन येत आहे.
कंपनीने WhatsApp युजरसाठी नव फीचर रोल आउट करण्यास सुरुवात केली आहे. या फीचर अंतर्गत युजर्स यांचा व्हेरिफायड इंस्टाग्राम अकाउंट WhatsApp प्रोफाइलवर कनेक्ट करू शकणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या फीचरची चाचणी सुरू झाली आहे. काही बीटा यूजरसाठी हे फीचर रोल आउट करण्यात आलं आहे. त्यामुळं आता ज्या युजर्स इंस्टाग्राम अकाउंट व्हेरिफाइड आहे, ते त्यांचं अकाऊंट व्हॉट्सॲप प्रोफाईलवर कनेक्ट करू शकणार आहेत. यासाठी युजर्सना काही प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनीने रोल आउट केलेले नवीन फीचर युजर्सना मेटाच्या अकाउंट सेंटरद्वारे त्यांचं इंस्टाग्राम अकाउंट व्हॉटसॲप प्रोफाईलसह कनेक्ट करण्याची संधी देतो. ही प्रोसेस तेव्हाच पूर्ण होणार आहे जेव्हा तुमचं इंस्टाग्राम अकाउंट व्हेरिफाइड असेल. तुमचं अकाउंट व्हेरिफाइड होताच व्हॉटसअप प्रोफाईलवर सोशल आयकॉन दिसणार आहे. ज्यामुळे WhatsApp युजर्सच्या इतर संपर्कांना समजतं की अकाउंट खरे आहे.
खरंतर WhatsApp मध्ये हे ऑप्शन आधीपासूनच उपलब्ध होते, मात्र त्यामध्ये वेरिफिकेशन जोडण्यात आली नव्हती. WhatsApp युजर्स त्यांच्या प्रोफाईलवर कोणतेही इंस्टाग्राम अकाउंट कनेक्ट करू शकत होते, मात्र यामुळे इतर युजर्समध्ये गोंधळ निर्माण व्हायचा की व्हाट्सअप वर कनेक्ट करण्यात आलेला अकाउंट असली आहे की नकली. WhatsApp वर कनेक्ट करण्यात आलेले अकाउंट असली आहे नकली तसेच हे अकाउंट कोणत्या युजर्सच आहेत हे देखील इतरांना आता समजणार आहे.
कंपनीने माहिती दिली आहे की हे फीचर अद्याप सर्व यूजरसाठी रोल आउट करण्यात आलेले नाही. सध्या या पिक्चरची चाचणी सुरू असून सध्या हे फिचर केवळ बेटा यूजर्ससाठी उपलब्ध आहे. बीटा युजर्सकडून मिळालेल्या फीडबॅक नंतर हे फीचर इतर युजर्ससाठी उपलब्ध करून दिलं जाणार आहे. हे फीचर तुमच्यासाठी रोल आउट करण्यात आला आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हांला नियमित तुमचा व्हाट्सअप अपडेट करावा लागणार आहे.
मेसेजिंग ॲप WhatsApp ने अलिकडेच व्हिडिओ कॉलिंगसाठी देखील एक नवीन फीचर रोल आउट केलं आहे. आता युजर्स आधीपासूनच व्हिडिओ कॉल शेड्युल करू शकणार आहे. यासोबतच व्हिडिओ कॉलिंगमधील काही टॅब्स देखील सुधारण्यात आले आहे. व्हिडिओ कॉलिंग दरम्यान युजर्स रिएक्शन देखील देऊ शकतील. यामुळे आता चॅटिंग सोबतच युजर्सचा व्हिडिओ कॉलिंगचा अनुभव देखील अधिक चांगला होणार आहे.