अनोखी डिझाईन आणि क्लासी लूक... भारतात लाँच झाले OnePlus चे नवे ईयरबड्स, तब्बल 45 तासांची बॅटरी लाईफ आणि असे आहेत फीचर्स
तुम्ही नवीन क्लासी लूकवाले ईयरबड्स खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे. मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या ईव्हेंटमध्ये OnePlus Nord 5 आणि Nord CE 5 सह नवे ईयरबड्स OnePlus Buds 4 देखील लाँच करण्यात आले आहेत. या ईयरबड्समध्ये डुअल ड्राइवर्स, डुअल DAC यूनिट्स आणि अडॅप्टिव एक्टिव नॉइज कँसिलेशन (ANC) सपोर्ट देखील देण्यात आला आहे. याशिवाय ईयरबड्सची बॅटरी लाईफ अत्यंत पावरफुल आहे. Buds 4 हे OnePlus Buds 3 चे सक्सेसर आहेत, जे 2024 जानेवारीमध्ये लाँच करण्यात आले होते.
नव्या अवतारात लाँच झाली OnePlus Nord सिरीज…पावरफुल बॅटरीसह मिळणार अनेक कमाल फीचर्स! किंमत केवळ इतकी
OnePlus Buds 4 भारतात 5,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहेत. हे ईअरबड्स स्टॉर्म ग्रे आणि जेन ग्रीन कलर ऑप्शन्समध्ये खरेदसाठी उपलब्ध आहेत. TWS ईयरफोन्सची विक्री 12 जुलैपासून दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होणार आहे. पहिल्या विक्रीमध्ये या ईअरबड्सवर फ्लॅट 500 रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. ज्यामुळे या ईअरबड्सची किंमत 5,499 रुपये होणार आहे. OnePlus Buds 4 भारतात OnePlus India ई-स्टोर, OnePlus Store App, Amazon, Flipkart, Myntra आणि ऑफलाइन चॅनल्सासारख्या वनप्लस एक्सपीरियंस स्टोर्स, रिलायंस डिजिटल, क्रोमा, विजय सेल्स, बजाज इलेक्ट्रॉनिक्स आणि दूसरे सिलेक्ट रिटेल स्टोर्सद्वारे खरेदीसाठी उपलब्ध असणार आहेत. (फोटो सौजन्य – X)
OnePlus Buds 4 मध्ये ट्रेडिशनल इन-ईयर डिझाईन आहे, ज्यामध्ये सिलिकॉन ईयरटिप्स आहे. हे 11mm 30-लेयर सिरेमिक-मेटल वूफर्स आणि 6mm फ्लॅट ट्वीटर्ससह डुअल DAC यूनिट्सने सुसज्ज आहे. यामध्ये Hi-Res वायरलेस ऑडियो सर्टिफिकेशन आणि OnePlus 3D ऑडियो आहे.
The wait ends. The best-in class audio begins. Meet the all-new #OnePlusBuds4. Sale begins tomorrow, 12 Noon IST. pic.twitter.com/e0HVvzgdvh
— OnePlus India (@OnePlus_IN) July 8, 2025
OnePlus चे नवीन TWS ईअरबड्स गोल्डन साउंड एक्सपीरियंस ऑफर करतात. हे ईयरफोन्स पर्सनलाइज्ड ऑडियो ऑफर करण्यासाठी कानाच्या कालव्याचे मॅपिंग करतात.। OnePlus Buds 4 मध्ये 55dB पर्यंत अडॅप्टिव ANC आणि ट्रांसपेरेंसी मोड देखील देण्यात आला आहे. प्रत्येक ईयरबडमध्ये तीन-माईक AI-बॅक्ड कॉल नॉइज रिडक्शन सिस्टम आहे, जो क्लियर कॉल्स सुनिश्चित करतात.
OnePlus Buds 4 Bluetooth 5.4, डुअल-डिवाइस कनेक्टिविटी आणि LHDC 5.0 ऑडियो कोडेकला सपोर्ट करतात. Steady Connect टेक्नोलॉजीसह, हे ईयरफोन्स खासकरून आउटडोरमध्ये स्टेबल ब्लूटूथ कनेक्टिविटी देतात. ईयरफोन्समध्ये डेडिकेटेड गेमिंग मोड आहे, जो 47ms पर्यंत अल्ट्रा-लो लेटेंसीसह लॅग कमी करतो. केससह, OnePlus Buds 4 चा टोटल प्लेबॅक टाइम 45 तासांचा आहे. ANC शिवाय ईयरफोन्स सिंगल चार्जवर 11 तसांची बॅटरी लाईफ ऑफर करतात. तर केसमध्ये 10 मिनिटांच्या क्विक चार्जने 11 तासांची बॅटरी मिळते. त्यांचा बिल्ड IP55-रेटेड डस्ट आणि वॉटर-रेझिस्टंट आहे. ते एका टॅपसह रिअल-टाइम AI ट्रान्सलेशनला देखील सपोर्ट करतात.