Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Redmi Turbo 5 Series: तगडा प्रोसेसर, मिड-रेंज किंमत आणि 7,560mAh बॅटरी… प्रीमियम डिझाईन आणि जबरदस्त फीचर्सचा परफेक्ट कॉम्बो

Redmi Turbo 5 And Redmi Turbo 5 Max: Redmi Turbo 5 Max स्मार्टफोन 4 रंगात लाँच करण्यात आला आहे तर Redmi Turbo 5 स्मार्टफोन 3 रंगात लाँच करण्यात आला आहे. Redmi Turbo 5 Max मध्ये 9000mAh बॅटरी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 31, 2026 | 09:57 AM
Redmi Turbo 5 Series: तगडा प्रोसेसर, मिड-रेंज किंमत आणि 7,560mAh बॅटरी... प्रीमियम डिझाईन आणि जबरदस्त फीचर्सचा परफेक्ट कॉम्बो

Redmi Turbo 5 Series: तगडा प्रोसेसर, मिड-रेंज किंमत आणि 7,560mAh बॅटरी... प्रीमियम डिझाईन आणि जबरदस्त फीचर्सचा परफेक्ट कॉम्बो

Follow Us
Close
Follow Us:
  • Redmi Turbo 5 Max डिव्हाईसमध्ये 9000mAh बॅटरी
  • सिरीजमधील दोन्ही स्मार्टफोनस डुअल सिम सपोर्टसह लाँच
  • Redmi Turbo 5 Max मध्ये ऑक्टा कोर 3nm मीडियाटेक डेमेन्सिटी 9500s चिपसेट
Redmi Turbo 5 सीरीज चीनमध्ये लाँच करण्यात आली आहे. कंपनीने या स्मार्टफोन सिरीजअतंर्गत दोन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. यामध्ये Redmi Turbo 5 आणि Redmi Turbo 5 Max यांचा समावेश आहे. Redmi Turbo 5 Max डिव्हाईसमध्ये 9000mAh बॅटरी आणि मीडियाटेक डेमेन्सिटी 9500s चिपसेट देण्यात आला आहे. या फोनमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे.

Moto ने उडवली सर्वांची झोप! तगड्या फीचर्ससह दोन नवे स्मार्टफोन्स लाँच, बजेट किंमत आणि दमदार बॅटरीने सुसज्ज…

Redmi Turbo 5 सीरीजची किंमत

Redmi Turbo 5 स्मार्टफोनच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 2,299 म्हणजेच सुमारे 30,000 रुपये आहे. तर डिव्हाईसच्या 12GB+512GB आणि 16GB+256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,599 म्हणजेच सुमारे 34,000 रुपये आहे. डिव्हाईसच्या टॉप मॉडेल 16GB + 512GB ची किंमत CNY 2,899 म्हणजेच सुमारे 38,000 रुपयेश आहे. हा स्मार्टफोन ऑस्पिसियस क्लाउड व्हाइट, शॅडो ब्लॅक आणि शॅलो सी ब्लू रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

Redmi Turbo 5 Max स्मार्टफोनच्या 12GB+256GB या बेस व्हेरिअंटची किंमत CNY 2,499 म्हणजेच सुमारे 33,000 रुपये, 16GB+256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,799 म्हणजेच सुमारे 37,000 रुपये, 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत CNY 2999 म्हणजेच सुमारे 40,000 रुपये आहे. 16GB+512GB या टॉप व्हेरिअंटची किंमत CNY 3,299 म्हणजेच सुमारे 44,000 रुपये आहे. हा स्मार्टफोन ऑस्पिसियस क्लाउड व्हाइट, शॅडो ब्लॅक आणि शॅलो सी ब्लू आणि सन ऑरेंज या रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)

Redmi Turbo 5 सीरीजचे फीचर्स

Redmi Turbo 5 आणि Turbo 5 Max डुअल सिम सपोर्टसह लाँच करण्यात आले आहेत, जे अँड्रॉईड 16 वर आधारित शाओमीच्या लेटेस्ट HyperOS 3 वर चालतात. Redmi Turbo 5 मध्ये 6.59-इंच (1,268×2,756 पिेक्सल) AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत, टच सँपलिंग 480Hz पर्यंत आणि पीक ब्राइटनेस 3500 निट्स आहे. या स्मार्टफोनचा डिस्प्ले वेट हँड टच 2.0 सपोर्टसह येतो. Turbo 5 Max मध्ये 6.83-इंच (1,280×2,772 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेचे फीचर्स स्टँडर्ड टर्बोसारखेच आहेत.

