Realme 15 Pro चा खास गेम ऑफ थ्रोन्स एडिशनल लवकरच होणार लाँच, अमेझिंग लूक आणि स्टायलिश डिझाईन... या फीचर्सनी असणार सुसज्ज
Realme 15 Pro गेल्या महिन्यात Realme 15 बेस मॉडलसह लाँच करण्यात आला होता. आता एका रिपोर्टनुसार असं सांगितलं जात आहे की, या स्मार्टफोनचे एक नवीन वर्जन लाँच केले जाणार आहे. स्मार्टफोनचे हे नवीन वर्जन Game of Thrones असणार आहे. हे लिमिटेड एडिशन एक सर्टिफिकेशन प्लॅटफॉर्मवर लिस्ट करण्यात आले आहे. ज्यामुळे असा अंदाज लावला जात आहे की, हा स्मार्टफोन लवकरच लाँच केला जाऊ शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार, या एडिशनमध्ये कोणत्याही प्रकारचे हार्डवेयर अपग्रेड दिलं जाणार नाही. केवळ स्मार्टफोनच्या डिझाईन आणि लूकमध्ये बदल केला जाणार आहे. चीनी स्मार्टफोन ब्रँडने आतापर्यंत या डिव्हाईसबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. म्हणजेच हे डिव्हाईस कधी लाँच होणार, त्याचे फीचर्स कसे असणार, त्याची किंमत किती असणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या लीक्सवरून स्मार्टफोनच्या फीचर्सचा अंदाज लावला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य – X)
Xpertpick ने सादर केलेल्या अहवालानुसार, ‘Realme 15 Pro 5G Game of Thrones L.E.’ या नावाने एक स्मार्टफोन मलेशिया के SIRIM सर्टिफिकेशन प्लॅटफॉर्मवर दिसला आहे. यामध्ये मॉडेल नंबर RMX5101 हा दिसत आहे, जो रेगुलर वर्जनप्रमाणेच आहे. ज्यामुळे असं मानलं जात आहे की, स्पेशल एडिशनमध्ये कोणताही हार्डवेयर बदल केला जाणार नाही. मलेशियामध्ये लाँच करण्यासाठी या स्मार्टफोनला मान्यता देण्यात आली आहे, परंतु इतर बाजारपेठांमध्ये ते लाँच केले जाईल की नाही हे स्पष्ट नाही. भारतात स्मार्टफोनची लाँचिंग कधी होणार, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
रिपोर्टवरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की, Game of Thrones वर्जनमध्ये कस्टम-थीम डिझाईन, यूनिक UI एलिमेंट्स, कलेक्टेबल्स, स्टिकर्स आणि सीरीज-इंस्पायर्ड लिमिटेड एडिशन बॉक्स दिला जाण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप कंपनीने याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.
Realme 15 Pro 5G च्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलयचं झालं तर, Realme 15 Pro 5G मध्ये 6.8-इंच AMOLED स्क्रीन, 144Hz रिफ्रेश रेट आणि Corning Gorilla Glass 7i प्रोटेक्शन ऑफर केले जाते. हा फोन Snapdragon 7 Gen 4 प्रोसेसर, 12GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 512GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. फोन Android 15-बेस्ड Realme UI 6 वर चालतो. Realme 15 Pro 5G च्या कॅमेरा सेटअपमध्ये 50MP Sony IMX896 प्राइमरी सेंसर आणि 50MP अल्ट्रावाइड लेंस दिला जातो. फ्रंटला 50MP चा सेल्फी कॅमेरा ऑफर केला जातो. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,000mAh बॅटरी दिली जाते.