Poco च्या नवीन स्मार्टफोनची लाँच डेट कन्फर्म, या दिवशी भारतात करणार एंट्री! किंमत 7 हजारांहून कमी
चीनची टेक कंपनी असलेल्या Xiaomi चा स्मार्टफोन ब्रँड Poco ने त्यांच्या आगामी स्मार्टफोनचा टीझर शेअर केला आहे. याच आठवड्यात कंपनीचा आगामी स्मार्टफोन भारतात लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनची किंमत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये बसणारी आहे. किंमत कमी असली तरी देखील फीचर्समध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. कमी किंमतीत लाँच केला जाणारा कंपनीचा हा एक पावरफुल स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन Poco C71 या नावाने भारतात एंट्री करणार आहे.
iOS 19 अपडेट युजर्ससाठी घेऊन येणार सरप्राईज, बदलणार iPhone चा लूक! काय असणार खास, जाणून घ्या
कंपनी गेल्या काही काळापासून या स्मार्टफोनचे टीझर शेअर करत आहे. आता देखील कंपनीने एक टिझर शेअर करत आगामी स्मार्टफोनची लाँच डेच कन्फर्म केली आहे. आता फोनसाठी एक वेगळी मायक्रोसाइट देखील लाईव्ह झाली आहे जी आता फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. असं सांगितलं जात आहे की, स्मार्टफोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तसेच पोकोच्या वेबसाइटद्वारे विकले जाईल. (फोटो सौजन्य – X)
Poco C71 4 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता देशात लाँच होईल. हे सॉफ्ट लाँच असेल म्हणजेच फोनच्या किंमती आणि इतर तपशील दुपारी 12 वाजता उघड केले जातील. तुम्ही हा फोन पोकोच्या वेबसाइट, फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या सोशल मीडिया चॅनेलवरून खरेदी करू शकता. लाँच होण्यापूर्वीच, कंपनीने फोनच्या अनेक वैशिष्ट्यांचे अनावरण केले आहे, ज्यामुळे अधिकृत लाँचपूर्वीच Poco C71 बद्दल बरीच माहिती समोर आली आहे.
Enroute Blockbuster Beginnings ✨
Launching on 4th April on #Flipkart
Know More: https://t.co/o3TCULUAbm#POCOC71 #TheUltimateBlockBuster pic.twitter.com/lmv9lgl7w5
— POCO India (@IndiaPOCO) March 31, 2025
कंपनीने पुष्टी केली आहे की हा एंट्री-लेव्हल स्मार्टफोन 5,200mAh क्षमतेच्या मोठ्या बॅटरीसह येईल, जी पोकोच्या मते या सेगमेंटमधील आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी असेल. यासोबतच, स्मार्टफोन 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल आणि बॉक्समध्ये 15W चार्जिंग अॅडॉप्टर देखील उपलब्ध असेल. असेही सांगितले जात आहे की Poco C71 ची किंमत 7,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते.
यासोबतच, कंपनीने असेही सांगितले आहे की या स्मार्टफोनमध्ये 6.88 -इंचाचा डिस्प्ले असू शकतो, जो या किंमत सेगमेंटमधील कोणत्याही स्मार्टफोनवर उपलब्ध असलेला सर्वात मोठा डिस्प्ले असेल. फ्लिपकार्ट मायक्रोसाइट पुष्टी करते की डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. फोनचा डिस्प्ले वेट टच डिस्प्लेला देखील सपोर्ट करेल, म्हणजेच तुमचे हात ओले असले तरीही डिस्प्ले पूर्णपणे रिस्पॉन्सिव्ह राहील.
याशिवाय, पोकोने देखील पुष्टी केली आहे की हा फोन पॉवर ब्लॅक, कूल ब्लू आणि डेझर्ट गोल्ड या तीन रंगांमध्ये येईल. हे डिव्हाईस IP52 रेटिंगसह येईल, याचा अर्थ हे उपकरण पाणी आणि धूळ यांचे किरकोळ नुकसान सहन करू शकते.
फोटोग्राफीसाठी, या डिव्हाइसमध्ये 32-मेगापिक्सेलचा ड्युअल कॅमेरा सेटअप असेल, तसेच सेल्फीसाठी 8-मेगापिक्सेल कॅमेरा असेल.
याशिवाय, Poco C71 मध्ये 12GB रॅम असेल. कंपनीने दावा केला आहे की, इतका रॅम असणारा या सेगमेंटमधील हा पहिलाच स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन Android 15 आउट-ऑफ-द-बॉक्स ऑफर करेल ज्यामध्ये 2 वर्षांचे अँड्रॉइड अपडेट्स आणि 4 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स असतील. कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, 3.5mm हेडफोन जॅक आणि ड्युअल वाय-फाय बँड सारखी वैशिष्ट्ये देखील असतील.