Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फॅशन आणि टेक्नोलॉजीचे अनोखे कॉम्बिनेशन! Samsung ने लाँच केले नवे AI Eyewear… जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Samsung Intelligent Eyewear: सॅमसंगने एक नवीन इंटेलिजेंट आयवेअर जागतिक बाजारात सादर केले आहेत. हे डिव्हाईस वेगवेगळ्या डिझाईनमध्ये सादर करण्यात आले आहेत. सॅमसंगने लाँच केलेल्या या स्मार्ट चश्म्यांमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन AR 1 जेन 1 चिपसेट देण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 14, 2026 | 08:43 AM
फॅशन आणि टेक्नोलॉजीचे अनोखे कॉम्बिनेशन! Samsung ने लाँच केले नवे AI Eyewear... जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

फॅशन आणि टेक्नोलॉजीचे अनोखे कॉम्बिनेशन! Samsung ने लाँच केले नवे AI Eyewear... जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Follow Us
Follow Us:
  • सॅमसंग इंटेलिजेंट आयवेअर म्हणजेच फॅशन आणि तंत्रज्ञानाचे अनोखे कॉम्बिनेशन
  • स्मार्ट चश्म्यांमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन AR 1 जेन 1 चिपसेट
  • वॉर्बी पार्कर मॉडेलची सुरुवातीची किंमत 395 डॉलर म्हणजेच सुमारे 37,000 रुपये
टेक कंपनी सॅमसंगने त्यांचे नवीन Intelligent Eyewear ग्लोबल मार्केटमध्ये सादर केले आहेत. कंपनीने हे स्मार्ट आयवेअर जेंटल मॉन्स्टर आणि वॉर्बी पार्कर च्या सहकार्याने तयार केले आहेत. हे डिव्हाईस फॅशन आणि तंत्रज्ञानाचे अनोखे कॉम्बिनेशन आहे. या डिव्हाईसमध्ये यूजर्सना रोजच्या जीवनात वापरल्या जाणाऱ्या चश्म्याचा लूक आणि स्मार्ट फीचर्स एकाच ठिकाणी मिळणार आहेत. कंपनीने या रेंजमध्ये एकूण 30 डिझाईन सादर केले आहेत, ज्यामुळे यूजर्स त्यांच्या पसंतीनुसार डिव्हाईसची निवड करू शकतात. कंपनीने लाँच केलेल्या या स्मार्ट गॅझेटचे फीचर्स आणि किंमत जाणून घेऊया.

मायक्रोसॉफ्ट आउटलुक आणि मायक्रोसॉफ्ट 365 चे सर्व्हर क्रॅश! यूजर्स वैतागले, कंपनीने X वर पोस्ट शेअर करत दिली माहिती

सॅमसंग इंटेलिजेंट आयवेअरचे फीचर्स

सॅमसंगने लाँच केलेल्या या स्मार्ट चश्म्यांमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन AR 1 जेन 1 चिपसेट देण्यात आला आहे. यामध्ये एका बाजूला 12 मेगापिक्सेलचा एचडीआर कॅमेरा मिळणार आहे, जो 3:4 रेशियोमध्ये फोटो क्लिक करू शकतो. यामुळे3K रेजोल्यूशनवर 30fps पर्यंत आणि HDR सपोर्टसह 2K व्हिडीओ रेकॉर्डिंग देखील केली जाऊ शकते.

याशिवाय या डिव्हाईसमध्ये डुअल ओपन-ईअर स्पीकर आणि चार मायक्रोफोन देण्यात आले आहेत. चश्म्यामध्ये 2GB रॅम आणि 64GB चे इंटरनल स्टोरेज देखील मिळणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एकदा चार्ज केल्यानंतर हे डिव्हाईस 9 तासांची बॅटरी लाईफ ऑफर करू शकते. तर चार्जिंग केससह या डिव्हाईसची बॅटरी लाईफ 72 तासांपर्यंत असू शकते. (फोटो सौजन्य: Samsung) 

या स्मार्टफोनसोबत करू शकता चश्म्यांचा वापर

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या चश्म्यांचा वापर गॅलेक्सी एस, गॅलेक्सी एस एफई आणि गॅलेक्सी झेडएन सिरीजमधील One UI 9.0 किंवा नव्या वर्जनने सुसज्ज असलेल्या स्मार्टफोनसोबत केला जाऊ शकतो. याशिवाय, अँड्रॉईड 17 किंवा नवीन वर्जन असलेले गूगल पिक्सेल 7 आणि नवीन मॉडेल देखील या डिव्हाईससोबत काम करू शकतात. तसेच, आयफोन 13 आणि त्यानंतरच्या ज्या मॉडेलमध्ये iOS 26.6 किंवा नवीन वर्जन आहे, अशा मॉडेलसोबत चश्म्यांचा वापर केला जाऊ शकतो.

