
REDMAGIC च्या नव्या स्मार्टफोनची ग्लोबल मार्केटमध्ये झाली एंट्री, 50MP कॅमेरा आणि 5G सपोर्टने सुसज्ज... इतकी आहे किंमत
REDMAGIC ने गेल्या महिन्यात चीनमध्ये REDMAGIC 11 Pro स्मार्टफोन लाँच केला होता. आता या स्मार्टफोनची एंट्री ग्लोबल मार्केटमध्ये देखील झाली आहे. कंपनीने त्यांचा लेटेस्ट स्मार्टफोन REDMAGIC 11 Pro आता ग्लोबल मार्केटमध्ये देखील लाँच केसा आहे. या स्मार्टफोनच्या ग्लोबल वर्जनमध्ये 120W ऐवजी 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त या वर्जनच्या स्पेसिफिकेशन्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.
स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर या डिव्हाईसमध्ये 6.85-इंच 1.5K OLED BOE X10 डिस्प्ले देण्यात आला आहे, यासोबतच या डिव्हाईसमध्ये 144Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देखील दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 960Hz पर्यंत टच सँपलिंग रेट, 10-बिट कलर डेप्थ आणि 100% DCI-P3 कलर गॅमटसह 2000 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे.
फोनला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे, जो 3nm वर आधारित आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये एड्रेनो 840 GPU आहे. या फोनमध्ये 12GB / 16GB / 24GB LPDDR5T RAM ऑप्शन आणि 256GB / 512GB / 1TB (UFS 4.1 Pro) स्टोरेज ऑप्शन देण्यात आला आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये लेटेस्ट Android 16 देखील आहे.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर REDMAGIC 11 Pro मध्ये 50MP चा 1/1.55 सेंसर f/1.88 अपर्चरसह, OIS सपोर्टसह 50MP 120-डिग्री अल्ट्रा-वाइड लेंस f/2.2 अपर्चरसह आणि 16MP चा OmniVision अंडर-डिस्प्ले फ्रंट-फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, 3.5mm ऑडियो जॅक, डुअल 1115K स्पीकर आहे. कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये 7500mAh ची बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंग, 80W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील दिला आहे.
REDMAGIC 11 Pro च्या 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत US मध्ये $749 म्हणजेच सुमारे 66,505 रुपये आहे. REDMAGIC 11 Pro च्या 16GB+512GB व्हेरिअंटची किंमत US मध्ये $849 म्हणजेच सुमारे 75,385 रुपये आहे. REDMAGIC 11 Pro च्या 24GB+1TB व्हेरिअंटची किंमत US मध्ये $999 म्हणजेच सुमारे 88,705 रुपये आहे.
REDMAGIC म्हणजे कोणती कंपनी आहे?
REDMAGIC ही Nubia Technology (ZTE ची सब-ब्रँड) द्वारे विकसित केलेली एक प्रसिद्ध गेमिंग स्मार्टफोन ब्रँड आहे, जी उच्च परफॉर्मन्स आणि कूलिंग सिस्टमसाठी ओळखली जाते.
REDMAGIC कोणत्या देशाची कंपनी आहे?
REDMAGIC ही चीनमधील कंपनी आहे, परंतु तिचे स्मार्टफोन्स जागतिक स्तरावर जसे भारत, युरोप, आणि अमेरिकेत देखील उपलब्ध आहेत.
REDMAGIC फोन कोणासाठी बनवलेले आहेत?
REDMAGIC फोन प्रामुख्याने गेमर्ससाठी डिझाइन केलेले असतात, ज्यात हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले, प्रगत कूलिंग सिस्टम, आणि शक्तिशाली प्रोसेसर दिलेले असतात.
REDMAGIC चे लोकप्रिय स्मार्टफोन्स कोणते आहेत?
REDMAGIC 9 Pro, REDMAGIC 8S Pro, REDMAGIC 7S Pro, आणि नवीन REDMAGIC 11 Pro हे त्यांचे लोकप्रिय मॉडेल्स आहेत.