
Realme Narzo 90 Series: बजेट सेगमेंटमध्ये डबल धमाका! Realme च्या दोन स्मार्टफोन्सची भारतात एंट्री, किंमत 13,999 रुपयांपासून सुरु
कंपनीने लाँच केलेले हे दोन्ही हँडसेट ग्राहक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि कंपनीच्या वेबसाईटवरून खरेदी करू शकता. स्टँडर्ड मॉडेलमध्ये धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी IP66+IP68+IP69 रेटिंग देण्यात आली आहे. यासोबतच फोनमध्ये एक स्क्वायर-शेप मॉड्यूलमध्ये 50-मेगापिक्सेलचा डुअल रियर कॅमेरा देखील आहे. तसेच Narzo 90x 5G मध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी रियर कॅमेरा देखील देण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – X)
This is the realme Narzo 90 5G. pic.twitter.com/KTHDlWRri2 — Mukul Sharma (@stufflistings) December 16, 2025
Realme Narzo 90 5G च्या 6GB RAM + 128GB व्हेरिअंटची किंमत 16,999 रुपये आहे. Realme Narzo 90 5G च्या 8GB RAM + 128GB व्हेरिअंटची किंमत 18,499 रुपये आहे. Realme Narzo 90x 5G च्या 6GB RAM + 128GB व्हेरिअंटची किंमत 13,999 रुपये आहे. Realme Narzo 90x 5G च्या 8GB RAM + 128GB व्हेरिअंटची किंमत 15,499 रुपये आहे. दोन्ही स्मार्टफोन ग्राहक 24 डिसेंबरपासून अॅमेझॉन आणि Realme इंडिया ऑनलाइन स्टोअरमधून खरेदी करू शकतात.
Realme Narzo 90 5G मध्ये 6.57-इंच AMOLED फुल-HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 240Hz पर्यंत टच सँपलिंग रेट, 1,400 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच Realme Narzo 90x 5G मध्ये थोडा मोठा 6.80-इंच LCD डिस्प्ले देण्यात आला आला आहे. या फोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेट, 1,200 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस मिळणार आहे.
दोन्ही डिव्हाईसमध्ये डुअल सिम सपोर्ट देण्यात आला आहे, जो Android 15-बेस्ड Realme UI 6.0 वर चालतात. Realme Narzo 90 5G मध्ये ऑक्टा कोर 6nm MediaTek Dimensity 6400 Max चिपसेट दिला आहे तर दुसऱ्या बाजूला Narzo 90x 5G मध्ये ऑक्टा कोर 6nm MediaTek Dimensity 6300 चिपसेट देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी Realme Narzo 90 5G मध्ये डुअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल मोनोक्रोम लेंस देण्यात आली आहे. तसेच Narzo 90x 5G मध्ये 50-मेगापिक्सेलचा Sony IMX852 प्राइमरी रिअर कॅमेरा आहे. स्टँडर्ड मॉडेलमध्ये सेल्फीसाठी 50-मेगापिक्सेल आणि Narzo 90x मध्ये 8-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. सिरीजमधील दोन्ही डिव्हाईसमध्ये 7,000mAh ची टाइटन बॅटरी देण्यात आली आहे.