
Google Translate चा खेळ खल्लास? OpenAI ने केला सायलेंट धमाका! ChatGPT साठी आणलं नवं फीचर
ChatGPT ट्रांसलेटचे लेआऊट बऱ्याच प्रमाणात पाहताना सध्या उपलब्ध असलेल्या ट्रांसलेशन टूल्स सारखेच दिसत आहे. यामध्ये इनपुट आणि आउटपुटसाठी दोन टेक्स्ट बॉक्स देखील देण्यात आले आहेत. टूल ऑटोमॅटिक लँग्वेज डिटेक्शनला सपोर्ट करते. या टूलमध्ये यूजर्सना 50 हून अधिक भाषांमध्ये ट्रांसलेशनची सुविधा मिळणार आहे. बेसिक लेवल हे टूल यूजर्सना असेच फीचर्स ऑफर करत आहेत, ज्यांची अपेक्षा यूजर्स एखाद्या ट्रांसलेशन प्लॅटफॉर्मकडून करतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
गुगल ट्रांसलेटमध्ये वर्ड टू वर्ड ट्रांसलेशनवर जास्त लक्ष दिलं जातं. पण चॅटजीपीटी ट्रांसलेशन एक वेगळा मार्ग निवडतो. यामध्ये वन-टॅप ऑप्शन देण्यात आले आहे, ज्याच्या मदतीने यूजर्स ट्रांसलेट करण्यात आलेला टेक्स्ट त्वरीत रिफाइन देखील करू शकतात. यूजर ट्रांसलेशन अधिक नैसर्गिक स्वरात बदलू शकतात, फॉर्मल बिजनेस स्टाइलपासून ते मुलांसाठी किंवा शैक्षणिक वापरासाठी सोप्या भाषेत टेक्स्ट ट्रांसलेट केला जाऊ शकतो.
एवढंच नाही तर यामध्ये कोणत्याही ऑप्शनवर क्लिक केल्यास तुम्ही थेट प्रायमरी चॅटजीपीटी एक्सपीरियंसवर पोहोचणार आहात, जिथे जनरेटिव AI च्या मदतीने टेक्स्ट अधिक सुधारले जाईल.कंपनीचा फोकस केवळ ट्रांसलेशनवर नसेल, तर यामध्ये टोन, ऑडियंस आणि इंटेंट समजण्यावर देखील फोकस केला जाणार आहे.
ओपनएआयने लाँच केलेल्या या नवीन फीचरमुळे गुगल आणि चॅटजीपीटीमध्ये एक नवीन युद्ध सुरु झालं आहे. एजेंटिक एआई टूलपासून इमेज आणि व्हिडीओ जेनरेटिंग टूलनंतर आता या दोन्ही कंपन्यांमध्ये एआई ट्रांसलेशनचे युद्ध सुरु झालं आहे. ओपनएआयने अलीकडेच चॅटजीपीटी ट्रांसलेट टूल लाँच केले आहे. यालाच उत्तर देण्यासाठी गूगलने जेमिनी एआई बेस्ड TranslateGemma लाँच केले आहे. हे टूल 55 भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी सक्षम आहे. तर ओपनएआयचे चॅटजीपीटी यूजर्सना 50 हून अधिक भाषांमध्ये ट्रांसलेशनची सुविधा देतो.
Ans: ChatGPT मशीन लर्निंग आणि मोठ्या भाषा मॉडेल्सच्या मदतीने तुमच्या प्रश्नांचा अर्थ समजून योग्य उत्तर तयार करते.
Ans: ChatGPT मराठी, हिंदी, इंग्रजीसह अनेक आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये संवाद साधू शकते.
Ans: ChatGPT Translate हे संदर्भ, भावना आणि अर्थ लक्षात घेऊन भाषांतर करणारे AI फीचर आहे, जे शब्दशः नव्हे तर नैसर्गिक भाषांतर देते.