Noise Master Buds Max: दणकट बॅटरी आणि लक्झरी डिझाईन... Noise ने लाँच केले दमदार हेडफोन, सेगमेंटच्या बेस्ट ANC सपोर्टने सुसज्ज
टेक कंपनी Noise ने भारतात नवीन ओवर-ईयर हेडफोन लाँच केले आहेत. कंपनीने हे नवीन ओवर-ईयर हेडफोन Noise Master Buds Max या नावाने भारतात लाँच केले आहेत. हे नवीन ओवर-ईयर हेडफोन बोसच्या सहकार्याने विकसित केले गेले आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, या नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या ओवर-ईयर हेडफोनमध्ये High-Quality Expertly-Tuned Audio देण्यात आला आहे. यासोबतच सेगमेंटचा बेस्ट ANC आणि 60 तासांचा प्लेटाइम ऑफर करतो. सुरुवातीच्या ऑफर अंतर्गत हे ओवर-ईयर हेडफोन 10,000 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी केले जाऊ शकतात. तुम्ही देखील 10 हजार रुपयांच्या बजेटमध्ये एक उत्तम ओवर-ईयर हेडफोन्स शोधत असाल तर Noise Master Buds Max तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहेत.
ओवर-ईयर हेडफोनच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर Noise Master Buds Max हेडफोन 9,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहेत. हे ओवर-ईयर हेडफोन gonoise.com वर टाइटेनियम (बेज), सिल्वर आणि ओनिक्स (ब्लॅक) या तीन रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे. सुरुवातीच्या ऑफर अंतर्गत हे ओवर-ईयर हेडफोन 10,000 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी केले जाऊ शकतात. त्यामुळे ज्यांना नवीन हेडफोन खरेदी करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही बेस्ट संधी आहे. (फोटो सौजन्य – X)
नॉइज मास्टर बड्स मॅक्स हेडफोनमध्ये साउंड ट्यूनिंगचा वापर करण्यात आला आहे. यासोबतच या हेडफोनमध्ये तुम्हाला 40 मिमी ड्राइवर देखील मिळणार आहेत, जो LHDC सारखे हाय-रेजोल्यूशन कोडेक्सने सुसज्ज आहेत. एवढंच नाही तर अॅपद्वारे हेडफोनमध्ये तुम्ही एक डायनामिक इक्वलाइजरचा देखील वापर करू शकता, जे वेगवेगळ्या ऐकण्याच्या परिस्थितीत स्पष्ट ऑडिओ देईल.
या हेडफोनमध्ये 5 माइक्रोफोन देण्यात आले आहेत, जे ‘सेगमेंटमध्ये बेस्ट अॅक्टिव नॉइस कँसलेशन परफॉर्मेंस’ ऑफर करतात, जे रियल टाइममध्ये 40db (डेसिबल) पर्यंत एम्बिएंट साउंडला ब्लॉक केले जाऊ शकते. इंजिनचा आवाज किंवा पार्श्वभूमीतील गोंधळ यासारख्या कमी आणि मध्यम-फ्रिक्वेन्सी श्रेणींमध्ये हे हेडफोन्स 85 टक्क्यांपर्यंत चांगले परफॉर्म करतात असे म्हटले जाते.
हे हेडफोन एकदा चार्ज केल्यानंतर 60 तासांची बॅटरी लाईफ ऑफर करते आणि फास्ट चार्जिंगसह केवळ 10 मिनिटांत 10 तासांपर्यंत वापरण्यायोग्य चार्ज करते. हेडफोन एक मखमली पाउचसह लाँच करण्यात आले आहे. तुम्ही नॉईज वरून सुएड मायक्रोफायबर लाइनिंगसह व्हेगन लेदर कॅरींग केस देखील खरेदी करू शकता.