Oppo Find X8 Pro Price Dropped: Oppo Find X9 लाँच होण्यापूर्वीच स्वस्त झाला जुना स्मार्टफोन, मोठ्या बॅटरीसह दमदार फीचर्सनी सुसज्ज
टेक कंपनी Oppo लवकरच भारतीय बाजारात त्यांची नवीन Oppo Find X9 सीरीज लाँच करणार आहे. ही नवीन सिरीज लाँच होण्यापूर्वी कंपनीने अलीकडेच लाँच केलेल्या Oppo Find X8 Pro च्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. क्रोमावर Oppo Find X8 Pro च्या खरेदीवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन हाय-एंड स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही डिल तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन ठरू शकते. कारण या डिलमध्ये तुम्हाला अलीकडेच लाँच करण्यात आलेला Oppo Find X8 Pro कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
Oppo Find X8 Pro स्मार्टफोनमध्ये एक खास पॉवरफुल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये मोठी बॅटरी लाइफ आणि स्टाइलिश डिझाईन देण्यात आले आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी पावरफुल तसेच वर्थ इट डिव्हाईस म्हणून ओळखला जातो. या स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या डिल्स आणि ऑफर्सबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
Oppo चे हे जबरदस्त डिव्हाईस भारतात 99,999 रुपयांत लाँच करण्यात आले होते. मात्र आता या डिव्हाईसची किंमत क्रोमाच्या वेबसाईटवर अत्यंत कमी झाली आहे. त्यामुळे आता हे प्रिमियम डिव्हाईस ऑफर्स आणि डिस्काऊंटसह अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. क्रोमावर उपलब्ध असलेल्या ऑफर्स आणि डिस्काऊंटसह Oppo Find X8 Pro हा प्रिमियम स्मार्टफोन केवळ 86,999 रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो. याचा अर्थ Oppo Find X8 Pro या प्रिमियम स्मार्टफोनच्या खरेदीवर 13,000 रुपयांचे फ्लॅट डिस्काउंट ऑफर केले जात आहे. मात्र फ्लिपकार्टवर या डिव्हाईसची किंमत 99,999 रुपये झाली आहे.
प्रिमियम स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर या डिव्हाईसमध्ये 6.78-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4500 निट्सची पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. ज्यासोबत हे डिव्हाईस 120Hz पर्यंत रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. हे डिव्हाईस डॉल्बी विजनला देखील सपोर्ट करते. फोनला पावर देण्यासाठी यामध्ये मीडियाटेक 9400 चिपसेट देण्यात आला आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये 5910 mAh बॅटरी देण्यात आली आहे. हे डिव्हाईस 80W फास्ट वायर्ड चार्जिंग सपोर्ट आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
फोन आणि फ्लशची जोडी ठरत आहे ‘घातक’! नव्या अभ्यासाने उघड केले धक्कादायक सत्य, डॉक्टरांनी दिलाय इशारा
फोटोग्राफीसाठी या डिव्हाईसमध्ये मागील बाजूस क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये 50MP चा Sony LYT808 प्राइमरी कॅमेरा, 3x ऑप्टिकल झूमवाला 50MP चा Sony LYT600 पेरिस्कोप टेलीफोटो लेंस, 6x ऑप्टिकल झूम आणि 120x डिजिटल झूमवाला 50MP चा Sony IMX858 कॅमेरा आणि 50MP चा सॅमसंग अल्ट्रा वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय या डिव्हाईसमध्ये पुढील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.