Airtel Recharge Plan: 84 दिवसांची व्हॅलिडीटी, जबरदस्त ओटीटी फायदे अन् बरंच काही… एअरटेलचा ‘हा’ भन्नाट प्लॅन पाहिलात का?

इतकी आहे सॅमसंग डिव्हाईसची किंमत

सॅमसंग इंटेलिजेंट आयवेअरची किंमत डिझाईन आणि ब्रँडिंगच्या हिशोबाने ठरवण्यात आली आहे. वॉर्बी पार्कर मॉडेलची सुरुवातीची किंमत 395 डॉलर म्हणजेच सुमारे 37,000 रुपये आहे. तर जेंटल मॉन्स्टर मॉडेलची सुरुवातीची किंमत 449 डॉलर म्हणजेच सुमारे 42,000 रुपये आहे. तर डिव्हाईसच्या टॉप मॉडेलची किंमत 489 डॉलर म्हणजेच सुमारे 46,000 रुपये आहे. यूजर्स हे नवीन सॅमसंग डिव्हाईस संबंधित ब्रँडच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन स्टोअर्समधून खरेदी करू शकतील. याव्यतिरिक्त, 10 डिसेंबरपासून सॅमसंगच्या निवडक स्टोअर्समध्ये प्रत्यक्ष अनुभव (हँड्स-ऑन डेमो) घेण्याची सुविधा उपलब्ध असेल. त्याच दिवशी डिव्हाईसची विक्री देखील सुरु होणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सॅमसंग इंटेलिजेंट आयवेअर म्हणजे काय?

    Ans: सॅमसंग इंटेलिजेंट आयवेअर हे स्मार्ट चष्मे आहेत. यामध्ये रोजच्या चष्म्याचा लूक आणि आधुनिक तंत्रज्ञानाची स्मार्ट फीचर्स एकत्र देण्यात आली आहेत.

  • Que: सॅमसंगने हे स्मार्ट चष्मे कोणत्या कंपन्यांसोबत तयार केले आहेत?

    Ans: सॅमसंगने जेंटल मॉन्स्टर (Gentle Monster) आणि वॉर्बी पार्कर (Warby Parker) यांच्या सहकार्याने हे स्मार्ट चष्मे तयार केले आहेत.

  • Que: सॅमसंग इंटेलिजेंट आयवेअरमध्ये कोणता प्रोसेसर देण्यात आला आहे?

    Ans: या स्मार्ट चष्म्यांमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन एआर 1 जन 1 चिपसेट देण्यात आला आहे.

Web Title: Samsung launched new intelligent eyewear read price features and specifications hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 08:43 AM

Topics:  

  • samsung
  • tech launch
  • tech updates

संबंधित बातम्या

मायक्रोसॉफ्ट आउटलुक आणि मायक्रोसॉफ्ट 365 चे सर्व्हर क्रॅश! यूजर्स वैतागले, कंपनीने X वर पोस्ट शेअर करत दिली माहिती
1

मायक्रोसॉफ्ट आउटलुक आणि मायक्रोसॉफ्ट 365 चे सर्व्हर क्रॅश! यूजर्स वैतागले, कंपनीने X वर पोस्ट शेअर करत दिली माहिती

VinFast India : भारतात विनफास्टची मोठी तयारी; इलेक्ट्रिक स्कूटर आणि स्पोर्ट्स बाइकचे पेटंट दाखल!
2

VinFast India : भारतात विनफास्टची मोठी तयारी; इलेक्ट्रिक स्कूटर आणि स्पोर्ट्स बाइकचे पेटंट दाखल!

Oppo Reno 17 स्मार्टफोनचा लूक आला समोर; कॅमेरा मॉड्यूलसह दिसणार ‘ग्लोइंग कॅट’ डिझाईन, चाहते थक्क
3

Oppo Reno 17 स्मार्टफोनचा लूक आला समोर; कॅमेरा मॉड्यूलसह दिसणार ‘ग्लोइंग कॅट’ डिझाईन, चाहते थक्क

एक क्लिक अन् होऊ शकतं मोठं नुकसान! अशी ओळखा स्कॅमर्सनी बनवलेली बनावट वेबसाईट, वाचा सविस्तर
4

एक क्लिक अन् होऊ शकतं मोठं नुकसान! अशी ओळखा स्कॅमर्सनी बनवलेली बनावट वेबसाईट, वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.