Android Banking Malware: करोडो स्मार्टफोन यूजर्सवर व्हायरस अटॅकचा धोका, OTP शिवाय रिकामं होईल बँक अकाऊंट! असं राहा सुरक्षित
अलीकडेच एका सायबर सुरक्षा कंपनी Cleafy ने एका धोकादायक मालवेयर Albiriox चा खुलासा केला आहे. हा मालवेअर अँड्रॉईड यूजर्सना टार्गेट करत आहे आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा मालवेयर खोटे अॅप्स आणि क्लोन केलेल्या प्ले स्टोअर पेजद्वारे पसरतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
Cleafy ने दिलेल्या माहितीनुसार, Albiriox एक अॅडवांस बँकिंग ट्रोजन आहे, ज्याला सायबर गुन्हेगार डार्क वेबवर सब्सक्रिप्शन मॉडेलमध्ये विकत आहे. म्हणजेच हॅकर्स हा डेटा खरेदी करून अगदी सहजपणे याचा वापर करू शकणार आहेत. म्हणजेच हा सायबर अटॅक कोणत्याही एका संघाद्वारे केला जात नाही, तर कोणताही हॅकर याचा वापर करू शकणार आहे.
अनेक फ्रॉड असे असतात जिथे ओटीपीशिवाय यूजर्सचे बँक अकाऊंट रिकामं केलं जाते. हा फ्रॉड अशाच पद्धतीचा आहे. Albiriox यूजर्सच्या फोनमधील ओटीपी अगदी सहज क्रॅक करू शकतो. ज्यामुळे अकाऊंटमधील पैसे कधी आणि कोणी काढले, याबाबत यूजर्सना समजत देखील नाही. ना अलर्ट येतो आणि ना लॉगिन नोटिफिकेशन मिळते. Cleafy ने सांगितलं आहे की, हा संपूर्ण फ्रॉड अगदी गुप्तपणे होतो, ज्याची यूजर्सना भनक देखील लागत नाही.
Ans: मालवेअर म्हणजे तुमचा फोन, डेटा किंवा प्रायव्हसीला हानी पोहोचवण्यासाठी तयार केलेले हानिकारक सॉफ्टवेअर.
Ans: फेक अॅप्स, धोकादायक लिंक, पॉप-अप जाहिराती, क्रॅक्ड अॅप्स, फिशिंग मेसेजेस किंवा असुरक्षित Wi-Fi वापरल्यामुळे.
Ans: फोन स्लो होणे, तापणे, बॅटरी पटकन संपणे, डेटा जास्त वापरला जाणे, अनोळखी अॅप्स दिसणे, पॉप-अप जाहिराती वाढणे.






