संपता संपणार नाही बॅटरी! Google च्या नव्या TWS ईयरबड्सची जबरदस्त एंट्री, तब्बल 27 तासांची बॅटरी लाईफ; भारतात इतकी आहे किंमत
Google Pixel Buds 2a भारतात लाँच करण्यात आले आहेत. कंपनीने आयोजित केलेल्या Pixel 10 सीरीज स्मार्टफोन्स आणि Pixel Watch 4 सह आता Google Pixel Buds 2a देखील भारतात लाँच करण्यात आले आहे. ट्रूली वायरलेस स्टीरियो (TWS) हेडसेटबाबत असा दावा करण्यात आला आहे की, या ईअबड्सची बॅटरी 27 तासांपर्यंत चालते. यामध्ये चार्जिंग केस देखील देण्यात आले आहेत. या ईअरबड्समध्ये एक्टिव नॉइज कँसिलेशन (ANC) चा सपोर्ट आहे, जो Silent Seal 1.5 सह येतो. असं सांगितलं जात आहे की, हे फीचर ईयरबड्स यूजरच्या कानांच्या आकारानुसार एडजस्ट होतात, ज्यामुळे आरामदायक फीट मिळते. असेच फीचर Pixel Buds Pro 2 मध्ये देखील पाहायला मिळाले होते. जे आता भारत आणि जागतिक बाजारपेठेत नवीन रंग पर्यायांसह उपलब्ध आहे.
Google Pixel Buds 2a ची किंमत भारतात 12,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हे हेजल आणि आइरिस कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहेत. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टद्वारे या ईअरबड्सची विक्री केली जाणार आहे. तर Pixel Buds Pro 2 आता 22,900 रुपयांच्या किंमतीत मूनस्टोन शेड देखील खरेदीसाठी उपलब्ध आहेत. TWS हेडसेट पूर्वी देशात हेझेल, पेनी, पोर्सिलेन आणि विंटरग्रीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध होता. आता, हेडफोन्सना सॉफ्टवेअर अपडेटद्वारे अॅडॉप्टिव्ह ऑडिओ सपोर्ट देखील मिळेल. (फोटो सौजन्य – X)
नवीन Google Pixel Buds 2a मध्ये 11mm डायनामिक ड्राइवर्स आणि गूगलची Tensor A1 चिप आहे. यामध्ये Adaptive ANC सपोर्ट देण्यात आला आहे, ज्यामध्ये Transparency Mode आणि Silent Seal 1.5 फीचर यांचा समावेश आहे. या TWS हेडसेटमध्ये एक्टिव इन-ईयर प्रेशर रिलीफ देखील देण्यात आला आहे.
कनेक्टिविटी ऑप्शन्स मध्ये Pixel Buds 2a मध्ये Bluetooth 5.4 सपोर्ट आहे. यामध्ये ड्यूल माइक्रोफोन आणि क्लियर कॉलिंगसाठी विंड-ब्लॉकिंग मेष कवर्स आहे. यामध्ये इन-ईयर डिटेक्शन सपोर्टसाठी IR प्रॉक्सिमिटी सेंसर देण्यात आला आहे. वायरलेस हेडसेटमध्ये कॅपेसिटिव टच कंट्रोल्स आहे आणि मॅग्नेटिक चार्जिंग केसमध्ये ओपन आणि क्लोज डिटेक्शनसाठी हॉल सेंसर आणि USB Type-C पोर्ट देखील देण्यात आले आहे.
Pixel Buds 2a बाबत असं सांगितलं जात आहे की, हे चार्जिंग केससह ANC शिवाय 27 तासांची बॅटरी लाईफ ऑफर करतात. तर ANC ऑन असल्यास त्याचा टोटल प्लेबॅक टाईम 20 तासांचा होता. गुगलचे म्हणणे आहे की हे इअरबड्स तुम्हाला एकदा चार्ज केल्यानंतर 7 तासांपर्यंत (ANC चालू असताना) आणि 10 तासांपर्यंत (ANC बंद असताना) चालू शकतात. Pixel Buds 2a हेडसेट IP54 रेटिंगसह लाँच करण्यात आले आहे, म्हणजेच हे डिव्हाईस डस्ट आणि स्प्लॅश रेजिस्टेंट आहे. केस IPX4 रेटिंगसह येतो, म्हणजेच तो स्प्लॅश प्रतिरोधक आहे. प्रत्येक इयरफोनचे वजन 4.7 ग्रॅम आहे, तर केससह हेडसेटचे एकूण वजन 47.6 ग्रॅम आहे.