
राष्ट्राध्यक्ष Putin स्मार्टफोनपासून दूर का? अखेर उघड झालं अनोखं कारण, वाचाल तर तुम्हीही थक्का व्हाल
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा भारत दौरा सध्या चर्चेत आहे. व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या दोघांमध्ये चर्चा देखील झाली. भारत दौऱ्यामुळे पुतिन सध्या बरेच चर्चेत आहेत. कारण या दौऱ्यावेळी त्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचं आणि अनोखं सत्य जगासमोर आलं आहे. असं सांगितलं जात आहे की, पुतिन स्मार्टफोनचा वापर करत नाहीत. डिजीटल जगात जगातील मोठ्या नेत्यांकडे एकापेक्षा अधिक स्मार्टफोन असणं अतिशय सामान्य गोष्ट आहे. मात्र राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याबाबतीत हा नियम लागू होत नाही.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या वैयक्तिल आयफोनचा वापर करतात. हे सत्य संपूर्ण जगाला माहिती आहे. पण राष्ट्राध्यक्ष पुतिन तर मोबाईलपासून पूर्णपणे दूर आहेत. चार वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांसोबत सुरु असलेल्या चर्चांदरम्यान जेव्हा कोणतीरी म्हटलं होतं की, आज प्रत्येक व्यक्तीच्या खिशात स्मार्टफोन आहे, तेव्हा पुतिन यांनी लगेचच याला नकार दिला होता. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की, त्यांच्याकडे कोणताही स्मार्टफोन नाही. क्रेमलिनचे प्रवक्ता दिमित्री पेस्कोव यांनी देखील एका मुलाखतीत याबाबत सांगितलं होतं. त्यांना असं वाटतं की, एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीसाठी स्मार्टफोन त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी आणि सुरेक्षासाठी एक मोठा धोका ठरू शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
पुतिन यांनी अनेकदा त्यांच्या भाषणांमध्ये आणि मुलाखतींमध्ये देखील सांगितलं आहे की, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल जास्त माहिती नाही. त्यांनी रशियातील एजेंसीना सांगितलं आहे की, क्रेमलिन परिसरात मोबाईल फोन घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीसोबत संपर्क करण्याची गरज पडली तर अधिकारी सरकरी लाईनचा वापर करतात. पुतिन यांचं म्हणणं आहे की, ते इंटरनेटचा वापर अत्यंत कमी करतात, कारण इंटरनेट पूर्णपणे सुरक्षित नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
एका कार्यक्रमात लहान मुलांसोबत संवाद साधताना त्यांनी इंटरनेटला CIA चा प्रोजेक्ट असल्याचे सांगितलं होते आणि त्यातील बराच कंटेट आरोग्यासाठी हानिकारक आहे. म्हणूनच ते मोबाईल फोन, इंटरनेट आणि स्मार्ट डिव्हाइस टाळतात. त्यांना अशी उपकरणे त्यांच्या आजूबाजूला ठेवण्याचीही परवानगी नाही.
Realme P4x आणि Realme Watch 5 भारतात लाँच! किंमत यूजर्सच्या बजेटमध्ये, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
अशा परिस्थितीत आता असा प्रश्न निर्माण होत आहे की, पुतिन जगातील सर्व अपडेट्स कसे मिळवतात. खरं तर, पुतिन यांना सर्व महत्त्वाची माहिती अत्यंत सुरक्षित चॅनलद्वारे दिली जाते. गुप्तचर यंत्रणेचे अहवाल, अधिकृत कागदपत्रे, टीव्ही ब्रीफिंग आणि नियमित सुरक्षा अपडेट त्यांच्या आवाक्यात आहेत. काहींचे म्हणणे आहे की स्मार्टफोन आणि इंटरनेटपासून दूर राहिल्यामुळे त्यांना मर्यादित माहिती मिळू शकते आणि ते जगातील अनेक परिस्थितींचे पूर्णपणे मूल्यांकन करू शकत नाहीत.
Ans: व्लादिमीर पुतिन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष असून जगातील प्रभावी राजकीय नेत्यांपैकी एक आहेत.
Ans: ते 1999 पासून विविध पदांवर (राष्ट्राध्यक्ष/पंतप्रधान) सतत देशाच्या सत्तेत आहेत.
Ans: ते सायबर सुरक्षा आणि गुप्तचर धोक्यांपासून वाचण्यासाठी स्मार्टफोनचा वापर टाळतात असे अनेक अहवालांत म्हटले जाते.