Reliance Jio ने लाँच केले 3 नवीन प्लॅन
काही दिवसांपूर्वीच भारतातील लोकप्रिय टेक कंपन्यांनी आपले रिचार्ज प्लॅन महाग केले.या निर्णयाने अनेक मोबाईल युजर्स नाराज होते. त्यातच आता रिलायन्स जिओने रिचार्ज प्लॅन्स वाढवल्यानंतर आपले अनेक प्लॅन बंद केले होते, परंतु आता टेलिकॉम कंपनीने ओटीटीसोबत तीन नवीन प्लॅन आणले आहेत. यामध्ये 329 रुपये, 949 रुपये आणि 1049 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये अनेक OTT ॲप्सचे सब्स्क्रिप्शन देखील दिले जाणार आहे.
हेदेखील वाचा – Airtel ने 5G युजर्ससाठी 3 नवीन प्लॅन्स लाँच केले! 51 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत मिळतील अनेक फायदे
जिओचा 329 रुपयांचा प्रीपेड प्लान 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. हा प्लॅन ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि 100 SMS/दिवसासह 1.5GB डेली डेटा ऑफर करतो. यामध्ये JioSaavn Pro देखील उपलब्ध आहे. जिओ सावन प्रो सबस्क्रिप्शन सक्रिय करण्यासाठी युजर्सना जिओ सावन ॲपवर लॉग इन करावे लागेल.
जिओचा 949 रुपयांचा प्रीपेड प्लान 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह उपलब्ध करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्ससाठी दररोज 2GB डेटा रोलआउट केला जातो. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 100 SMS/ डेली यांचा लाभ मिळतो. तसेच यात 90 दिवस म्हणजेच 3 महिन्यांसाठी Disney+ Hotstar या OTT प्लॅटफॉर्मचा फायदा घेण्याची संधी दिली जात आहे. हा प्लॅन युजर्सना 5G वेलकम ऑफरचा लाभ घेण्याची सुविधा देखील पुरवते.
ओटीटी सबस्क्रिप्शनसह प्लॅन शोधत असलेल्या युजर्ससाठी हा प्लॅन एक चांगला पर्याय आहे. रिलायन्स जिओचा नवीनतम प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह 2GB डेली डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि 100 SMS/दिवस ऑफर करतो. OTT फायद्यांमध्ये JioTV मोबाइल ॲपद्वारे SonyLIV आणि ZEE5 यांचा समावेश आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G ऑफर देखील उपलब्ध आहे. म्हणजेच, जर डेली पॅक संपला तर युजर्स 5G नेटचा आनंद घेऊ शकतील.