Redmi Turbo 5 Max मध्ये ऑक्टा कोर 3nm मीडियाटेक डेमेन्सिटी 9500s चिपसेट देण्यात आला आहे. हा प्रोसेसर 3.73GHz च्या स्पीडवर क्लॉक आहे. Turbo 5 डिव्हाईस मीडियाटेक डेमेन्सिटी 8500 अल्ट्राने सुसज्ज आहे, ज्याची स्पीड 3.4GHz वर क्लॉक आहे. दोन्ही फोन 16GB पर्यंत LPDDR5x अल्ट्रा रॅम आणि 512GB च्या UFS 4.1 स्टोरेजसह लाँच करण्यात आले आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये IP66 + IP68 + IP69 + IP69K रेटिंग देण्यात आली आहे.

Redmi Note 15: एकदा चार्ज करा, दिवसभर वापरा! तगड्या बॅटरीसह भारतात नव्या स्मार्टफोनचे आगमन, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर Redmi Turbo 5 सीरीजमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. दोन्हीमध्ये 8-मेगापिक्सेल (f/2.2) चा अल्ट्रावाइड कॅमेरा देण्यात आला आहे. प्रायमरी कॅमेरा सेंसरबद्दल बोलायचं झालं तर Turbo 5 Max मध्ये 50-मेगापिक्सेल (f/1.5) लाईट हंटर 600 लेंस दिला आहे. तर Turbo 5 मध्ये 50-मेगापिक्सेल (f/1.5) Sony IMX882 मेन शूटर दिला आहे. दोन्ही फोनमध्ये 20-मेगापिक्सेल (f/2.2) फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. Redmi Turbo 5 Max स्मार्टफोनमध्ये 9,000mAh बॅटरी देण्यात आली आहे तर Turbo 5 मध्ये 7,560mAh बॅटरी दिली आहे. रेडमीचे दोन्ही स्मार्टफोन्स 100W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 27W रिवर्स वायर्ड चार्जिंग सपोर्टसह येतात. कंपनीने लाँच केलेल्या दोन्ही लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये 5G, 4G LTE, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि ब्लूटूथ 5.4 कनेक्टिविटी ऑफर केली जात आहे. Turbo 5 Max मध्ये Wi-Fi 7 आणि Turbo 5 मध्ये Wi-Fi 6 चा सपोर्ट देणयात आला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Redmi आणि Xiaomi यात काय फरक आहे?

    Ans: Redmi हा बजेट आणि मिड-रेंज स्मार्टफोनसाठी ओळखला जातो, तर Xiaomi ब्रँड अंतर्गत प्रीमियम आणि फ्लॅगशिप फोन येतात.

  • Que: Redmi फोन भारतात तयार होतात का?

    Ans: होय, Redmi चे अनेक स्मार्टफोन Make in India उपक्रमांतर्गत भारतात तयार केले जातात.

  • Que: Redmi फोनमध्ये कोणता UI असतो?

    Ans: Redmi फोनमध्ये MIUI किंवा HyperOS (नवीन मॉडेल्समध्ये) दिले जाते, जे Android वर आधारित आहे.

Web Title: Redmi turbo 5 series launched smartphones are equipped with powerful processor and amazing features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 09:57 AM

Topics:  

  • Redmi
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Moto ने उडवली सर्वांची झोप! तगड्या फीचर्ससह दोन नवे स्मार्टफोन्स लाँच, बजेट किंमत आणि दमदार बॅटरीने सुसज्ज…
1

Moto ने उडवली सर्वांची झोप! तगड्या फीचर्ससह दोन नवे स्मार्टफोन्स लाँच, बजेट किंमत आणि दमदार बॅटरीने सुसज्ज…

रील्स-गेम्स-स्क्रोलिंग… भारतीय तरुण डिजिटल व्यसनाच्या विळख्यात, आर्थिक सर्वेक्षणातून समोर आले धक्कादायक वास्तव
2

रील्स-गेम्स-स्क्रोलिंग… भारतीय तरुण डिजिटल व्यसनाच्या विळख्यात, आर्थिक सर्वेक्षणातून समोर आले धक्कादायक वास्तव

Realme P4 Power: कंटाळा येईल, पण चार्जिंग संपणार नाही! 10,001mAh ‘टाइटन बॅटरी’ वाला स्मार्टफोन लाँच, प्रतिस्पर्ध्यांना फुटणार घाम
3

Realme P4 Power: कंटाळा येईल, पण चार्जिंग संपणार नाही! 10,001mAh ‘टाइटन बॅटरी’ वाला स्मार्टफोन लाँच, प्रतिस्पर्ध्यांना फुटणार घाम

Redmi Note 15: एकदा चार्ज करा, दिवसभर वापरा! तगड्या बॅटरीसह भारतात नव्या स्मार्टफोनचे आगमन, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
4

Redmi Note 15: एकदा चार्ज करा, दिवसभर वापरा! तगड्या बॅटरीसह भारतात नव्या स्मार्टफोनचे आगमन, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.