Redmi 15C: ग्लोबल मार्केट्समध्ये लवकरच लाँच होणार हा बजेट Smartphone, लाँचपूर्वी समोर आले Amazing फीचर्स
नवीन बजेट स्मार्टफोन खरेदी करायचा आहे का? थांबा, थोडा धीर धरा. कारण लवकरच Redmi चा नवीन बजेट स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. ग्लोबल मार्केट्समध्ये कंपनीच्या बजेट स्मार्टफोन Redmi 15C ची लवकरच एंट्री होणार आहे. Redmi 15C हा स्मार्टफोन कधी लाँच केला जाणार, याबाबत अद्याप कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र या स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वीच आता त्याचे अनेक फीचर्स समोर आले आहेत. कंपनीचा नवीन बजेट स्मार्टफोन Redmi 15C हा Redmi 14C चा सक्सेसर असू शकतो. Redmi 14C ऑगस्ट 2024 मध्ये काही भागांत लाँच करण्यात आला होता. लिस्टिंगनुसार, फोनमध्ये MediaTek Helio G81 चिपसेट, 4GB RAM, 6,000mAh बटरी, आणि 50-मेगापिक्सेल डुअल रियर कॅमेरा यूनिट असण्याची शक्यता आहे.
यूरोपमधील काही देशांमध्ये आगामी Redmi 15C ची किंमत किती असू शकते याचा अंदाज लावण्यात आला आहे. इटलीमध्ये Redmi 15C या स्मार्टफोनच्या 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत €133.90 म्हणजेच सुमारे 13,400 रुपये असण्याची शक्यता आहे. Redmi 15C च्या हायर 4GB + 256GB व्हेरिअंटची किंमत €154.90 म्हणजेच सुमारे 15,500 रुपये असण्याची शक्यता आहे. Redmi 15C हा फोन मिंट ग्रीन, मूनलाइट ब्लू, मिडनाइट ग्रे, आणि ट्वाइलाइट ऑरेंज कलर ऑप्शन्समध्ये लाँच केला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
Redmi 15C First look & Specs!
📱 6.9″ LCD, 120Hz refresh
⚙️ Helio G81 | 4GB RAM
📸 50MP rear + 13MP selfie
🔋 6000mAh + 33W fast charging
💾 128GB, 256GB
🛡️ IP64, NFC, Side fingerprint
🎨 Blue, Green, Gray, OrangeVia:https://t.co/5dNtj8LEaU#Redmi15C #Xiaomi #BudgetBeast pic.twitter.com/RIL1aia96x
— Rock Leaks (@rockleaks) July 18, 2025
Redmi 15C मध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह 6.9-इंच LCD स्क्रीन दिली जाण्याची शक्यता आहे. हा फोन MediaTek Helio G81 प्रोसेसरसह लाँच केला जाण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये 4GB रॅम आणि 256GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेजसह जोडण्यात आले आहे. लिस्टिंगनुसार, फोन Xiaomi च्या HyperOS वर चालणार आहे.
फोटोग्राफीसाठी Redmi 15C मध्ये डुअल रियर कॅमेरा यूनिट दिला जाण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये AI-बॅक्ड 50-मेगापिक्सेल मेन सेंसर आणि 13-मेगापिक्सेल सेल्फी शूटर देण्यात आाल आहे. फोनमध्ये 33W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh ची बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे.
कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये 4G LTE, Bluetooth 5.4, Wi-Fi, NFC, GPS, आणि USB Type-C पोर्ट यांचा समावेश असू शकतो. फोनचा आकार 173.16×81.07×8.2mm आणि वजन 205g असू शकते. सुरक्षेसाठी, त्यात बाजूला माउंट केलेला फिंगरप्रिंट सेन्सर असू शकतो. लोकप्रिय सर्टिफिकेशन साइट्सवरील लिस्टिंगनुसार, Redmi 15C ला Poco C85 असे नाव दिले जाऊ शकते. हे हँडसेट जुलैमध्ये किंवा या वर्षाच्या अखेरीस लाँच होऊ शकतात.