Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

realme 16x 5G ची एन्ट्री! 7000mAh ‘Titan’ बॅटरी अन् पॉवरफुल परफॉर्मन्स; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

realme 16x 5G launch Features: रिअलमीने आपल्या नंबर सिरीजमधील नवीन realme 16x 5G स्मार्टफोन लाँच केला असून, यात 7000mAh Titan बॅटरी, 45W SUPERVOOC फास्ट चार्जिंग आणि 144Hz अल्ट्रा-ब्राइट डिस्प्ले देण्यात आला आहे. दमदार परफॉर्मन्स, मनोरंजन आणि दीर्घकालीन वापर लक्षात घेऊन तयार करण्यात आलेला हा स्मार्टफोन तरुण ग्राहकांसाठी आकर्षक

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 13, 2026 | 06:56 PM
realme 16x 5G ची एन्ट्री! 7000mAh ‘Titan’ बॅटरी अन् पॉवरफुल परफॉर्मन्स; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Follow Us
Follow Us:
  • realme 16x 5G ची एन्ट्री
  • 7000mAh ‘Titan’ बॅटरी अन् पॉवरफुल परफॉर्मन्स
  • जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
भारतीय तरुणांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेला स्मार्टफोन ब्रँड रिअलमीने आज आपल्या नंबर सिरीजमधील सर्वात नवीन स्मार्टफोन रिअलमी 16x5G लाँच करण्याची घोषणा केली. या श्रेणीतील ‘’सर्वोत्कृष्ट ऑल-राऊंडर स्मार्टफोन’’ म्हणून ओळखला जाणारा रिअलमी 16x5G हा आजच्या धावपळीच्या आणि नेहमी सक्रिय राहणाऱ्या जीवनशैलीला सुसंगत अशा प्रकारे डिझाइन केला गेला आहे. या डिव्हाइसमध्ये या श्रेणीतील सर्वोत्तम 7000mAh ची टायटन बॅटरी 45W SUPERVOOC फास्ट चार्जिंग, 144Hz चा अल्ट्रा ब्राइट डिस्प्ले आणि 5 वर्षांपर्यंतची सातत्यपूर्ण अशी उत्कुष्ट कामगिरी देण्याची क्षमता आहे; ज्यामुळे आजच्या वेगवान जीवनशैलीला आवश्यक असलेली जबरदस्त ताकद, उत्तम मनोरंजन आणि दीर्घकालीन विश्वासार्हता मिळते.

Digital Indiaने बदललं तुमचं आयुष्य? रोजच्या ‘या’ गोष्टींकडे कदाचित तुमचं लक्षच गेलं नसेल

5 वर्षे अखंडित आणि उत्कृष्ट कामगिरी, प्रगत गेमिंग आणि 144Hz अल्ट्रा-ब्राइट डिस्प्ले

realme 16x 5G ची रचना अशा पद्धतीने करण्यात आलेली आहे की, तो अनेक वर्षे सातत्याने उत्कृष्ट असा स्मार्टफोन अनुभव देतो; ज्यामुळे दैनंदिन वापरासाठी हा एक सर्वोत्तम फोन ठरतो. यामध्ये 6nm प्रक्रियेवर आधारित MediaTek Dimensity 6300 5G या चिपसेटचा वापर करण्यात आलेला असून, वेगवान मल्टीटास्किंग आणि कार्यक्षम कामगिरीसाठी यामध्ये 18GB पर्यंत डायनॅमिक रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेजची सुविधा देण्यात आली आहे.

