Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घराच्या सुरक्षेसाठी Panasonic ची स्मार्ट एंट्री! भारतात लाँच झाली नवी व्हिडीओ इंटरकॉम सिस्टीम

भारतातील शहरी भागांत गेटेड कम्युनिटीज, बहुमजली इमारती आणि एकात्मिक टाऊनशिप्सचा झपाट्याने विस्तार होत आहे, ज्‍यामुळे प्रगत आणि स्थिर सुरक्षा उपायांची गरज अत्यंत महत्त्वाची बनली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 23, 2026 | 01:37 PM
घराच्या सुरक्षेसाठी Panasonic ची स्मार्ट एंट्री! भारतात लाँच झाली नवी व्हिडीओ इंटरकॉम सिस्टीम

घराच्या सुरक्षेसाठी Panasonic ची स्मार्ट एंट्री! भारतात लाँच झाली नवी व्हिडीओ इंटरकॉम सिस्टीम

Follow Us
Close
Follow Us:
  • गेटेड कम्युनिटीसाठी मोठी सुरक्षा अपडेट! Panasonic ने आणली स्मार्ट इंटरकॉम सिस्टीम
  • फेस रेकग्निशन ते QR Access; Panasonic ची नवी सुरक्षा यंत्रणा भारतात दाखल
  • घराच्या सुरक्षेला स्मार्ट अपग्रेड! Panasonic ची प्रगत IP व्हिडीओ इंटरकॉम सिस्टीम लाँच
पॅनासोनिक लाइफ सोल्यूशन्स इंडियाने भारतात आपली नवीन व्‍हीएल-व्‍हीक्‍यू सिरीज एसआयपी आधारित आयपी व्हिडिओ इंटरकॉम सिस्टम लाँच केली. आधुनिक निवासी संकुले आणि मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये सुरक्षा, संवाद आणि प्रवेश व्यवस्थापन अधिक सुगम करण्‍याचा या सिस्‍टमचा मुख्य उद्देश आहे. भारतातील शहरी भागांत गेटेड कम्युनिटीज, बहुमजली इमारती आणि एकात्मिक टाऊनशिप्सचा झपाट्याने विस्तार होत आहे, ज्‍यामुळे प्रगत आणि स्थिर सुरक्षा उपायांची गरज अत्यंत महत्त्वाची बनली आहे. ही वाढती गरज ओळखून पॅनासोनिकची ही नवीन यंत्रणा एकाच व्यासपीठाद्वारे थ्री-लेअर्ड सिक्युरिटी (त्रिस्तरीय सुरक्षा) प्रदान करते. यामध्ये पॅनासोनिकच्या सेंटर मॅनेजमेंट सॉफ्टवेअरद्वारे (सीएमएस) अनेक प्रवेशद्वार आणि संवाद केंद्रांचे मध्यवर्ती नियंत्रण केले जाते, ज्यामुळे निवासी सुरक्षा व्यवस्थापन अधिक स्मार्ट आणि कार्यक्षम होते.

टेलीकॉम सेक्टरमध्ये होणार मोठा बदल! या दोन कंपन्या एकत्र येण्याची शक्यता, यूजर्सवर कसा होणार परिणाम? जाणून घ्या

अपार्टमेंट्स, गेटेड कम्युनिटीज आणि मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी डिझाइन केलेली व्‍हीएल-व्‍हीक्‍यू सिरीज ही फक्त साधी व्हिडिओ डोअर फोन यंत्रणा नसून निवासस्थाने, इमारतींचे प्रवेशद्वार आणि मध्यवर्ती सुरक्षा केंद्र या तिन्ही स्तरांवर मजबूत सुरक्षा यंत्रणा उभी करते. ही यंत्रणा डोअर स्टेशन्स, लॉबी डिस्प्ले स्टेशन्स, रूम मॉनिटर्स, गार्ड स्टेशन्स आणि सीएमएस यांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणते. यामुळे रहिवासी आपल्या स्मार्टफोनद्वारे अभ्यागतांशी संवाद साधू शकतात आणि त्यांना प्रवेश देऊ शकतात. तर दुसरीकडे, सुरक्षा पथक प्रवेशद्वारे, आयपी कॅमेरे आणि अभ्यागतांच्या हालचालींवर रिअल-टाइममध्ये लक्ष ठेवू शकतात. फेस रेकग्निशन, क्यूआर कोड आणि रिमोट अनलॉकिंग अशा विविध पर्यायांसह ही यंत्रणा मोठ्या निवासी संकुलांमध्ये सुलभ व नियंत्रित प्रवेश व्यवस्थापनाची खात्री देते.

