Redmi 15C 4G: 6,000mAh बॅटरीसह आला Redmi चा नवा बजेट स्मार्टफोन, 6.9-इंच स्क्रीनने सुसज्ज; वाचा स्पेसिफिकेशन्स
चिनी कंपनी शाओमीचा लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँड Redmi ने एक नवीन बजेट डिव्हाईस लाँच केले आहे. हा नवीन बजेट स्मार्टफोन सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. कंपनीने हा नवीन बजेट स्मार्टफोन Redmi 15C 4G या नावाने लाँच केला आहे. कंपनीने हे डिव्हाईस निवडक बाजारात लाँच केला आहे. असं सांगितलं जात आहे की, कंपनीने लाँच केलेले नवीन डिव्हाईस Redmi 14C चे अपग्रेड मॉडेल आहे. कंपनीने हे डिव्हाईस 2024 मध्ये लाँच केले होते.
विचार तुम्ही करा आणि लिहिणार AI! ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी तयार केले अनोखी टोपी, अशी करणार काम
कंपनीने लाँच केलेल्या नवीन बजेट डिव्हाईसमध्ये 6.9-इंच मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे, जो HD+ 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या डिव्हाईसमध्ये MediaTek Helio G81-Ultra चिपसेट दिला आहे, जो 8GB पर्यंत रॅम ऑफर करतो. यासोबतच फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देखील देण्यात आला आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेल चा प्रायमरी कॅमेरा आहे. (फोटो सौजन्य – X)
बजेट डिव्हाईसच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर Redmi 15C 4G स्मार्टफोनच्या 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 179 डॉलर्स म्हणजेच सुमारे 15,800 रुपये आहे. तर या स्मार्टफोनच्या टॉप-एंड मॉडल 8GB रॅम + 256GB स्टोरेजची किंमत 229 डॉलर्स म्हणजेच सुमारे 20,200 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने हे डिव्हाईस मूनलाइट ब्लू, मिडनाइट ब्लॅक, मिंट ग्रीन आणि ट्वाइलाइट ऑरेंज या रंगात लाँच केले आहे.
स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर या डिव्हाईसमध्ये 6.9-इंच HD+ LCD स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच हे डिव्हाईस स्मूथ स्क्रॉलसाठी 120Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. ज्यामध्ये 810nits ची पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. यासोबतच हँडसेटमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो G81-अल्ट्रा चिपसेट देखील देण्यात आला आहे. या बजेट डिव्हाईसमध्ये 8GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज देखील दिले जात आहे. Redmi 15C 4G मध्ये गूगलचे सर्वात खास सर्कल टू सर्च आणि जेमिनी सारखे अनेक AI फीचर्स देखील देण्यात आले आहेत.
फोटोग्राफीसाठी कंपनीने या बजेट डिव्हाईसमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्यामध्ये 5P लेंस आणि f/1.8 अपर्चरवाला 50-मेगापिक्सेलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये समोर सेल्फीसाठी f/2.0 अपर्चर वाला 8-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या कॅमेऱ्यात तुम्हाला अल्ट्रा एचडी मोड, पोर्ट्रेट मोड, सेल्फी ब्युटी मोडसह अनेक मोड्स मिळत आहेत. याशिवाय, या फोनमध्ये 6,000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग आहे.