AnTuTu रँकिंगमध्ये हा स्मार्टफोन ठरला नंबर 1; जगातील सर्वात ताकदवान Android डिव्हाईसचा स्कोअर पाहून डोळे फिरतील!
AnTuTu ने एप्रिल महिन्यातील 10 सर्वात पावरफुल फोन्सची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये iQOO 15 Ultra (16GB + 1TB) ने अव्वल स्थान पटकावले आहे. या फोनला सर्वाधिक 41,26,940 गुण मिळाले आहेत. तर दुसऱ्या स्थानी iQOO 15 (16GB + 1TB) असून या फोनला 41,02,621 गुण मिळाले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन्स पवरफॉर्मंसच्या बाबतीत सर्वोत्तम ठरले आहेत. (फोटो सौजन्य – iQOO)
AnTuTu V11 Performance Ranking of April 2026 is out. 🔸Flagship
👑 iQOO 15 Ultra
Snapdragon 8 Elite Gen5 🐉 🔸Sub-Flagship
👑 iQOO Z11
MediaTek Dimensity 8500 Full Power Version 🔸Android Pad
Vivo Pad 6 Pro
Snapdragon 8 Elite Gen5 🐉#Antutu #iQOO15Ultra #iQOOZ11 pic.twitter.com/fufvCz7dkQ — Tech Home (@TechHome100) May 3, 2026
बेंचमार्कवर 40,98,742 गुणांसह Red Magic 11 Pro+ (24GB + 1TB) तिसऱ्या स्थानावर आहे. Realme GT8 Pro (16GB + 512GB) चौथ्या स्थानावर असून या फोनला 39,68,443 गुण मिळाले आहेत. या यादीमध्ये Oppo Find X9 Ultra (16GB + 512GB) पाचव्या स्थानी असून त्याला 39,41,792 गुण मिळाले आहेत. हा स्मार्टफोन अद्याप भारतात लाँच करण्यात आला नाही. कंपनी फोन भारतात लवकरात लवकर लाँच करण्यासाठी तयारी करत आहे. OnePlus Ace 6 Ultra (16GB + 1TB) ला 39,38,102 गुण मिळाले असून हा फोन सहाव्या स्थानी आहे.
सातव्या स्थानी Red Magic 8 Pro स्मार्टफोन असून त्याला 38,10,592 गुण मिळाले आहेत. आठव्या स्थानी Red Magic 8 आहे, त्याला 38,08,833 गुण मिळाले आहेत. 37,97,824 गुणांसह Vivo X300 Ultra नवव्या स्थानावर आहे. हे सर्व स्मार्टफोन्स 16GB रॅम+ 512GB स्टोरेजसह उपलब्ध आहेत. OnePlus 15T (16GB + 512GB) दहाव्या स्थानी असून त्याला 37,93,016 गुण मिळाले आहेत.
Google Pixel 11 सिरीज लवकरच येणार; Tensor G6 चिप आणि दमदार फीचर्सने असणार सुसज्ज, जाणून घ्या सविस्तर
मिड बजेट सेगमेंटमध्ये iQOO बाजी मारली आहे. आयक्यूओ 15 अल्ट्रा स्मार्टफोनमध्ये 6.85-इंच 2K (1,440×3,168 पिक्सेल) सॅमसंग M14 8T एलटीपीओ अमोलेड डिस्प्ले दिला आहे. आयक्यूओ 15 अल्ट्रामध्ये ऑक्टा कोर 3nm स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 चिपसेट आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आहे.