पॅनासोनिक एंटरटेनमेंट अँड कम्युनिकेशन कंपनी लिमिटेडचे चीफ बिझनेस प्लॅनिंग टोमो काझुया म्हणाले, ”जगभरातील निवासी संकुले आता सर्वोत्तम इंटेलिजेंट सिस्टम्सच्या शोधात आहेत, ज्या सुरक्षा, कनेक्टिव्हिटी आणि सोयीसुविधांना विनासायासपणे एकत्र आणतात. पॅनासोनिकमध्ये, आम्ही आयपी-आधारित सुरक्षा उपाय प्रगत करण्यासाठी कटिबद्ध आहोत, जे एकाच व्यासपीठावर संवाद, प्रवेश नियंत्रण आणि मध्यवर्ती व्यवस्थापन एकत्रित करतात. व्‍हीएल-व्‍हीक्‍यू सिरीजच्‍या सादरीकरणामधून विश्वासार्ह आणि अत्याधुनिक सुरक्षा उपाय उपलब्ध करून देण्यावर आमचा असलेला सातत्यपूर्ण भर दिसून येतो.”

या लाँचबद्दल मत व्‍यक्त करत पॅनासोनिक लाइफ सोल्यूशन्स इंडियाच्‍या सिक्‍युरिटी सोल्‍यूशन्‍सचे असोसिएट डायरेक्टर आणि नॅशनल बिझनेस चीफ गुंजन सचदेव म्हणाले, ”पॅनासोनिकमध्ये आम्‍ही एकात्मिक सुरक्षा परिसंस्‍था विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करतो, ज्या आधुनिक निवासी समुदायांच्या बदलत्या गरजा पूर्ण करतील. शहरी पायाभूत सुविधांचा विस्तार होत आहे आणि निवासी प्रकल्प अधिक मोठे व गुंतागुंतीचे होत आहेत, तसतसे प्रगत आणि एकमेकांशी जोडलेल्या सुरक्षा उपायांची मागणी वाढत आहे. आमची आयपी व्हिडिओ इंटरकॉम सिस्टम सुधारित प्रवेश व्यवस्थापन, विनाअडथळा संवाद आणि मध्यवर्ती देखरेख प्रदान करण्यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. यामुळे रहिवाशांना अधिक सुरक्षित आणि स्मार्ट जीवनमान मिळेल, तर दुसरीकडे डेव्‍हलपर्स आणि फॅसिलिटी टीम्सना कार्यक्षम सुरक्षा व्यवस्थापन करणे शक्य होईल.”

पॅनासोनिक व्हिडिओ इंटरकॉम व्हीएल-व्‍हीक्‍यू सिरीज खालीलप्रमाणे अनेक कार्यात्मक आणि वापरकर्ता-केंद्रित फायदे प्रदान करते:

एकत्रित यंत्रणा – डोअर स्टेशन्स, लॉबी डिस्प्ले स्टेशन्स, रूम मॉनिटर्स, गार्ड स्टेशन्स आणि सेंट्रल मॅनेजमेंट सॉफ्टवेअर यांना जोडणारा हा एकच आयपी-आधारित प्‍लॅटफॉर्म आहे, ज्यामुळे विखुरलेल्या सुरक्षा यंत्रणांची गरज भासत नाही.

मल्टी-पॉइंट स्मार्ट एंट्री – यामध्ये फेस रेकग्निशन, आयसी कार्ड्स, क्यूआर कोड्स, स्मार्टफोन आणि डिजिटल अॅक्‍सेस अशा विविध प्रवेश पद्धतींचा समावेश आहे आणि या सर्वांचे मध्यवर्ती व्यवस्थापन केले जाते.

