Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pixel 11 VS iPhone 17: कोण आहे खरा किंग? कॅमेऱ्यापासून किंमतीपर्यंत… खरेदीपूर्वी वाचा संपूर्ण तुलना

Pixel VS iPhone: आयफोन की गुगल पिक्सेल? तुम्ही देखील गोंधळला आहात का? गूगल पिक्सेल 11 आणि ॲपल आयफोन 17 हे दोन्ही प्रीमियम सेगमेंटमधील दमदार स्मार्टफोन्स आहेत. कॅमेरा, डिस्प्ले, परफॉर्मन्स, बॅटरी आणि किंमत या बाबतीत दोन्ही फोनमध्ये महत्त्वाचे फरक आहेत, त्यामुळे खरेदीपूर्वी तुलना जाणून घेणे फायदेशीर ठरेल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 17, 2026 | 10:49 AM
Pixel 11 VS iPhone 17: कोण आहे खरा किंग? कॅमेऱ्यापासून किंमतीपर्यंत... खरेदीपूर्वी वाचा संपूर्ण तुलना

Pixel 11 VS iPhone 17: कोण आहे खरा किंग? कॅमेऱ्यापासून किंमतीपर्यंत... खरेदीपूर्वी वाचा संपूर्ण तुलना

Follow Us
Follow Us:
  • किंमतीच्या बाबतीत आयफोन 17 स्वस्त असून त्याची सुरुवातीची किंमत 82,900 रुपये आहे, तर पिक्सेल 11 ची किंमत 89,999 रुपयांपासून सुरू होते.
  • पिक्सेल 11 मध्ये 4,985mAh बॅटरी आणि 5x ऑप्टिकल झूमसह ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो, तर आयफोन 17 मध्ये A19 चिप आणि ड्युअल 48MP कॅमेरा आहे.
  • फोटोग्राफीसाठी पिक्सेल 11 अधिक व्हर्सेटाइल वाटतो, तर व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी आयफोन 17 अधिक चांगला पर्याय ठरू शकतो.
टेक कंपनी गूगलने अलीकडेच त्यांची नवीन पिक्सेल 11 सिरीज भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केली आहे. या सिरीजमधील स्टँडर्ड पिक्सेल 11 स्मार्टफोनची स्पर्धा आता थेट आयफोन 17 सोबत केली जात आहे. खरं तर हे दोन्ही डिव्हाईस प्रिमियम प्राईज सेगमेंमटध्ये उपलब्ध आहेत. मात्र या दोन्ही स्मार्टफोन्सच्या फीचर्स आणि परफॉर्मंसमध्ये मोठ्या प्रमाणात फरक पाहायला मिळत आहे. तुम्ही जर पिक्सेल 11 किंवा आयफोन 17 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या दोन्ही स्मार्टफोन्सची तुलना वाचून तुमच्या लक्षात येईल, की कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी योग्य ठरणार आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

Tech Tips: तुम्हीही Digital Wallet वापरताय? सायबर फ्रॉडपासून बचावासाठी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

Pixel 11 VS iPhone 17: किंमत

पिक्सेल 11 चे 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंट 89,999 रुपये आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंट 1,04,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. आयफोन 17 चे 256GB मॉडेल 82,900 रुपये आणि 512GB मॉडेल 1,02,900 रुपयांत उपलब्ध आहे. याचा अर्थ असा की, सुरुवातीच्या किमतीच्या बाबतीत आयफोन 17 हा सध्या स्वस्त पर्याय आहे.

Pixel 11 VS iPhone 17: डिस्प्ले आणि डिझाईन

दोन्ही डिव्हाईसमध्ये 6.3 इंच ओएलईडी डिस्प्ले आणि 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट मिळणार आहे. पिक्सेल 11 मध्ये Actua OLED पॅनल मिळणार आहे, ज्याचे रेजोल्यूशन 1080 x 2424 पिक्सेल आणि पीक ब्राइटनेस 3,000 निट्सपर्यंत आहे. यामध्ये गोरिला ग्लास व्हिक्टस 2 चे प्रोटेक्शन देखील मिळणार आहे. दुसरीकडे, आयफोन 17 मध्ये सुपर रेटिना एक्सडीआर ओएलईडी डिस्प्ले, प्रोमोशन आणि ऑलवेज ऑन डिस्प्ले मिळणार आहे. याचे सिरॅमिक शील्ड 2 जुन्या मॉडेलच्या तुलनेत जास्त स्क्रॅच प्रोटेक्शन ऑफर करतात. डिझाईनबद्दल बोलायचं झालं तर, आयफोन जास्त पातळ आणि हलका आहे.

Pixel 11 VS iPhone 17: परफॉर्मंस आणि बॅटरी

नव्या पिक्सेल 11 मध्ये गूगलचा लेटेस्ट टेंसर G6 चिपसेट आणि टायटन M3 सिक्योरिटी कोप्रोसेसर मिळणार आहे. यासोबतच, फोनमध्ये 4,985mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 30W वायर्ड आणि 25W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. तर आयफोन 17 मध्ये ॲपलचा A19 चिप आहे. यामध्ये 6-कोर सीपीयू, 5-कोर जीपीयू आणि 16-कोर न्यूरल इंजिन मिळणार आहे.

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Pixel 11 VS iPhone 17: कॅमेरा

पिक्सेल 11 मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 48MP प्रायमरी कॅमेरा, 13MP अल्ट्रावाइड आणि 10.8MP टेलीफोटो कॅमेरा मिळणार आहे. टेलीफोटो लेंस 5x ऑप्टिकल झूम सपोर्टसह येतो. सेल्फीसाठी या डिव्हाईसमध्ये 10.5MP कॅमेरा दिला आहे. दुसरीकडे आयफोन 17 मध्ये 48MP प्रायमरी आणि 48MP अल्ट्रावाइड के सह डुअल कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 18MP चा फ्रंट कॅमेरा आहे आणि सेंटर स्टेज फीचर देखील मिळणार आहे. फोटोग्राफीसाठी ‘पिक्सेल 11’ अधिक वर्सेटाइल वाटतो, तर व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी ‘आयफोन 17’ हा अधिक चांगला पर्याय मानला जाऊ शकतो.

Web Title: Pixel 11 vs iphone 17 who is real king of smartphone read whole comparison including camera and price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 10:49 AM

Topics:  

  • google pixel
  • iphone
  • smartphone

संबंधित बातम्या

Oppo ग्राहकांच्या खिशाला कात्री! K14 आणि A6 सीरीज खरेदीसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे, जाणून घ्या स्मार्टफोनच्या नव्या किंमती
1

Oppo ग्राहकांच्या खिशाला कात्री! K14 आणि A6 सीरीज खरेदीसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे, जाणून घ्या स्मार्टफोनच्या नव्या किंमती

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे
2

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे

7000mAh बॅटरी अन् पावरफुल प्रोसेसर! Motorola च्या नव्या स्मार्टफोनने केला धमाका… जाणून घ्या किंमत
3

7000mAh बॅटरी अन् पावरफुल प्रोसेसर! Motorola च्या नव्या स्मार्टफोनने केला धमाका… जाणून घ्या किंमत

रोबोट म्हणावं की कॅमेरा? Honor ने लाँच केला जगातील पहिला Robot Phone; अनोख्या डिझाईनने वेधलं यूजर्सचं लक्ष
4

रोबोट म्हणावं की कॅमेरा? Honor ने लाँच केला जगातील पहिला Robot Phone; अनोख्या डिझाईनने वेधलं यूजर्सचं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.