Android 16 वर आधारित realme UI 7.0 वर चालणारे हे डिव्हाइस रिअलमीच्या Flux Engine आणि Flux Animation या तंत्रज्ञानाचा वापर करते. यामुळे सिस्टमचा प्रतिसाद सुधारतो, ॲप्स जलदगतीने सुरू होतात आणि स्क्रोलिंग, गेमिंग किंवा ॲप्समधील बदलांच्या दरम्यान ॲनिमेशन्स अत्यंत सहज आणि सुरळीत वाटतात. दीर्घकाळापर्यंत निश्चिंत राहण्यासाठी, realme 16x 5G मध्ये 5 वर्षांची सुरळीत कामगिरी देण्याची हमी, तसेच दीर्घकालीन वापरासाठी विशेष काळजी आणि सॉफ्टवेअरचा सपोर्ट मिळतो. वापरण्यासाठी सोपे आणि विश्वासार्ह अशा प्रकारे तयार केलेले realme 16x 5G वेगवान, स्थिर आणि भरवशाचे राहते, ज्यामुळे तुम्हाला या श्रेणीतील सर्वोत्तम स्मार्टफोन अनुभवाचा लाभ मिळतो.

गेमिंगची आवड असलेल्यांसाठी, realme 16x 5G मध्ये 5300mm² आकाराची AirFlow Vapour Chamber Cooling System आणि GT Boost आणि हायपर कुलिंग ह्या तंत्रज्ञानाचा मेळ घातलेला आहे. यामुळे दीर्घकाळ चालणाऱ्या गेमिंग सत्रांच्या दरम्यान संसाधनांचे स्मार्ट पद्धतीने वाटप करणे, फ्रेम रेट्स स्थिर ठेवणे आणि उष्णतेचे प्रभावीपणे व्यवस्थापन करणे शक्य होवून जाते. याच प्रमाणे, कामगिरीची मागणी सर्वोच्च पातळीवर असताना डिव्हाइसचे तापमान कमी करण्यासाठी यात वन-टॅप कूलिंग हे खास वैशिष्ट्य दिलेले आहे, ज्यामुळे सातत्यपूर्ण, सुखद आणि सर्वोत्तम गेमिंगचा अनुभव मिळतो.

मनोरंजन आणि गेमिंगचा अनुभव अधिक समृद्ध करणारा realme 16x 5G हा स्मार्टफोन 6.8-इंचाच्या अल्ट्रा ब्राइट डिस्प्ले सह येतो, जो या श्रेणीतील सर्वोत्तम दृश्याचा अनुभव देण्यासाठी विशेष डिझाइन केला गेला आहे. या श्रेणीतील आघाडीचा 144Hz रिफ्रेश रेट आणि 1,200 निट्सपर्यंतचा हाय ब्राइटनेस मोड यामुळे हा डिस्प्ले अत्यंत सहज स्क्रोलिंग आणि गतिशील असा टच रिस्पॉन्स देतो. तसेच, तुम्ही स्ट्रीमिंग करत असाल, गेमिंग करत असाल किंवा घराबाहेर ब्राउझिंग करत असाल, तरीही हा डिस्प्ले स्पष्ट आणि डोळ्यांना सुखद असा दृश्य अनुभव प्रदान करतो.

दिवसभर टिकणारी, अशा श्रेणीतील सर्वोत्तम 7000mAh टायटन बॅटरी

realme 16x 5G मध्ये या श्रेणीतील सर्वोत्तम 7000mAh टायटन बॅटरी देण्यात आलेली आहे, जी दिवसभर टिकण्यासाठी आणि अखंड व सुरळीत अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. दीर्घकालीन विश्वासार्हतेचा विचार करून ही बॅटरी अशा प्रकारे डिझाइन केली आहे की, सहा वर्षांपर्यंतच्या वापरांतर देखील तिची क्षमता ८०% पेक्षा जास्त टिकून राहते. शिवाय, ही बॅटरी 1,600 पर्यंतच्या चार्जिंग सायकलला सपोर्ट करते, ज्यामुळे तुमच्या बदलत्या दैनंदिन गरजांप्रमाणेही तिची कामगिरी विश्वसनीय राहते.