WhatsApp Update: काय सांगता! सीक्रेट मेसेज वाचल्यानंतर आपोआप होणार डिलीट, लवकरच येणार नवं फीचर

विनासायास एकत्रीकरण – या यंत्रणेमधील एसआयपी आधारित संरचना सध्याच्या आयपी पायाभूत सुविधेशी सहज जोडली जाते, ज्यामध्ये आयपी कॅमेरे, डिजिटल डोअर लॉक्स आणि इतर थर्ड-पार्टी सुरक्षा यंत्रणांचा समावेश होतो.

विस्तारक्षम आणि भविष्यासाठी सज्ज – स्वतंत्र घरांपासून मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांपर्यंत आणि एकात्मिक टाऊनशिप्सपर्यंत सर्वांना सुरक्षिततेची खात्री देण्यासाठी ही यंत्रणा डिझाइन केली आहे.

रिअल-टाइम सिक्‍युरिटी इंटेजिलन्‍स – मध्यवर्ती यंत्रणा व्यवस्थापनाद्वारे अभ्यागतांचे प्रत्‍यक्ष निरीक्षण, अलार्म नोटिफिकेशन्स आणि प्रवेशाची नोंद ठेवणे शक्य होते.

रिमोट अॅक्‍सेस आणि नियंत्रण – पॅनासोनिकच्या सीएमएस प्लॅटफॉर्मद्वारे स्मार्टफोनच्या माध्यमातून रहिवासी दुरून अभ्यागतांवर लक्ष ठेवू शकतात, त्यांच्याशी संवाद साधू शकतात आणि घराचे दार उघडू शकतात.

मोठ्या निवासी प्रकल्पांसाठी डिझाइन केलेल्या संपूर्ण आयपी व्हिडिओ इंटरकॉम इकोसिस्टम व्यतिरिक्त पॅनासोनिक वैयक्तिक घरे आणि लहान निवासी प्रकल्पांसाठी खास तयार केलेले किट मॉडेल-व्‍हीएल-व्‍हीक्‍यूएस३०० (KIT Model-VL-VQS300) देखील उपलब्ध करून देत आहे. या किट मॉडेलमध्ये डोअर स्टेशन आणि रूम मॉनिटर एकत्रितपणे एकाच सोप्या व सुलभ व्हिडिओ डोअर फोन (व्‍हीडीपी) सोल्यूशनच्या स्वरूपात दिले जातात. मोठ्या प्रमाणावरील मल्‍टी-डिवाईस सिस्‍टमची आवश्‍यकता नसलेल्‍या घरमालकांसाठी हे मॉडेल डिझाइन करण्यात आले आहे. हे किट एका सोयीस्कर पॅकेजमध्ये दोन्ही डिवाईसेसमधील मुख्य संवाद आणि प्रवेश वैशिष्ट्ये एकत्रितपणे प्रदान करते.

सुरक्षित संवादासाठी डिझाइन करण्‍यात आलेले प्रगत हार्डवेअर:

लॉबी डिस्प्ले स्टेशन (VL-VQ9000SX)

लॉबी डिस्प्ले स्टेशन हे मध्यवर्ती प्रवेश केंद्र म्हणून काम करते. यामध्ये ७-इंच क्षमतेचा टच-सक्षम आयपीएस डिस्प्ले आहे. तसेच फेस रेकग्निशन, आयसी कार्ड, क्यूआर कोड, पासवर्ड आणि स्मार्टफोन-आधारित प्रवेश अशा प्रगत बहु-प्रवेश प्रमाणीकरण सुविधा यात आहेत. टिकाऊ अॅल्युमिनियम अलॉय बॉडीमध्ये बसवलेले हे डिवाईस फुल एचडी वाईड-अँगल ड्युअल कॅमेरा आणि नाईट व्हिजनसह सज्ज आहे, ज्यामुळे इमारतीच्या प्रवेशद्वारावर अभ्यागतांचे सुरक्षित आणि विश्वासार्ह व्यवस्थापन सुनिश्चित होते.

