
Realme P4 Power: कंटाळा येईल, पण चार्जिंग संपणार नाही! 10,001mAh 'टाइटन बॅटरी' वाला स्मार्टफोन लाँच, प्रतिस्पर्ध्यांना फुटणार घाम
Realme P4 Power 5G स्मार्टफोनच्या 8GB + 128GB या बेस व्हेरिअंटची किंमत 25,999 रुपयांपासून सुरु होते. तर डिव्हाईसच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 27,999 रुपये आहे. तर टॉप-ऑफ-द-लाइन व्हेरिअंट 12GB+256GB स्टोरेज ऑप्शनची किंमत 30,999 रुपये आहे. एवढंच नाही तर कंपनी या डिव्हाईसच्या खरेदीवर 2,000 रुपयांपर्यंत बँक डिस्काऊंट देखील देत आहे. हा फोन पहिल्यांदाच 5 फेब्रुवारी रोजी फ्लिपकार्ट, कंपनीची वेबसाइट आणि रिटेल आउटलेट्सवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा फोन ट्रान्ससिल्व्हर, ट्रान्सऑरेंज आणि ट्रान्सब्लू रंगांमध्ये उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)
From India’s first 10001mAh battery on realme P4 Power to all-day ease with realme Buds Clip, this combo is built to keep up without slowing you down. One powerful ecosystem. One seamless experience.
Sale starts 5th Feb, 12 PM Starting from ₹23,999*
First sale on 5th Feb, 12… pic.twitter.com/nIbHErr3Iw — realme (@realmeIndia) January 29, 2026
Realme च्या या डिव्हाईसमध्ये 6.8-इंच 1.5K 4D Curve+ हायपरग्लो डिस्प्ले दिला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 6,500 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस दिली आहे. यासोबतच या स्मार्टफनमध्ये डुअल सिम सपोर्ट आणि अँड्रॉईड 16-बेस्ड Realme UI 7.0 देण्यात आला आहे. कंपनी या फोनला तीन वर्षांचे ओएस अपग्रेड आणि चार वर्षांचे सुरक्षा अपडेट देईल.
डिव्हाईसमध्ये HDR 10+ कंटेंट सपोर्ट आणि धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP66 + IP68 + IP69 रेटिंग दिली आहे. फोनला पावर देण्यासाठी या डिव्हाईसमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 अल्ट्रा चिपसेट देण्यात आला आहे, जो 4nm प्रोसेसवर तयार करण्यात आला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये हायपरव्हिजन+ AI चिप देखील दिली आहे, जे 300% पर्यंत अधिक चांगले रेजोल्यूशन आणि 400% पर्यंत स्मूथ फ्रेम रेट ऑफर करते.
फोटोग्राफीसाठी Realme P4 Power 5G मध्ये डुअल कॅमेरा सेटअप दिला आहे, जिथे 50-मेगापिक्सेल (f/1.8) Sony IMX882 प्रायमरी, 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड लेंस आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनमध्ये 16-मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे. डिव्हाईसमध्ये खास 10,001mAh ची सिलिकॉन कार्बन टाइटन बॅटरी आहे. कंपनीचा दावा आहे की फोनची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर 32.5 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक वेळ देऊ शकते. हे डिव्हाइस 932.6 तासांपर्यंत स्टँडबाय वेळ आणि 185.7 तासांपर्यंत स्पॉटिफाय म्युझिक प्लेबॅक वेळ देऊ शकते. फोन 11.7 तासांपर्यंत गेमिंग प्लेबॅक वेळ देखील देऊ शकतो.
Ans: होय. Realme चे अनेक स्मार्टफोन भारतातच “Make in India” अंतर्गत तयार होतात.
Ans: होय. Realme चे GT आणि Narzo सिरीजमधील फोन गेमिंगसाठी ओळखले जातात. यामध्ये दमदार प्रोसेसर आणि हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले मिळतो.
Ans: Realme स्मार्टफोनमध्ये Realme UI (Android आधारित) वापरला जातो.