Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

150 हून स्पोर्ट्स मोड आणि अनोखे हेल्थ ट्रॅकिंग फीचर्स… नवी Redmi स्मार्टवॉच लाँच, किंमत केवळ इतकी

Redmi Watch 6 Launched: रेडमी ग्लोबल मार्केटमध्ये नवीन स्मार्टवॉच लाँच केले आहे. या वॉचमध्ये दमदार डिस्प्ले, हेल्थ फीचर्स आणि लांब बॅटरी लाइफसह अनेक आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. ते यूजर्ससाठी आकर्षक पर्याय ठरू शकते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 06, 2026 | 02:21 PM
Redmi Watch 6

Redmi Watch 6

Follow Us
Close
Follow Us:
  • Redmi Watch 6 2.07-इंच AMOLED डिस्प्ले आणि 2000 निट्स ब्राइटनेससह लाँच करण्यात आले आहे.
  • या स्मार्टवॉचमध्ये 150+ स्पोर्ट्स मोड आणि हार्ट रेट, SpO2, स्लीप ट्रॅकिंगसारखे हेल्थ फीचर्स दिले आहेत.
  • 550mAh बॅटरीमुळे हे वॉच सामान्य वापरात 12 दिवस आणि सेव्हर मोडमध्ये 24 दिवस चालू शकते.
Redmi Smartwatch Launched: रेडमीने ग्लोबल मार्केटमध्ये एक नवीन स्मार्टवॉच लाँच केले आहे. कंपनीचे हे नवीन स्मार्टवॉच Redmi Watch 6 या नावाने लाँच करण्यात आले आहे. कंपनीने सर्वात आधी ऑक्टोबर 2025 मध्ये चीनमध्ये Redmi K90 आणि Redmi K90 Pro Max हँडसेटसह हे स्मार्टवॉच लाँच केले होते. त्यानंतर आता ग्लोबल मार्केटमध्ये देखील या स्मार्टवॉचची एंट्री झाली आहे. Redmi Watch 6 आणि Watch 6 NFC अशा दोन व्हेरिअंटमध्ये नवं स्मार्टवॉच लाँच करण्यात आलं आहे. या दोन्ही व्हेरिअंटची विक्री पोलंड, रोमानिया आणि थायलंड सारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये सुरु झाली आहे. रेडमीने लाँच केलेल्या या स्मार्टवॉचमध्ये 2.07-इंच अमोलेड स्क्रीन दिली आहे. तसेच या स्मार्टवॉचमध्ये 150 हून अधिक स्पोर्ट्स मोड देखील मिळणार आहे. वॉचमधील इतर स्पेसिफिकेशन्स आणि त्याची किंमत जाणून घेऊया.

AnTuTu रँकिंगमध्ये हा स्मार्टफोन ठरला नंबर 1; जगातील सर्वात ताकदवान Android डिव्हाईसचा स्कोअर पाहून डोळे फिरतील!

रेडमी वॉच 6 आणि रेडमी वॉच 6 एनएफसीची किंमत आणि उपलब्धता

पोलंड, रोमानिया आणि थायलंडमध्ये रेडमी वॉच 6 च्या विक्रीला सुरुवात झाली आहे. तर या स्मार्टवॉचचे एनएफसी-इनेबल्ड व्हेरिअंट आता केवळ पोलंडमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. रेडमी वॉच 6 पोलंडमध्ये PLN 449 म्हणजेच सुमारे 10 हजार रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. तर रेडमी वॉच 6 एनएफसीची किंमत PLN 499 म्हणजेच सुमारे 11 हजार रुपये ठेवण्यात आली आहे.

रेडमी वॉच 6 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टवॉचच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, रेडमीच्या या स्मार्टवॉचमध्ये 2.07-इंच अमोलेड स्क्रीन दिली आहे. यासोबतच या वॉचमध्ये 60Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 2,000 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. या डिव्हाईसमध्ये 2.5D कर्व्ड ग्लास कवर आणि पातळ बेजल आहेत. हा डिस्प्ले ‘ऑलवेज-ऑन’ फंक्शनलिटी आणि कस्टमाइजेबल वॉच फेससह लाँच करण्यात आले आहे.

150 हून अधिक स्पोर्ट्स मोड

रेडमीने लाँच केलेल्या या स्मार्टवॉचमध्ये 150 हून अधिक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. त्यापैकी 6 अ‍ॅक्टिव्हिटी आपोआप ओळखू शकते. हेल्थ ट्रॅकिंग फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग, SpO2 ट्रॅकिंग, स्लीप एनालिसिस आणि स्ट्रेस मॉनिटरिंग देखील मिळणार आहे. या वॉचमध्ये एक्सेलेरोमीटर, जायरोस्कोप, जियोमॅग्नेटिक सेंसर, एम्बिएंट लाइट सेंसर आणि पाण्याखालीही हार्ट रेटची तपसाणी करण्याची सुविधा असलेला ऑप्टिकल हार्ट रेट सेंसर देण्यात आला आहे.

Free Fire MAX: लो स्टोरेज फोनमध्येही स्मूथ चालेल गेम! या सोप्या टिप्स एकदा वापरून तर पाहा

12 दिवसांपर्यंत चालणार बॅटरी

रेडमी स्मार्टवॉचमध्ये 5ATM वॉटर रेजिस्टेंस रेटिंग देण्यात आली आहे. यामध्ये 550mAh बॅटरी दिली आहे. जी सामान्य वापरासाठी 12 दिवसांपर्यंत आणि बॅटरी सेव्हर मोडमध्ये 24 दिवसांपर्यंत चालते. नेव्हिगेशनसाठी, स्मार्टवॉचमध्ये ड्युअल L1 जीएनएसएस अँटेना आहेत, जे जीपीएस, बेईडू, ग्लोनास, गॅलीलियो आण क्यूजेडएसएस प्रणालींना सपोर्ट करतात.

Web Title: Redmi watch 6 launched globally with amoled display and 12 day battery life tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • Redmi
  • smartwatch
  • tech launch

संबंधित बातम्या

नव्या Noise स्मार्टवॉचची भारतात एंट्री! ‘नॉइज AI प्रो’ सिस्टिमने सुसज्ज…. किंमत 6 हजारांहून कमी
1

नव्या Noise स्मार्टवॉचची भारतात एंट्री! ‘नॉइज AI प्रो’ सिस्टिमने सुसज्ज…. किंमत 6 हजारांहून कमी

आयफोनसारखी डिझाईन अन् 5000mAh बॅटरी… itel च्या नव्या स्मार्टफोनने घातला धुमाकूळ, किंमत केवळ इतकी
2

आयफोनसारखी डिझाईन अन् 5000mAh बॅटरी… itel च्या नव्या स्मार्टफोनने घातला धुमाकूळ, किंमत केवळ इतकी

स्मार्टवॉच बनणार हेल्थ गार्ड! शुद्ध हरपण्याआधीच मिळणार इशारा? Samsung Galaxy Watch च्या नव्या फीचरची चर्चा
3

स्मार्टवॉच बनणार हेल्थ गार्ड! शुद्ध हरपण्याआधीच मिळणार इशारा? Samsung Galaxy Watch च्या नव्या फीचरची चर्चा

5,300mAh बॅटरी आणि तगडा प्रोसेसर… नव्या Honor स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप, किंमत खिशाला परवडणारी
4

5,300mAh बॅटरी आणि तगडा प्रोसेसर… नव्या Honor स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप, किंमत खिशाला परवडणारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.