WhatsApp Tips: हिंदी-मराठीसह या भाषांमध्ये वापरू शकता लोकप्रिय मेसेजिंग अॅप, ही आहे सर्वात सोपी Trick
मेटाच्या मालकीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि लोकप्रिय मेसेजिंग अॅप WhatsApp चे करोडो अॅक्टिव्ह युजर्स आहेत. चॅटिंग असो, व्हॉईस नोट असो नाहीतर व्हिडीओ कॉलिंग क्षणोक्षणी WhatsApp चा वापर केला जातो. शाळा असो कॉलेज नाहीतर ऑफीसमध्ये प्रत्येक ठिकाणी सर्वात गरजेचं असणारं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे WhatsApp. WhatsApp वर अनेक असे फीचर्स उपलब्ध आहेत, ज्याच्या मदतीने युजर्स त्यांची विविध कामं करू शकतात.
WhatsApp मध्ये युजर्सच्या सोयीसाठी अनेक फीचर्स उपलब्ध आहेत, ज्याचा वापर केल्याने युजर्सचा हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरण्याचा अनुभव अधिक मजेदार होतो. इतर फीचर्सप्रमाणे WhatsApp मध्ये एक भाषा फीचर देखील उपलब्ध आहे. खरं तर 90 टक्के लोकांना या फीचरबद्दल माहिती नाही. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या भाषेत WhatsApp चा वापर करू शकणार आहात. हे फीचर आयफोन आणि अँड्रॉईड अशा दोन्हीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)
जर तुम्हाला मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp हिंदी, मराठी, तमिल, तेलुगु, बंगाली किंवा इतर कोणत्या भाषेत वापरायचे असेल तर तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. स्वतःच्या भाषेत WhatsApp वापरण्याचा एक वेगळाच आनंद असतो. वृद्धांना हे करण्याचा फायदा होऊ शकतो. ते येथे त्यांच्या भाषेत सहजतेने बोलू शकतात.
वाचण्यास आणि समजण्यास सोपे आहे. वृद्ध आणि कमी तांत्रिक ज्ञान असलेल्या लोकांसाठी वापरण्यास सोपे. तुमच्या स्वतःच्या भाषेत गप्पा मारणे अधिक आनंददायी अनुभव बनते. हे फीचर वृद्ध आणि इंग्रजी न बोलणाऱ्या वापरकर्त्यांसाठी खूप फायदेशीर आहे. आता तुमच्या स्वतःच्या भाषेत WhatsApp वापरा आणि अनुभव आणखी आरामदायी बनवा. WhatsApp ६० हून अधिक भारतीय आणि परदेशी भाषांना सपोर्ट करते. यामध्ये अनेक भारतीय भाषांचा समावेश आहे.