जलद चार्जिंगसाठी, realme 16x 5G मध्ये 45W SUPERVOOC फास्ट चार्जिंगची सुविधा देण्यात आलेली आहे; यामुळे स्ट्रीमिंग, गेमिंग, नेव्हिगेशन आणि उत्पादक कामांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींकडे तुम्ही त्वरित परत येऊ शकता. या डिव्हाइसमध्ये बायपास चार्जिंग ची सुविधाही आहे, जी गेमिंग आणि चार्जिंग एकाच वेळी करता येण्यासारख्या अति-वापराच्या वेळी निर्माण होणारी उष्णता कमी करण्यासाठी मदत करते. तसेच, यात 6.5W रिव्हर्स चार्जिंगलाही सपोर्ट मिळतो, ज्यामुळे प्रवासादरम्यान किंवा धावपळीच्या दिवसांमध्ये सुसंगत ॲक्सेसरीज आणि इतर डिव्हाइसेसना चार्ज करणे शक्य होते आणि अधिक सोय मिळते.

इंटेलिजेंट इमेजिंग आणि AI-शक्तीच्या उत्पादकतेसह 50MP AI कॅमेरा

realme 16x 5G मध्ये 50 MP AI कॅमेरा या विभागातील सर्वोत्तम कॅमेरा अनुभव देण्यासाठी, दैनंदिन परिस्थितींमध्ये तीक्ष्ण, दोलायमान आणि तपशीलवार फोटो कॅप्चर करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. चांगल्या-प्रकाशित स्ट्रीट शॉट्सपासून ते आव्हानात्मक इनडोअर लाइटिंगपर्यंत, कॅमेरा स्पष्टतेसाठी आणि नैसर्गिक दिसणाऱ्या परिणामांसाठी ट्यून केलेला आहे, ज्यामुळे तुम्ही जटिल सेटिंग्जची आवश्यकता न लागता अगदी आत्मविश्वासाने शूट करू शकता.

प्रत्येक फोटो अधिक सहजतेने काढता यावा यासाठी, realme 16x 5G मध्ये AI Ultra Clarity, AI Eraser, AI Glare Remover, Motion Photo आणि Dual-View Video यांसारख्या स्मार्ट AI इमेजिंग टूल्सचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे रील्स, प्रवासाचे अपडेट्स आणि दैनंदिन कथा सांगण्यासाठी उपयुक्त असा, आकर्षक फ्रेमिंग असलेला आणि शेअर करण्यासाठी सज्ज असलेला मजकूर अगदी सहजपणे तयार करता येतो.

फोटोग्राफीच्या पलीकडे जाऊन, realme 16x 5G आपल्या दैनंदिन कामांमध्ये AI-आधारित उत्पादकता आणते. यामध्ये गुगल जेमिनी, नोट्ससाठी AI असिस्टंट, टेक्स्ट स्कॅनर, AI डॉक्युमेंट एन्हांसमेंट आणि AI-आधारित एक्सपोर्ट क्षमता यांसारख्या साधनांचा समावेश आहे. ही सर्व वैशिष्ट्ये तुम्हाला आशय अधिक वेगाने कॅप्चर करण्यात, संपादित करण्यात आणि व्यवस्थापित करण्यात मदत करतात; ज्यामुळे याचा 50MP कॅमेरा फक्त फोटोग्राफीमधील सुधारणा न ठरता, तुमचा एक परिपूर्ण दैनंदिन जोडीदार बनतो.

लष्करी दर्जा असलेला टिकाऊपणा आणि उत्कृष्ट ब्लूमिंग डिझाइनचा संगम

दैनंदिन जीवनातील आव्हाने पेलण्यासाठी तयार करण्यात आलेला realme 16x 5G हा फोन मिलिटरी-ग्रेड शॉक रेझिस्टन्स, IP65 धूळ व पाणी रोधक क्षमता आणि रेन टच मोड यांसारख्या वैशिष्ट्यांसह येतो. फोन चुकून हातातून पडणे, धुळीचे वातावरण असणे किंवा अचानक पाण्याचे थेंब उडणे अशा विविध परिस्थितींमध्ये सुद्धा हा डिव्हाइस विश्वसनीय कामगिरी देण्यासाठी डिझाइन केला गेला आहे.

