
Mobile Recharge Price Hike: मोबाइल रिचार्ज पुन्हा महागणार? टेलिकॉम कंपन्यांची तयारी सुरु, यूजर्सना बसणार मोठा धक्का
सुमारे दोन वर्षानंतर टेलिकॉम कंपन्या जून 2026 पासून मोबाईल टेरीफमध्ये सुमारे पंधरा टक्क्यापर्यंत वाढ करण्याच्या तयारीत आहेत. याचा परिणाम प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही प्रकारच्या युजर्सवर थेट होणार आहे. टेलिकॉम कंपनीने घेतलेले या निर्णयाचा परिणाम सर्व स्मार्टफोन आणि मोबाईल युजर्सवर होणार आहे. रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढल्यामुळे युजर्सचे बजेट कोलमडणार आहे. जे युजर्स दर महिन्याला रिचार्ज करतात त्यांच्या बजेटवर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
मोबाईल रिचार्ज प्लॅनच्या किमतींमध्ये केली जाणारी वाढ करोडो युजर्सवर परिणाम करणार आहे. रिचार्ज प्लॅनच्या वाढत्या किमतींमुळे प्रत्येक महिन्याला मोबाईलचा खर्च वाढणार आहे. विशेषतः अशा लोकांवर जास्त परिणाम होणार आहे ज्यांना अधिक डेटाची गरज असते.
नुकत्याच समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, मोबाईल टेरिफ प्लॅनच्या किंमती वाढवण्याचा हा वेळ म्हणजे एक जुनी स्ट्रॅटेजी आहे. रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, देशातील डेटाचा वापर अत्यंत वेगाने वाढत आहे. अधिक यूजर पोस्टपेड प्लॅन्सचा वापर करत आहे. टेलिकॉम कंपन्याचा ARPU (Average Revenue Per User) अधिक चांगला होत आहे. याच कारणांमुळे कंपन्या आता रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवण्याचा विचार करत आहेत.
रिपोर्टमध्ये असं सांगितलं आहे की, रिलायन्स जिओ त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमतींमध्ये 10 ते 20 टक्क्यांनी वाढ करू शकतात. याचा उद्देश भारतीय एअरटेलच्या तुलनेत मूल्यांकन मिळवण्यासाठी आणि गुंतवणूकदारांना चांगले परतावे मिळवण्यासाठी होणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून कर्जामध्ये असलेली वोडाफोन आयडिया देखील रिचार्ज प्लॅनच्या किमतींमध्ये वाट करण्याची शक्यता आहे. कंपनी 2027 मध्ये त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती सुमारे 45 टक्क्यांनी वाढवणार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा यूजर्सवर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे.
Ans: होय, टेलिकॉम कंपन्या रिचार्ज दरवाढीचा विचार करत असल्याची शक्यता आहे. अंतिम निर्णय लवकरच जाहीर होऊ शकतो.
Ans: वाढते नेटवर्क खर्च, 5G गुंतवणूक, स्पेक्ट्रम शुल्क आणि कंपन्यांचा नफा वाढवण्याचा प्रयत्न ही प्रमुख कारणं आहेत.
Ans: अंदाजानुसार 10% ते 20% पर्यंत दरवाढ होऊ शकते, मात्र यावर अधिकृत घोषणा बाकी आहे.