Galaxy Days 2025: Samsung स्मार्टफोन खरेदी करायचाय? फ्लिपकार्टवर सुरु झाला नवा सेल, कंपनीच्या 'या' मॉडेल्सवर दमदार ऑफर्स
पुढील 2 दिवस म्हणजेच 18 डिसेंबरपर्यंत हा सेल सुरु राहणार आहे. या सेलदरम्यान कंपनी त्यांच्या ग्राहकांना सॅमसंग स्मार्टफोनच्या खरेदीवर एक्सचेंज ऑफर, स्पेशल पेयर-अप डील, सॅमसंग केयर प्लसचे बेनिफिट आणि दूसरे सरप्राईज रिवॉर्ड ऑफर करणार आहे. ज्यामुळे ग्राहकांना कमी किंमतीत नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने कंपनीने त्यांच्या ग्राहकांना Samsung Galaxy Days 2025 चे खास सरप्राईज दिले आहे. या सेलमध्ये कोणत्या ऑफर्स उपलब्ध आहेत, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
Best Deals on Samsung Devices are coming from 16-18th Dec on Flipkart 🤯
Best time to buy devices for samsung lovers🔥 #samsung #Galaxydays #flipkart pic.twitter.com/yMaHsNbLqb — MD Talk YT (Manjeet) (@Mdtalk37) December 15, 2025
आजपासून फ्लिपकार्टवर गॅलेक्सी डेज सेल सुरु झाला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना सॅमसंगच्या गॅलेक्सी स्मार्टफोवर 12,000 रुपयांपर्यंत एडिशनल एक्सचेंज बोनसचा फायदा मिळणार आहे. यासोबतच सॅमसंगच्या स्मार्टफोन, वियरेबल किंवा दूसऱ्या एक्सेसरीजवर 5000 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी मिळणार आहे. सॅमसंगचं असं म्हणणं आहे की, या सेलदरम्यान लॅपटॉपवर देखील मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे.
फ्लिपकार्टवरून सॅमसंग स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कंपनी सॅमसंग केयर+ ची देखील ऑफर देत आहे. या प्लॅनसह कंपनी निवडक गॅलेक्सी स्मार्टफोनवर एक्सीडेंटल आणि लिक्विड डॅमेज प्रोटेक्शन ऑफर करणार आहे.
फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या गॅलेक्सी डेज सेलदरम्यान सॅमसंग ब्रँड स्टोअरला भेट देणाऱ्या ग्राहकांना सुपरकॉइन्स देखील ऑफर केले जाणार आहेत. यासोबतच मिस्ट्री बॉक्सद्वारे खरेदीदारांना काही निवडक डिव्हाईससाठी खास कूपन देखील दिले जाणार आहेत. यासोबतच, फ्लिपकार्टवर जुना फोन एक्सचेंज केल्यावर चांगला एक्सचेंज बोनस देखील दिला जाईल.
Ans: Samsung ची भारतभर मजबूत सर्व्हिस नेटवर्क असून सर्व्हिस सेंटर्स सहज उपलब्ध आहेत.
Ans: होय, Galaxy A आणि M Series बजेट युजर्ससाठी चांगले पर्याय मानले जातात.
Ans: Samsung Galaxy फोन Amazon, Flipkart, Samsung Official Store आणि ऑफलाइन दुकानांत उपलब्ध आहेत.






