नव्या अवतारात लाँच झाली OnePlus Nord सिरीज...पावरफुल बॅटरीसह मिळणार अनेक कमाल फीचर्स! किंमत केवळ इतकी
OnePlus युजर्स गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या स्मार्टफोन सिरीजमध्ये कंपनीने दोन डिव्हाईस लाँच केले आहेत. या डिव्हाईसमध्ये Nord 5 आणि Nord CE 5 यांचा समावेश आहे. या दोन्ही डिव्हाईसमध्ये Android 15 पाहायला मिळतात. कंपनीने लाँच केलेल्या या फ्लॅगशिप डिव्हाईसमध्ये खास AI फीचर्स देण्यात आले आहेत. Nord 5 कंपनीचा दुसरा हँडसेट आहे, जो नवीन प्रोग्रामेबल प्लस Key ने सुसज्ज आहे. तर मागील मॉडेलमध्ये अलर्ट स्लाइडर देण्यात आला आहे. OnePlus च्या दोन्ही डिव्हाईसमध्ये 50 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा ऑफर करतात.
OnePlus Nord 5 च्या बेस व्हेरिअंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजची किंमत 31,999 रुपये आहे. 12GB+256GB च्या व्हेरिअंटची किंमत 34,999 रुपये आणि 12GB+512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 37,999 रुपये आहे. हे डिव्हाईस ड्राय आइस, मार्बल सँड्स आणि फँटम ग्रे कलरमध्ये लाँच करण्यात आले आहे. या स्मार्टफोनची पहिली विक्री 9 जुलैपासून दुपारी 12 वाजता सुरु होणार आहे. या Nord CE 5 च्या बेस व्हेरिअंट 8GB+128GB स्टोरेजची किंमत 24,999 रुपये, 8GB+256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 26,999 रुपये ठेवण्यात आली आहे. Nord CE 5 ची विक्री 12 जुलैपासून अॅमेझॉनवर प्राइम डे सेलच्या वेळी सुरु होणार आहे. (फोटो सौजन्य – X)
The all-new #OnePlusNord5 just dropped. Sale goes live on July 9th, 12 Noon IST for India and July 8th, 11 AM CEST for Europe. #UpYourGame pic.twitter.com/dIOrgR4nlk
— OnePlus (@oneplus) July 8, 2025
OnePlus Nord 5 चे स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर डिव्हाईसमध्ये 6.83 इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये 144Hz रिफ्रेश रेट आणि 1,800nits पर्यंत ब्राइटनेस देण्यात आली आहे. डिव्हाईसमध्ये पावरफुल स्नॅपड्रॅगन 8s जेन 3 चिपसेट देण्यात आला आहे, ज्याच्यासोबत 12GB पर्यंत LPDDR5x रॅम देण्यात आली आहे. कॅमेराबाबत बोलायचं झालं तर डिव्हाईसमध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामध्ये LYT-700 सेंसर आणि ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन सपोर्ट देण्यात आला आहे.
डिव्हाईसमध्ये प्रायमरी कॅमेरा वनप्लस 13s मध्ये देखील आहे. डिव्हाईसमध्ये f/2.2 अपर्चर आणि 120-डिग्री फील्ड ऑफ व्यू वाला 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा देखील आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी डिव्हाईसमध्ये सॅमसंग ISOCELL JN5 सेंसर आणि f/2.0 अपर्चरसह 50-मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये 6,800mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये 80W SuperVOOC चार्जिंग सपोर्ट देखील आहे.
CE 5 मध्ये पावरफुल मीडियाटेक 8350 एपेक्स चिपसेट पाहायला मिळतो, ज्याच्यासोबत 12GB पर्यंत LPDDR5x रॅम आणि 256GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज देण्यात आला आहे. यासोबतच डिव्हाईसमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 1400 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देण्यात आला आहे. तर डिव्हाईसमध्ये नॉर्ड 5 च्या तुलनेत थोडी छोटी 6.77-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.
कॅमरेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर नॉर्ड CE 5 मध्ये Sony LYT-600 सेंसर आणि OIS सह 50-मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी डिव्हाईसमध्ये 16-मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये 7,100mAh बॅटरी देण्यात आला आहे, यामध्ये SuperVOOC 80W फास्ट चार्जिंग देखील आहे.