डोअर स्‍टेशन (VL-VQ1000SX)

डोअर स्टेशन हे प्रवेशद्वारावरील देखरेख अधिक उत्तमप्रकारे करण्यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. यामध्ये १४५° पर्यंतचा विस्तीर्ण तिरपा व्ह्यू देणारा फुल एचडी वाईड-अँगल कॅमेरा आहे, ज्यामुळे अभ्यागतांची ओळख स्पष्टपणे पटते. याची ४-वायर प्लग-अँड-युज यंत्रणा अत्यंत जलद आणि विनाअडथळा इन्स्टॉलेशन करण्यास मदत करते. तसेच, यातील इन-बिल्ट व्हाईट एलईडी नाईट व्हिजनमुळे अंधुक प्रकाशातही सातत्याने स्पष्ट देखरेख करणे शक्य होते.

रूम मॉनिटर (VL-VQ3000SX)

रूम मॉनिटर रहिवाशांना ७-इंच क्षमतेचा टच-सक्षम इनडोअर मॉनिटर प्रदान करतो. अभ्यागतांशी स्पष्ट आणि रिअल-टाइम संवाद साधण्यासाठी यामध्ये फुल एचडी व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा आहे. इन-बिल्ट वाय-फाय कनेक्टिव्हिटी आणि आयओएस व अँड्रॉईड डिवाईसेससाठी स्मार्टफोन अॅप एकीकरणामुळे रहिवासी कोठूनही दरवाजावरील संवादाचे दुरून निरीक्षण आणि व्यवस्थापन करू शकतात.

गार्ड स्टेशन (VL-VQ7000SX)

गार्ड स्टेशन हे अँड्रॉईड-आधारित कन्सोल आहे, जे ७-इंच कॅपेसिटिव्ह टच डिस्प्ले आणि फुल एचडी व्हिडिओ रेकॉर्डिंग क्षमतेने सज्ज आहे. हा डिवाईस सुलभ आणि उच्‍च-दर्जाच्या व्हिज्युअल मॉनिटरिंगसाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. हा डिवाईस एसआयपी, अलार्म आणि आरटीएसपी सारख्या उद्योग-मानक प्रोटोकॉल्सना सपोर्ट करतो. तसेच, हा डिवाईस थर्ड-पार्टी एसआयपी डिवाईसेसशी आणि आयपी सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यांशी जोडता येऊ शकतो, ज्यामुळे विविध प्रकारच्या सुरक्षा यंत्रणांमध्ये या डिवाईसची स्थिर मांडणी करणे शक्य होते.

या लाँचसह, पॅनासोनिक लाइफ सोल्‍यूशन्‍स इंडियाने आपल्या कनेक्टेड सोल्यूशन्स पोर्टफोलिओचा विस्तार सुरू ठेवला आहे. हे पाऊल भारतातील झपाट्याने होणारे शहरीकरण आणि स्मार्ट निवासी पायाभूत सुविधांच्या वाढत्या वापराशी सुसंगत आहे.

Web Title: Panasonic launches smart ip video intercom system in india for advanced residential security

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 01:37 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

WhatsApp Update: काय सांगता! सीक्रेट मेसेज वाचल्यानंतर आपोआप होणार डिलीट, लवकरच येणार नवं फीचर
1

WhatsApp Update: काय सांगता! सीक्रेट मेसेज वाचल्यानंतर आपोआप होणार डिलीट, लवकरच येणार नवं फीचर

फोल्डेबल iPhone ची प्रतिक्षा वाढली! Apple ने पुन्हा बदलली रणनिती, या महिन्यात विक्रीला सुरुवात होण्याची शक्यता
2

फोल्डेबल iPhone ची प्रतिक्षा वाढली! Apple ने पुन्हा बदलली रणनिती, या महिन्यात विक्रीला सुरुवात होण्याची शक्यता

Free Fire Max: गेममध्ये प्रो प्लेअर बनायचं? असा मारा परफेक्ट हेडशॉट आणि जिंका प्रत्येक मॅच
3

Free Fire Max: गेममध्ये प्रो प्लेअर बनायचं? असा मारा परफेक्ट हेडशॉट आणि जिंका प्रत्येक मॅच

इंटरनेट नसेल तरी पेमेंट थांबणार नाही! UPI चे ऑफलाइन पेमेंट फीचर करणार तुमची मदत, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही प्रोसेस
4

इंटरनेट नसेल तरी पेमेंट थांबणार नाही! UPI चे ऑफलाइन पेमेंट फीचर करणार तुमची मदत, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही प्रोसेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.