Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान मोदींच्या हस्ते इंडिया मोबाइल काँग्रेस 2024 चे उद्घाटन, ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित

इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 ईव्हेंट आज 15 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या ईव्हेंटमध्ये अनेक डिव्हाईस लाँच केले जाणार आहेत. इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 ईव्हेंटमध्ये 900 स्टार्टअप्स सहभागी होणार आहेत. आज 15 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC) ईव्हेंटमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि जनरेटिव्ह AI (Gen AI) वर खूप लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 15, 2024 | 12:32 PM
पंतप्रधान मोदींच्या हस्ते इंडिया मोबाइल काँग्रेस 2024 चे उद्घाटन, ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित

पंतप्रधान मोदींच्या हस्ते इंडिया मोबाइल काँग्रेस 2024 चे उद्घाटन, ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित

Follow Us
Close
Follow Us:

भारताची राजधानी नवी दिल्ली येथील प्रगती मैदान येथील इंडिया पॅव्हेलियन येथे इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 ईव्हेंट आयोजित करण्यात आला आहे. या ईव्हेंटला आजपासून सुरुवात झाली असून पुढील 3 दिवस म्हणजेच 18 ऑक्टोबरपर्यंत हा ईव्हेंट सुरु राहणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ईव्हेंटचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भारताचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, रिलायंस जियो इन्फोकॉम लिमिटेडचे चेअरपरसन आकाश अंबानी देखील उपस्थित होते. इंडिया मोबाइल काँग्रेसची ही आठवी आवृत्ती आहे, ज्यामध्ये भारतासह जगभरातील अनेक टेक स्टार्ट-अप कंपन्या त्यांचे अनोखे आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान प्रदर्शित करणार आहेत. भारताच्या या टेक इव्हेंटमध्ये जगभरातील 190 हून अधिक देशांनी सहभाग घेतला आहे.

हेदेखील वाचा- AI वर आधारित इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 ईव्हेंटला आजपासून सुरुवात, 900 स्टार्टअप्स होणार सहभागी

इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 ईव्हेंटमध्ये काय विशेष

यंदा आयोजित करण्यात आलेला इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 हा AI वर आधारित आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि जनरेटिव्ह AI चे महत्त्व या ईव्हेंटच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणार आहे. या ईव्हेंटमध्ये भारतात विकिसत होत असलेल्या 6G वर देखील भाष्य केले जाऊ शकते. कार्यक्रमाची थीम ‘द फ्यूचर इज नाऊ’ आहे. या ईव्हेंटमध्ये क्लाउड आणि एज कंप्युटिंग, IoT, सेमीकंडक्टर्स, सायबर सुरक्षा, ग्रीन टेक, सॅटकॉम आणि इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगशी संबंधित माहिती दिली जाणार आहे. (फोटो सौजन्य – X)

इंडिया मोबाइल काँग्रेसच्या वेबसाईटवर असे म्हटले आहे की सॅटेलाइट कम्युनिकेशन, 5G आणि 6G, डीप टेक, सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगबद्दल अपडेट्स दिले जातील. येथे तुम्हाला क्लीन टेक आणि डेटा सिक्युरिटी सारख्या विषयांवर देखील माहिती मिळेल.IMC 2024 दरम्यान, कंपन्या 6G विकासाबद्दल माहिती शेअर करू शकतात. या ईव्हेंटचे अपडेट्स इंडिया मोबाइल काँग्रेसच्या एक्स अकाऊंटवर शेअर केले जात आहेत.

हेदेखील वाचा- आता गुगल मॅप सांगाणार कोणता फ्लायओव्हर घ्यायचा! या 8 शहरांसाठी आलं फीचर

आकाश अंबानी आणि सिंधिया उपस्थित

या कार्यक्रमात बडे नेते आणि अनेक बडे उद्योजक सहभागी झाले होते. दूरसंचार विभागाने शेअर केलेल्या उद्घाटनाच्या व्हिडिओमध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, रिलायन्स जिओचे चेअरपर्सन आकाश अंबानी यांच्यासह अनेक उद्योगपती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागे दिसत होते. IMC 2024 च्या वेबसाइटवर सूचीबद्ध केलेल्या तपशीलांनुसार, या कार्यक्रमात मोठे नेते आणि अनेक मोठे उद्योगपती सहभागी होणार आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, रिलायन्स जिओचे चेअरपर्सन आकाश अंबानी, भारती एंटरप्रायझेसचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील मित्तल आणि आदित्य बिर्ला समूहाचे कुमार एम बिर्ला यांच्या नावांचा समावेश आहे.

टेलिकॉमच्या सामर्थ्याचे सर्वात उज्वल उदाहरण म्हणजे DBT- ज्योतिरादित्य सिंधिया

यावेळी भारताचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितलं की, भारताचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना म्हणाले, “गेल्या वर्षी भारताने G20 शिखर परिषदेचे आयोजन केले होते. त्याचप्रमाणे, WTSA असेंब्लीचे आयोजन करण्याचा मान आम्हाला मिळाला आहे, जी भारतात प्रथमच होत आहे.

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पुढे सांगितलं की, आमच्याकडे 160 हून अधिक देशांतील 3,200 प्रतिनिधी आहेत, जे कोणत्याही WTSA असेंब्लीच्या इतिहासातील सर्वात जास्त आहे. टेलिकॉमच्या सामर्थ्याचे सर्वात उज्वल उदाहरण म्हणजे DBT म्हणजे Direct Benefit Transfer योजना, जी दररोज 10 दशलक्षाहून अधिक लोकांच्या बँक खात्यांमध्ये थेट रोख हस्तांतरण करते. दूरसंचार क्षेत्रात, ज्यांच्याकडे संसाधने आहेत आणि ज्यांच्याकडे नाहीत त्यांच्यातील दरी आम्ही वेगाने कमी करत आहोत.

Web Title: Prime minister naredra modi inaugurated the india mobile congress 2024 in the presence of jyotiraditya scindia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2024 | 12:06 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.