Apple Watch चं सीक्रेट चोरलं आणि या टेक कंपनीला विकलं! सर्वत्र उडाला गोंधळ, माजी कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
Apple ने त्यांच्या एका माजी कर्मचाऱ्याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे आता Apple आणि OPPO या दोन्ही कंपन्या चर्चेत आहेत. Apple ने त्यांच्या एका माजी कर्मचाऱ्यावर असे आरोप केले आहेत की, या कर्मचाऱ्याने Apple Watch संबंधित जोडलेली अनेक सिकरेट्स चाइनीज स्मार्टफोन मेकर Oppo सोबत शेअर केले.
Apple ने उत्तर कॅलिफोर्नियामध्ये चेन शी यांच्याविरुद्ध हा खटला दाखल केला आहे. हा कर्मचारी Apple च्या सेन्सर सिस्टम आर्किटेक्ट विभागात काम करत होता. या रोलदरम्यान, त्याच्याकडे Apple वॉचशी संबंधित अनेक कॉन्फिडेंशियल डिटेल होते. यामध्ये डिझाइन, तांत्रिक कागदपत्रे, अंतर्गत तपशील आणि Apple च्या भविष्यातील उत्पादन रोडमॅपशी संबंधित माहिती समाविष्ट होती. कंपनी सोडल्यानंतर चेन शी याने त्याच्या एक्सेसचा गैरवापर केल्याचा आरोप आता Apple ने केला आहे. यासंबंबिधत आता Apple ने माजी कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.(फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनीने दाखल केलेल्या खटल्यात असं सांगण्यात आलं आहे की, अॅपलमध्ये सेन्सर सिस्टम आर्किटेक्ट म्हणून काम करणाऱ्या चेन शी यानी आरोग्य सेन्सिंग तंत्रज्ञानाशी संबंधित गोपनीय फाइल्समध्ये प्रवेश केला आणि त्या फाईल्स ओप्पोला दिल्या. तसेच कंपनीने दावा केला आहे की, चेन शी ने कंपनीमध्ये राजीनामा देण्यापूर्वी अनेकवेळा Apple Watch च्या तांत्रिक टीमसोबत वन-ऑन-वन मीटिंग घेतली. या मिटींगचा उद्देश रिसर्च आणि डेवलपमेंटसंबंधित माहिती मिळवणं असा होता. खटल्यात असं देखील सांगितलं आहे की, कंपनी सोडण्याच्या फक्त तीन दिवस आधी, चेन शी ने एका सुरक्षित फोल्डरमधून 63 कागदपत्रे डाउनलोड केली आणि ती एका USB ड्राइव्हवर ट्रान्सफर केली. एवढचं नाही डेटा चोरी करण्यापूर्वी त्याने इंटरनेटवर सर्च केले होते की, “मॅकबॉक पूर्णपणे कसा वाइप करायचा” आणि “शेअर केलेली फाइल उघडली आहे का ते कोणी पाहू शकेल का?”
Apple ने असा आरोप केला आहे की, या संपूर्ण प्रकरणात Oppo देखील सहभागी होता आणि त्यांनी चेन शी ला सर्व माहिती गोळा करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार, 4 जून 2025 रोजी, चेन शी याने ओप्पोच्या आरोग्य विभागाचे उपाध्यक्ष झिजिंग झेंग यांना एक संदेश पाठवला. यामध्ये लिहिले आहे की ते सतत अंतर्गत कागदपत्रांची समीक्षा करत आहेत आणि शक्य तितकी माहिती गोळा करण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांना एक-एक करून भेटत आहेत, ही माहिती ते पुढे ओप्पो टीमसोबत शेअर करतील.
सेंसर सिस्टम आर्किटेक्ट या रोलमध्ये चेन शी एप्पलच्या अनेक प्रगत आरोग्य सेन्सर तंत्रज्ञानावर काम करत होते. यामध्ये ईसीजी सेंसर टेक्नोलॉजी आणि त्यासंबंधित गोपनीय रोडमॅप्स, डिझाइन आणि डेव्हलपमेंट डॉक्यूमेंट्सचा समावेश होता. याच सर्व कारणांमुळे Apple याला बौद्धिक संपत्तीची गंभीर चोरी मानत आहे.