Ai+ भारतात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज! 4,999 रुपयांच्या किंमतीत Smartphone लाँच, 5000mAh बॅटरीसह मिळणार अनोखे फीचर्स
तुम्ही देखील बजेट आणि दमदार स्मार्टफोनच्या शोधात आहात का? तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर आहे. कारण टेक ब्रँड Ai+ ने आज दोन नवीन बेजटट स्मार्टफोन भारतात लाँच केले आहेत. कंपनीने आज 8 जुलै रोजी AI+ Pulse आणि Nova 5G हे दोन स्मार्टफोन्स भारतात लाँच केले आहेत. भारतातील इतर बजेट स्मार्टफोन्सना टक्कर देण्यासाठी आता AI+ सज्ज झाला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नव्या बजेट स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत.
AI+ Pulse आणि Nova 5G हे दोन्ही कंपनीचे नवीन आणि बजेट व्हेरिअंट आहे. सर्वात विशेष म्हणजे या स्मार्टफोनची किंमत 4,999 रुपयांपासून सुरु होते. म्हणजेच या स्मार्टफोनमुळे बजेट किंमतीत अनोख्या फीचर्सचा अनुभव घेता येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 50MP रियर कॅमेरा आणि 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. Ai+ स्मार्टफोन लाइनअपमध्ये दोन स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत, ज्यामध्ये Pulse आणि Nova 5G यांचा समावेश आहे. दोन्ही डिव्हाईसमध्ये 6.7-इंच HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. AI+ Pulse मध्ये T615 चिपसेट आणि Nova 5G मध्ये T8200 चिप देण्यात आली आहे. दोन्ही मॉडेलमध्ये 50-मेगापिक्सेलचा डुअल AI कॅमेरा, 5,000mAh बॅटरी आणि साइड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. हा फोन 5 आकर्षक रंगात लाँच करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – X)
AI+ Nova कंपनीचा 5G स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.75 इंचचा डिस्प्ले देण्यात आला आहे, याचा रिफ्रेश रेट 90 हर्ट्ज आहे. या फोनमध्ये Unisoc T8200 चिपसेटसह 8GB रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. फोनमध्ये 50MP कॅमेरा देण्यात आला आहे, तर सेल्फीसाठी 32MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे, ज्याला फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. कनेक्टिविटीसाठी हँडसेटमध्ये वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ, डुअल सिम स्लॉट आणि यूएसबी टाईप-सी पोर्ट देण्यात आला आहे.
AI+ Pulse 4G फोन आहे. फोनमध्ये 12nm Unisoc T7250 चिपसेट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP कॅमेरा देण्यात आला आहे. एवढंच नाही तर डिव्हाईसमध्ये फंक्शनिंगसाठी NxtQuantum ऑपरेटिंग सिस्टमचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये फेस अनलॉकसह फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. कनेक्टिविटीसाठी स्मार्टफोनमध्ये वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ, ऑडियो जॅक आणि यूएसबी टाईप-सी पोर्टसारखे काही फीचर्स देण्यात आले आहेत.
AI+ Pluse 4G च्या 4GB+64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 4999 रुपये आणि AI+ Pluse 4G च्या 6GB+128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 6999 रुपये आहे. AI+ Nova 5G च्या 6GB+128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 7999 रुपये आणि AI+ Nova 5G च्या 8GB+128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 9999 रुपये आहे.