टिकाऊपणा आणि स्टाईल यांचा समतोल साधणारा realme 16x 5G, तरुण ऊर्जा, लवचिकता आणि सततच्या विकासापासून प्रेरित एक प्रीमियम ब्लूमिंग डिझाइन सादर करतो. सुबकपणे तयार केलेल्या मागील पॅनलवर ब्लूमिंग टेक्स्चर आणि मेटल डेको आहेत, जे डिव्हाइसला एक अत्याधुनिक लुक आणि फील देतात. त्याचवेळी, स्टायलिश ग्लोरी व्हाइट आणि एंड्युरन्स ब्राऊन रंगांचे पर्याय एक विशिष्ट सौंदर्यशास्त्र सादर करतात, जे या सेगमेंटमध्ये उठून दिसते.

आपल्या श्रेणीमधील सर्वोत्तम बॅटरी लाईफ, दीर्घकाळापर्यंत टिकणारी सुरळीत कामगिरी, उत्कृष्ट हाय-रिफ्रेश-रेट डिस्प्ले, प्रगत AI आधारित सुविधा, उत्तम कॅमेरा क्षमता आणि टिकाऊ व प्रीमियम डिझाइन यांमुळे, realme 16x 5G हा स्मार्टफोन वैशिष्ट्यांनी परिपूर्ण 5G फोन शोधणाऱ्या ग्राहकांसाठी एक उत्कृष्ट पर्याय ठरतो. उत्पादकता, मनोरंजन आणि दैनंदिन जीवनशैलीला उत्तम साथ देण्यासाठी डिझाइन केलेला हा फोन, आपल्या श्रेणीतील सर्वोत्तम ऑल-राउंड स्मार्टफोन अनुभव देण्याच्या रिअलमीच्या वचनबद्धतेला अधिक दृढ करतो.

किंमत आणि उपलब्धता

realme 16x 5G हा 13 ऑगस्ट 2026 पासून Flipkart, realme.com आणि मुख्य स्टोअर्सवर 23,999/- रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध होईल.

प्रोडक्ट प्रकार       किंमत  ऑफर
realme 16x 5G

4GB+128GB         25,999      23,999
6GB+128GB          27,999     25,999
6GB+256GB          30,999    28,999

Independence Day Special: देशभक्तीच्या कथा पाहण्याची Airtel आयपीटीव्हीवर रंगतदार मेजवानी

Web Title: Realme 16x 5g launched 7000mah battery 50mp camera price features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 06:56 PM

Topics:  

  • realme
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Independence Day Special: देशभक्तीच्या कथा पाहण्याची Airtel आयपीटीव्हीवर रंगतदार मेजवानी
1

Independence Day Special: देशभक्तीच्या कथा पाहण्याची Airtel आयपीटीव्हीवर रंगतदार मेजवानी

Airtel Recharge Hike: एअरटेलच्या रिचार्जमध्ये मोठा बदल; ‘हे’ प्लॅन बंद झाल्याने ग्राहकांचा खर्च वाढणार
2

Airtel Recharge Hike: एअरटेलच्या रिचार्जमध्ये मोठा बदल; ‘हे’ प्लॅन बंद झाल्याने ग्राहकांचा खर्च वाढणार

Tech News: तुमच्या आधार कार्डवरही जुना फोटो आहे? 10 मिनिटांत बदलण्याचा ‘हा’ सोपा मार्ग
3

Tech News: तुमच्या आधार कार्डवरही जुना फोटो आहे? 10 मिनिटांत बदलण्याचा ‘हा’ सोपा मार्ग

हरवलेली वस्तू शोधणं झालं सोपं! Google ने आणला Pixel Tag, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
4

हरवलेली वस्तू शोधणं झालं सोपं! Google ने आणला Pixel Tag, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.