Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Reliance Jio चा दबदबा वाढला! मुंबई-महाराष्ट्रात कोट्यवधी ग्राहकांसह बनला नंबर 1, पार केला 5.79 कोटी ग्राहकांचा टप्पा

रिलायन्स जिओने गेल्या दशकभरात भारतीय टेलिकॉम क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. 2016 मध्ये सुरू झालेल्या प्रवासात कंपनीने मुंबई-महाराष्ट्रासह देशभरात कोट्यवधी ग्राहक जोडत आपले मजबूत स्थान निर्माण केले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 14, 2026 | 02:50 PM
Reliance Jio चा दबदबा वाढला! मुंबई-महाराष्ट्रात कोट्यवधी ग्राहकांसह बनला नंबर 1, पार केला 5.79 कोटी ग्राहकांचा टप्पा

Reliance Jio चा दबदबा वाढला! मुंबई-महाराष्ट्रात कोट्यवधी ग्राहकांसह बनला नंबर 1, पार केला 5.79 कोटी ग्राहकांचा टप्पा

Follow Us
Follow Us:
  • रिलायन्स जिओने मुंबई-महाराष्ट्रात 5.79 कोटी ग्राहकांचा टप्पा गाठला असून बाजारहिस्सा सुमारे 40 टक्के आहे.
  • जून 2026 पर्यंत देशभरातील जिओचा ग्राहकवर्ग 53.33 कोटींवर पोहोचला आहे.
  • देशभरातील जिओच्या ग्राहकांपैकी तब्बल 28.5 कोटी ग्राहक 5G सेवेचा वापर करत आहेत.
नवी मुंबई : दहा वर्षांपूर्वी, सप्टेंबर 2016 मध्ये रिलायन्स जिओचा सुरू झालेल्या प्रवासाने 2026 च्यामध्यात क्रांती घडवली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रासोबत संपूर्ण देशात जिओने तब्बल 53 कोटी 33 लाख ग्राहकांचा टप्पा गाठला आहे. देशात अग्रेसर कंपनी म्हणून जिओने अल्पावधीत आपले स्थान निर्माण केले आहे. मुंबई, महाराष्ट्रातील ग्राहक सप्टेंबर 2016 मधील सुरुवातीच्या 15.5 लाख ग्राहकांपासून जून 2026 मधील 5.79 कोटी ग्राहकांपर्यंत जिओचा ग्राहकवर्ग सुमारे 45 टक्के चक्रवाढ वार्षिक वाढ दराने वाढला आहे. आज मुंबई-महाराष्ट्रातील एकत्रित वायरलेस ग्राहक बाजारपेठेत जिओचा वाटा सुमारे 40 टक्के आहे.

Vivo चा अचानक नवा फोन बाजारात दाखल! 6500mAh बॅटरीपासून 100x झूमपर्यंत मिळणार खास फीचर्स, जाणून घ्या किंमत

जिओच्या वाढीचा परिणाम उर्वरित बाजारपेठेच्या तुलनेत अधिक स्पष्टपणे दिसून येतो. जिओच्या लाँचपूर्वी, ऑगस्ट 2016 मध्ये मुंबई आणि महाराष्ट्रात मिळून सुमारे 11.52 कोटी वायरलेस ग्राहक होते. हे सर्व ग्राहक तत्कालीन विद्यमान ऑपरेटर्सकडे होते. जून 2026 पर्यंत एकूण बाजारपेठ वाढून सुमारे 14.47 कोटी ग्राहकांवर पोहोचली आहे. एकट्या जिओकडे 5.79 कोटी कनेक्शन्स आहेत. इतर ऑपरेटर्सचा ग्राहकवर्ग सध्या सुमारे 8.67 कोटी आहे.

मुंबई- महाराष्ट्रात जिओचे नेटवर्क, मजबूत 4G कव्हरेज,परवडणाऱ्या दरामुळे इतर ऑपरेटर्सच्या ग्राहकांनी जिओकडे स्थलांतर केले असून ते टिकवून ठेवण्यात जिओला यश आले आहे. जिओच्या प्रवेशानंतर,स्पर्धा तीव्र झाली. काही कंपन्यांचे विलीनीकरण तर अनेक ऑपरेटर्सनी बाजारातून माघार घेतली. एअरटेलने या कालावधीत आपला ग्राहकवर्ग वाढवला.

चार वर्षांपेक्षा कमी कालावधीत क्रमांक 1

अवघ्या चार वर्षांत मुंबई- महाराष्ट्रात जिओने पहिले स्थान मिळवले.एप्रिल 2018 मध्ये जिओने एअरटेलला तर जुलै 2020 मध्ये जिओने व्होडाफोन आयडियाला मागे टाकत सरशी केली.

देशभरात 53.33 कोटी ग्राहक

जून 2026 पर्यंत जिओचा देशभरातील ग्राहकवर्ग 53.33 कोटींवर पोहोचला आहे. त्यापैकी 28.5 कोटी ग्राहक 5 जी सेवेचा वापर करत आहेत. प्रति ग्राहक 43.7 जीबी पर्यंत वापर वाढला आहे.

Independence Day 2026: लाल किल्ल्यावरून पाहायचा आहे स्वातंत्र्यदिन सोहळा? आत्ताच घरबसल्या बुक करा ऑनलाईन तिकीट, अशी आहे प्रोसेस

शून्य ते 5 कोटी 79 लाख ग्राहक

2016 मध्ये शून्य ग्राहकसंख्येपासून सुरुवात करून आजमितीस 5.79 कोटी ग्राहक आणि सुमारे 40 टक्के बाजारहिस्सा जिओने मिळविला आहे. बाजारपेठेत अग्रेसर होत ग्राहकांना उत्तम सेवा प्रदान करत, ग्राहक टिकवण्यात यश मिळवले आहे.

Web Title: Reliance jio reaches 5 crore 79 lakh customers in maharashtra and mumbai crosses 53 crore nationwide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • jio
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Bumble ने बदलला डेटिंगचा मोठा नियम! आता मॅचनंतर महिला नाही तर पुरुषही करू शकणार पहिला मेसेज, जाणून घ्या सविस्तर
1

Bumble ने बदलला डेटिंगचा मोठा नियम! आता मॅचनंतर महिला नाही तर पुरुषही करू शकणार पहिला मेसेज, जाणून घ्या सविस्तर

Independence Day 2026: लाल किल्ल्यावरून पाहायचा आहे स्वातंत्र्यदिन सोहळा? आत्ताच घरबसल्या बुक करा ऑनलाईन तिकीट, अशी आहे प्रोसेस
2

Independence Day 2026: लाल किल्ल्यावरून पाहायचा आहे स्वातंत्र्यदिन सोहळा? आत्ताच घरबसल्या बुक करा ऑनलाईन तिकीट, अशी आहे प्रोसेस

Fraud Alert: 15 ऑगस्टच्या शुभेच्छांचा मेसेज अन् क्षणातच रिकामं होईल बँक अकाऊंट! स्कॅमर्सपासून राहा सावध, लक्षात ठेवा या टिप्स
3

Fraud Alert: 15 ऑगस्टच्या शुभेच्छांचा मेसेज अन् क्षणातच रिकामं होईल बँक अकाऊंट! स्कॅमर्सपासून राहा सावध, लक्षात ठेवा या टिप्स

realme 16x 5G ची एन्ट्री! 7000mAh ‘Titan’ बॅटरी अन् पॉवरफुल परफॉर्मन्स; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
4

realme 16x 5G ची एन्ट्री! 7000mAh ‘Titan’ बॅटरी अन् पॉवरफुल परफॉर्मन्स; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.