Airtel Recharge Plan: हे आहेत 1.5GB डेली डेटा ऑफर करणारे बेस्ट रिचार्ज प्लॅन! दिर्घकाळ व्हॅलिडीटीसह मिळणार हे फायदे, वाचा किंमत
एयरटेल त्यांच्या ग्राहकांना एक 84 दिवसांची व्हॅलिडीटी देणारा प्लॅन ऑफर करते. या रिचार्ज प्लॅनची किंमत 859 रुपये आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना 1.5GB डेली डेटा ऑफर केला जातो. त्यामुळे ज्यांना जास्त डेटाची आवश्यकता असते अशा लोकांसाठी हा रिचार्ज प्लॅन एक चांगला पर्याय ठरतो. 859 रुपयांच्या या प्लॅनमध्ये डेली डेटासोबतच अनलिमिटेड लोकल, STD आणि रोमिंग कॉल्स देखील मिळतात. याशिवाय ग्राहकांना या प्लॅनमध्ये रोज 100 एसएमएस देखील मिळतात. याशिवाय स्पॅम प्रोटेक्शन आणि फ्री हेलोट्यून्स देखील या प्लॅनमध्ये समाविष्ट आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर तुम्ही 1.5GB डेली डेटासह कमी किंमतीत उपलब्ध असणारा रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर 799 रुपयांचा रिचार्ज प्लॅन देखील तुमच्यासाठी एक चांगली निवड ठरू शकते. 799 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये देखील यूजर्सना रोज 1.5GB डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये यूजर्सना 77 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये देखील 859 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनप्रमाणेच अनलिमिटेड लोकल, STD आणि रोमिंग कॉल्स आणि रोज 100 एसएमएस देखील दिले जाणार आहेत. स्पॅम प्रोटेक्शन आणि फ्री हेलोट्यून्स बेनिफिट्स देखील या प्लॅनमध्ये मिळणार आहेत.
जर तुम्हाला 2 महिन्यांसाठी म्हणजेच 60 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करणारा रिचार्ज प्लॅन पाहिजे असेल तर तुम्ही 619 रुपयांचा रिचार्ज प्लॅन निवडू शकता. या प्लॅनमध्ये देखील रोज 1.5GB डेटा ऑफर केला जातो. यासोबतच कंपनीच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस देखील मिळतात. यामध्ये स्पॅम प्रोटेक्शन आणि फ्री हेलोट्यून्सव्यतिरिक्त एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले देखील दिले जाणार आहे.






