काय सांगता! चक्क रंग बदलणार स्मार्टफोन, स्टायलिश लूक आणि आकर्षक डिझाईनसह Oppo चे नवीन डिव्हाईस लाँच... असे आहेत स्पेसिफिकेशन्स
Oppo ने Reno 14 स्मार्टफोनचा नवीन सन अँड मूनलाइट कलर व्हेरिअंट लाँच केला आहे. हा एक कलर चेंजिंग व्हेरिअंट आहे, ज्याची विक्री चीनमध्ये 11 जुलैपासून सुरु होणार आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, स्मार्टफोनमध्ये खास टेम्प्रेचर सेंसिटिव बॅक पॅनल देण्यात आला आहे, ज्यामुळे आजूबाजूच्या तापमानानुसार फोन त्याचा रंग बदलतो. या फोनची प्री ऑर्डर आधीच सुरु करण्यात आली आहे. ओप्पो रेनो 14 च्या सन अँड मून लाइट कलर एडिशन स्मार्टफोनची किंमत देखील प्रिमियम रेंजमध्ये आहे.
Oppo Reno 14 च्या सन अँड मूनलाइट एडिशन स्मार्टफोनमध्ये हीट रिअॅक्टिव बॅक पॅनल देण्यात आला आहे, जो आजूबाजूच्या तापमानानुसार मूनलाइट सिल्वर कलरवरून सनलाइट ऑरेंज कलरमध्ये शिफ्ट करतो. हे डिव्हाईस माइनस 15 डिग्री सेल्सियसच्या टेम्प्रेचरमध्ये वाइब्रेंट ऑरेंज कलर ऑफर करतो. तर टेंप्रेचर 70 डिग्री सेल्सियस असेल तर बॅक पॅनलचा रंग सिल्वर होतो. Oppo चं असं म्हणणं आहे की, ट्रांजिशनदरम्यान, फोनच्या मागील बाजूस दोन्ही रंग दिसतात, जे त्याला विजुअली डायनमिक लुक ऑफर करतात. पूर्वी, रंग बदलण्यासाठी इलेक्ट्रोक्रोमिक डिझाइनचा वापर केला जात होता. या फोनमध्ये, ही प्रक्रिया ऑटोमेटिक आहे, जी थेट वातावरणाशी जूळवून घेऊन रंग बदलते. (फोटो सौजन्य – X)
Oppo Reno 14 चा सन अँड मूनलाइट कलर व्हेरिअंट चार रंगात लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 12GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिअंंटची किंमत 2,699 युआन म्हणजेच सुमारे 32,237 रुपये, 16GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिअंंटची किंमत 2,999 युआन म्हणजेच सुमारे 35,820 रुपये, 12GB रॅम + 512GB स्टोरेज व्हेरिअंंटची किंमत 2,999 युआन म्हणजेच सुमारे 35,820 रुपये, 16GB रॅम + 512GB स्टोरेज व्हेरिअंंटची किंमत 3,299 युआन म्हणजेच सुमारे 39,403 रुपये आहे. हा कलर व्हेरिअंट अद्याप ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केला नाही.
Oppo Reno 14 स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 8350 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन 16 जीबी पर्यंत रॅम आणि 512 जीबीपर्यंत स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 6.59-इंचाचा फ्लॅट नॅरो-बेजल डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये 6000mAh बॅटरी आहे, जी 80 वाट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये IP66/68/69 रेटिंग आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे. यासोबतच फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा पेरिस्कोपिक टेलीफोटो लेंस देखील आहे. हा फोन कॅमेरा लेंस 3.5X झूम सपोर्टसह येतो. यासोबतच फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड सेंसर देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉयड 15 वर आधारित ColorOS 15 वर चालतो.