OnePlus Nord 5 vs Realme 15 Pro 5G: मिड रेंजमध्ये कोण आहे खरा बादशाह? तुमच्यासाठी कोणतं डिव्हाईस ठरणार बेस्ट?
मिड-रेंज स्मार्टफोन्सच्या दुनियेत अनेक स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत, मात्र त्यातील बेस्ट स्मार्टफोन्स कोणते आहे, याबाबत अनेकजण गोंधळतात. आता आम्ही तुम्हाला OnePlus Nord 5 आणि Realme 15 Pro 5G या दोन स्मार्टफोनबाबत सांगणार आहोत. या दोन्हीमधील कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ठरणार, जाणून घेऊया.
OnePlus Nord 5 आणि Realme 15 Pro 5G हे दोन्ही स्मार्टफोन्स 31,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध आहेत. तथापि, OnePlus च्या या किमतीत बँक ऑफर्स समाविष्ट आहेत, तर त्याची वास्तविक किंमत 32,999 रुपये आहे. तर Realme कोणत्याही ऑफर्सशिवाय या दरात उपलब्ध आहे. म्हणजेच, दोन्ही स्मार्टफोनची किंमत एकच आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Nord 5 मध्ये Qualcomm Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो 4nm टेक्नोलॉजीला सपोर्ट करतो. यासोबतच या डिव्हाईसमध्ये 7300mm² चा मोठा वेपर कूलिंग सिस्टम देण्यात आला आहे, ज्यामुळे गेमिंग आणि मल्टीटास्किंग स्मूद होते. तर Realme 15 Pro 5G मध्ये Snapdragon 7 Gen 4 प्रोसेसर देण्यात आला आहे. वनप्लस 4 वर्षांसाठी अँड्रॉइड अपडेट्स आणि 6 वर्षांचा सिक्युरिटी सपोर्ट देत असताना, रिअलमी फक्त 3 वर्षांसाठी ओएस अपडेट्स देईल.
Realme 15 Pro 5G मध्ये कर्व्ड AMOLED डिस्प्ले, ग्लास बॅक आणि पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी IP68/IP69 रेटिंग आहे. Nord 5 मध्ये क्लीन फ्लॅट स्क्रीन डिझाईन आणि फेमस अलर्ट स्लाइडर ऐवजी “Plus Key” बटन देण्यात आले आहे, जे कस्टम शॉर्टकटसाठी उपयुक्त आहे. त्याचे IP65 रेटिंग थोडे कमी आहे आणि त्याचे वजन 211 ग्रॅम आहे.
Realme 15 Pro 5G मध्ये 7,000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. Nord 5 मध्ये 6,800mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 80W SUPERVOOC चार्जिंग सपोर्ट आहे. दोन्ही फोन बॅटरी आणि चार्जिंगच्या बाबतीत मजबूत आहेत.
Realme 15 Pro 5G मध्ये मागे आणि समोर दोन्ही बाजूंना 50MP कॅमेरे आहेत, ज्यामध्ये मुख्य, अल्ट्रावाइड आणि सेल्फी यांचा समावेश आहे. तिन्ही कॅमेरे 4K 60fps व्हिडिओ रेकॉर्डिंगला समर्थन देतात. यात “Edit Genie” हे AI वैशिष्ट्य देखील आहे जे स्मार्टपणे फोटो एडिट करते. Nord 5 मध्ये सोनीचा 50MP LYT-600 सेन्सर आणि 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.
Nord 5 मध्ये 6.83-इंच फ्लॅट AMOLED स्क्रीन आहे 1.5K रेजोल्यूशन आणि 1800 निट्स ब्राइटनेस आहे. Realme 15 Pro 5G मध्ये 6.8-इंच कर्व्ड AMOLED स्क्रीन आहे.