
POCO C85 5G या दिवशी भारतात लाँच होणार, 6,000mAh ची बॅटरी, काय आहे किंमत?
बॅटरी नाविन्यता पोकोची सर्वात प्रमुख खासियत आहे. ग्राहकांच्या स्मार्ट ऊर्जा कार्यक्षमता, फास्ट चार्जिंग आणि सडपातळ, पण दीर्घकाळापर्यंत टिकणाऱ्या डिवाईसेसप्रती अपेक्षा बदलत असताना पोको श्रेणीचे नेतृत्व करत आहे. यंदा एफ७, एक्स७ सिरीज आणि एम७ प्लस अशा लाँचेससह ब्रँडने बॅटरी कार्यक्षमतेसाठी उद्योग मापदंडांना सतत नव्या उंचीवर नेले आहे. हा ट्रेण्ड पोको सी८५ ५जी ला अधिक प्रबळ करतो.
पोको सी८५ ५जी तरूण स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या दैनंदिन गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे, जेथे विश्वसनीयता, दीर्घकाळापर्यंत टिकाऊपणा आणि स्टाइलवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आकर्षक ड्युअल-टोन फिनिश आणि स्लीक, स्लिम प्रोफाइलसह पोको सी८५ ५जी भारतीयांच्या व्यस्त जीवनशैलीशी जुळण्याकरिता डिझाइन करण्यात आला आहे. या डिवाईसमधील उच्च क्षमतेची ६००० एमएएच बॅटरी, तसेच ३३ वॅट फास्ट चार्जिंग आणि १० वॅट रिव्हर्स चार्जिंग डिवाईस दिवसभर कार्यरत राहण्याची खात्री देतात, तसेच हा डिवाईस सहजपणे हातामध्ये मावतो. वापरकर्त्यांना सामान्य वापरासह बॅटरी दोन दिवसांहून अधिक कार्यरत राहण्याची खात्री मिळते, ज्यामुळे हा विश्वासार्ह सोबती आहे आणि डिवाईसला सतत चार्जिंग करण्याची गरज भासत नाही.
केव्ही अनावरणाचा भाग म्हणून आज पोको इंडियाच्या सोशल मीडिया चॅनेल्सवर पोको सी८५ ५जी चा पहिला लुक लाइव्ह प्रसारित करण्यात आला आहे. स्मार्टफोन अधिकृतरित्या भारतात मंगळवार, ९ डिसेंबर २०२५ रोजी लाँच करण्यात येईल.
अलीकडेच, एका अहवालात असे दिसून आले आहे की, पोको सी८५ ५जी गुगल प्ले कन्सोलवर २५०८सीपीसी२बीआय मॉडेल क्रमांकासह दिसला आहे. हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी ६१००+ चिपसेटद्वारे समर्थित असेल, ज्यामध्ये दोन आर्म कॉर्टेक्स ए७६ कोर आणि सहा आर्म कॉर्टेक्स ए५५ कोर असू शकतात.
पोको सी८५ ५जीवरील प्रोसेसर कदाचित २.२०GHz ची पीक क्लॉक स्पीड देऊ शकतो. शिवाय, सूचीबद्ध युनिट 4GB रॅम आणि अँड्रॉइड 16 सह दिसले. त्यात 720×1,600 पिक्सेल रिझोल्यूशनसह डिस्प्ले असू शकतो, तसेच सेल्फी कॅमेरा होस्ट करण्यासाठी वॉटरड्रॉप-स्टाईल नॉच देखील असू शकतो.